फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमहापौरांचा राजीनामा!आघाडीची मनपात सत्ता ‘मुंगेरीलाल के हंसी सपने’महापौरांचा टोला

महापौरांचा राजीनामा!आघाडीची मनपात सत्ता ‘मुंगेरीलाल के हंसी सपने’महापौरांचा टोला

Advertisements


दयाशंकर तिवारी होणार नवे महापौर:उपमहापौर मनीषा कोठे यांचा देखील राजीनामा

नागपूर,ता. २१ डिसेंबर: गेल्या वर्षी २२ नोव्हेंबर रोजी पक्ष् श्रेष्ठींनी ठरविलेल्या फॉर्म्यूला प्रमाणे अडीच वर्षांपैकी अर्धा-अर्धा कार्यकाळ महापौर म्हणून मला व भाजपचे ज्येष्ठ नेते दयाशंकर तिवारी यांच्यात विभागून देण्यात आला होता,मी पक्षाचा खंदा कार्यकर्ता आहे,पक्ष्ाने दिलेले आदेश मी तंतोतंत पाळणार,ठरल्याप्रमाणे माझा तेरा महिन्यांचा कार्यकाळ आता संपला आहे त्यामुळे मी आज पत्र परिषद संपल्यानंतर मनपा आयुक्त बी.राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सोपविणार असल्याचा खुलासा महापौर संदीप जोशी यांनी आज सोमवार दि. २१ डिसेंबर रोजी मनपा मुख्यालयातील त्यांच्या कक्षात घेतलेल्या पत्र परिषदेत केला.

याप्रसंगी नियोजित महापौर दयाशंकर तिवारी,माजी महापौर व आमदार प्रवीण दटके,उपमहापौर मनीषा कोठे,स्थायी समितीचे अध्यक्ष् पिंटू झलके,सत्ता पक्ष् नेते संदीप जाधव आदी उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना महापौर म्हणाले की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पक्ष्ाने दोनवेळा स्थायी समितीचउ अध्यक्ष् होण्याची तसेच महापौर होण्याची संधी दिली.मी पक्षाचा साधा वार्डाचा अध्यक्ष् होतो,तेव्हा कोणते पद माझ्याकडे होते?त्यामुळे पदाची लालसा नाही,पद सोडले तरी मरेपर्यंत पक्ष् सोडणार नाही,पक्ष्ाचा कार्यकर्त्या म्हणून नियोजित महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासोबत नागपूरकर जनतेसाठी,प्रकल्पांच्या पूर्णतेसाठी काम करीत राहील,असे ते म्हणाले.भारतीय जनता पक्षाची विचारधारा माझ्या जगण्याचा भाग होती,आहे आणि असणार,पद सोडले म्हणजे लगेच इतर पक्ष्ात जाणार,असे होणार नाही.

महापाैर म्हणून पद स्वीकारल्यानंतर हक्काचा निधी नागपूरकर जनतेसाठी ‘महापौर सहायता निधी’म्हणून वापरण्याचा उपक्रम चालवला.यासाठी महापौरांचा निधी खर्चण्यास महापौर निधी मदत दस्तावेज समितीमार्फत योजना राबवली.शहर माझं एकट्याचं नाही,विविध जाती,धर्म,पंथ,विविध राजकीय पक्ष् इ.यांचंही आहे त्यामुळे शहराचा विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे यासाठी ‘वॉक ॲण्ड टॉक विथ मेअर’हा उपक्रम राबवला.यासाठी शहरातील ३६ बगिच्यामध्ये दोनशे ते सहाशे नागरिकांसोबत संवाद साधला,विविध समस्या आणि प्रश्‍ने समजून घेतली.नागरिकांच्या सूचना व तक्रारींची ,सूचनांची शहरभर तक्रार पेटींद्वारे दखल घेतली.

महापौर पद सांभाळताना शहरातील ३८० सामाजिक संस्थांसोबत ‘ब्रेकफास्ट विथ मेअर’उपक्रम राबवला.शहराच्या विकासात त्यांचा देखील हातभार लागला.दहा झोनमध्ये अडीच आठवड्यात ‘जनता दरबार’ राबवला.नागरिकांच्या समस्यांसाठी ‘हॅलो महापौर ॲप’ याला चांगला प्रतिसाद मिळाला,या ॲपमुळे नागरिकांच्या अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकले.नागपूर शहर देशात स्वच्छतेच्या मानांकनात ५८ व्या स्थानावर होता,‘मम्मी पापा यू टू!’ही चळवळ अनेक शाळांमध्ये राबवली.एक दिवस विद्यार्थ्यांसोबत ही चळवळ रस्त्यावर देखील राबवली.७ दिवस या विषयी जनजागृती अभियान राबविण्यात आला.या सर्वांचा परिणाम म्हणजे स्वच्छतेच्या मानांकनात आपले नागपूर शहर ५८ वरुन १८ व्या स्थानावर आले.

खाऊ गल्लीचा प्रकल्प गेल्या चार वर्षांपासून दयनीय अवस्थेत होता.महापौर पद स्वीकारल्या नंतर महिन्याभरातच १५ जानेवरीपूर्वी त्या प्रकल्पाचे उद् घाटन केले मात्र लॉक डाऊनमुळे दूर्देवाने पुन्हा या प्रकल्पाची तशीच स्थिती झाली,हे खेदाने सांगावे लागेल,असे महापौर म्हणाले.खाजगी बसेसना शहराबाहेर थांबा मिळावा व नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी अनेक बैठकी घेतल्या.विशेष म्हणजे ‘महापौर निधी’चा उपयोग सुलभ शौचालयासाठी देण्यात आला मात्र माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापौर निधीतून एक ही पैसा खर्च होऊ दिला नसल्याची खंत यावेळी महापौरांनी व्यक्त केली.महापौर निधीतून एक ही पैसा खर्च न होणे ,मनपाच्या इतिहासात ही देखील एकमेव बाब ठरणार असल्याचा टोला त्यांनी हाणला.

शहरात १० मार्च रोजी पहीला कोविड रुग्ण आढळला. यानंतर २४ मार्चपासून देशातच लॉक डाऊन लागले.या दरम्यान ८० स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने १३ लाखांच्या वर फूड पॅकेट्सचे वितरण करण्यात आले.शहराबाहेर जाण्यासाठी जे प्रवासी अडकून पडले होते त्यांची दोन दिवस जाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली.४० हजार विस्थापितांना दररोज मनपातर्फे भोजन देण्यात आले.नागपूरात अडकून पडलेले १२२१ विद्यार्थ्यांना नियमित भोजन पोहोचवण्यात आले.१७८४ दिव्यांगाना रेशन किट वाटण्यात आली.अनेक सामाजिक संस्थांच्या सहयोगाने भोजनाची थाळी,रेशन किटचे वाटप करण्यात आले.

मुुंढेंच्या काळात रुग्णवाहिकांची संख्या ७ होती ती विद्यामान मनपा आयुक्त बी.राधाकृष्णन यांच्या सकारात्मक सहकार्याने २० झाली.यानंतर ही संख्या ६५ वर पोहोचली.सीएसआर फंडातून मेयो,मेडीकल व एम्समध्ये २ कोटींची मदत माझ्या व मनपाकडून देण्यात आल्याचे महापौर यांनी सांगितले.एचडीएफसीमधील सीएसआर फंडातूनच मनपाने अद्यावत वैद्यकीय सामग्री असणारी रुग्णवाहीका नागपूरकरांच्या आरोग्यसेवेसाठी घेतली.याशिवाय देशात कुठेही असा उपक्रम राबविण्यात आला नाही व ज्याचे देशभरात विशेष कौतूक झाले असा इंडियन मेडीकल असोसिएशनच्या सहकार्यातून करोनासंबधी दररोज लाईव्ह माहिती प्रसारित करण्यात आली,यात शहरातील निष्णात डॉक्टर्सचा सहभाग लाभला.याशिवाय १२ कोविड सेंटर असलेल्या बसेस नागरिकांसाठी शहरात धावल्या.

जवळ जवळ १० मार्चपासून तर १ नोव्हेंबरचा काळ हा कोविडसंबधी अडचणींमध्येच गेला यानंतर पदवीधर निवडणूकीची आचारसंहिता लागली.५ डिसेंबर रोजी आचार संहिता संपली मात्र गेल्या आठ महिन्यांपासून गांधीबाग,मस्कासाथसारख्या गर्दीच्या बाजारभागात फिरलो तेव्हा करोना झाला नाही मात्र ६ डिसेंबर रोजी मला करोनाने गाठलेच,असे महापौर म्हणाले.आज डॉक्टर यांच्या सल्ल्यानेच पत्र परिषद घेऊ शकलो.पक्ष् श्रेष्ठींच्या निर्णयाप्रमाणे उर्वरित १३ महिन्यांच्या कालावधीसाठी आता दयाशंकर तिवारी हे महापौर पद सांभाळतील.
भाजप पक्ष् हा शिस्तीत चालणारा पक्ष् आहे.दिलेली जवाबदारी कुठलीही कूरबूर न करता पार पाडणे हे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या रक्तातच असल्याचे ते म्हणाले.

ओसीडब्ल्यू’प्रकल्पाचे पंतप्रधान मनमाहेनसिंह यांनीच केले कौतूक!
प्रसार-प्रचार माध्यमातून वाचण्यात आले की महाविकासआघाडी सरकार आता मनपातील ओसीडब्ल्यू प्रकल्पाची संपूर्ण चौकशी करणार आहे,एवढेच नव्हे तर या प्रकल्पाला परवानगी मागणारे अधिकारी यांची देखील चौकशी होणार,मूळात या प्रकल्पाचे स्वत: युपीए सरकारच्या काळात पंतप्रधान डॉ.मनमाेहन सिंह यांनीच कौतूक केल्याचे महापौर म्हणाले.हा सर्वोत्तम प्रकल्प देशात सर्वदूर राबविला गेला पाहिजे,अशी सिफारश मनमोहनसिंग यांनीच केली होती. मात्र आघाडी सरकार फक्त राजकारण करीत आहे. ७० वर्षांमधून ५५ वर्ष नागपूरात काँग्रेसचे शासन होते.मात्र ५५ वर्षांत काँग्रेसने फक्त १५ टाक्या बनवल्या मात्र भाजप मनपात सत्तेत आली व गेल्या १४ वर्षांत आम्ही ५५ टाक्या बनवल्या,अमृत योजनेअंतर्गत आणखी ३० टाक्यांची निर्मिती होत आहे.५५ वर्षांत १५ टाक्या ही काँग्रेसची उपलब्धी असल्याचा टोला महापौरांनी हाणला.आघाडीचे सरकार हे निवडणूकीचे वर्ष बघूनच चौकशी करण्याचे राजकारण करीत आहे. दूर्देवाने चौकशीच्या नावाखाली शहरातील जनतेच्या विकासासाठी राबविले जाणारे सर्व प्रकल्पच थांबवण्यात आलेत.केवळ राजकारणासाठी प्रस्ताव थांबवण्यात आले आहेत.प्रकल्पांमध्ये अडथळे निर्माण करण्यात आले.आम्ही कोणत्याही चौकशीसाठी तयार आहोत.दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात,गडकरी,बावणकुळे यांच्या मार्गदर्शनात आम्ही सर्व विकासाचे प्रकल्प शंभर टक्के विकास मार्गावर घेऊन जाणार आहोत.दयाशंकर तिवारी हे पक्ष्ाचे ज्येष्ठ नेते आहेत,मी त्यांच्या लहान बंधू प्रमाणे संपूर्ण संघर्षात मेहनतीने उभा राहील,असे महापौर यांनी सांगितले.

याप्रसंगी त्यांच्या १३ महिन्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक आव्हानात्मक काय होते,यावर बोलताना कोविड काळ हाच सर्वाधिक आव्हानात्मक असल्याचे ते म्हणाले.नागपूर मनपालाच नव्हे तर पंतप्रधान मोदींसाठी देखील करोना महामारीचा प्रकोप हा नवीन असल्याचे ते म्हणाले.माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळाबाबत विचारले असता,मुंढे यांची एकाधिकारशाही होती,असा आरोप महापौरांनी केला,मात्र मुंढे जाताच ८ व्या दिवशी ९ मध्ये भर पडून २० रुग्णवाहीका जनतेला उपलब्ध झाल्या याकडे त्यांनी लक्ष् वेधले.१५ ऐवजी ७० रुग्णालये कोविड सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या.प्रत्येकाची कार्यशैली वेगळी असते हे मी मान्य करतो.माझ्या महापौर पदाच्या कार्यकाळात मी ३ आयुक्तांसोबत काम केले,अभिजित बांगर,तुकाराम मुंढे तसेच आताचे राधाकृष्णन बी.पदाधिकारी व प्रशासनाने समन्वयाने काम केले तरच गाडी वेगाने धावू शकते.

मुंढे यांच्या विरोधाचा फटका पदवीधरच्या निवडणूकीत बसला का? या प्रश्‍नाचे उत्तर देताना हा निव्वळ गोड गैरसमज असल्याचे त्यांनी सांगितले.

पदवीधर मतदार यादीतील जवळपास २० ते २२ हजार सवर्ण मतदारांची नावे गहाळ झालीत याचा फटका निवडणूकीत बसला का?कारण १८ हजार ९६० मतांनी पराभव स्वीकारावा लागला,अशी विचारणा केली असता,भाजप हा केवळ सवर्णांचा पक्ष् नाही,तो दीन दलित,ओबीसी इ.सर्वच घटकांचा पक्ष् असल्याचे ते म्हणाले.असे जर नसते तर ४२ हजारांच्या घरात मते मिळाली नसती,मात्र तरी देखील येणा-या काळात पराभवासाठीच्या कारणांचा शोध घेतला जाईल तेव्हा मतदार यादीतील घोळ यावर देखील लक्ष् पुरविण्यात येईल,असे ते म्हणाले.
५२ वर्षात प्रथमच भाजप पदवीधर निवडणूकीत पराभूत का झाला?या प्रश्‍नावर बोलताना नुकतेच करोना विषाणूच्या संसर्गातून बाहेर पडलोय,अद्याप शारिरीक मानसिक दुर्बलता जाणवतेय,आणखी १५ दिवसांचा कालावधी गेला की पराभवासाठी कारणीभूत ठरणा-या विविध कारणांचे वस्तूनिष्ठ मूल्यमापन करुन पुन्हा तुमच्या समोर येईल,असे महापौर यांनी सांगितले.

यानंतर पुन्हा मनपा निवडणूक लढणार का?या बाबत बोलताना १०० टक्के लढणार नसल्याचे ते म्हणाले.२० ऑगस्ट रोजी मी ही घोषणा केली,एकदा महापौर पद भूषविल्यानंतर पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून येणे योग्य वाटत नाही.त्यावेळी पदवीधर निवडणूक लढणार असल्यानेच मी ही घोषणा केली,या आरोपात तथ्य नाही,तसे असते तर ५० हजार मतदारांचे अर्ज आधीच भरुन टाकले असते.९ नोव्हेंबर रोजीच पक्ष्ातर्फे माझी उमेदवारी निश्‍चित झाली,असा खुलासा त्यांनी केला.मध्यंतरी मी महापौर पदाचा राजीनामा दिला,हे धादांत खोटे आहे,तो प्रचार चुकीचा असल्याचे ते म्हणाले.महापौर म्हणून समाधानी आहात का?या बाबत बोलताना मुळीच नाही,अनेक गोष्टी करता आल्या असत्या,सुलभ शौचालये,अर्धवट सिमेंट रस्त्यांचे काम,उद्याने मात्र ही सगळी कामे राहून गेली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

आघाडीची आकांक्ष्ा म्हणजे ‘मुंगेरीलाल के हंसी सपने’-
पुढील वर्षी मनपावर आघाडीची सत्ता येणार,हे स्वप्न म्हणजे ‘मुंगेरीलाल के हंसी सपने’असल्याची टर महापौरांनी उडवली.एक पदवीधर जिंकले म्हणजे सगळीच स्वप्ने पूर्ण होत नसतात.बजेट मंजूर झाले तरी विकासकामांना निधी मंजूर होत नसल्याकडे लक्ष् वेधले असता,ही काँग्रेसची जुनीच खोड असल्याची टिका महापौरांनी केली.विकास कामांना खिळ बसावी,व येत्या निवडणूकीत त्याचा लाभ घेता यावा,हा त्यांचा खेळ जुनाच आहे.आयुक्तांच्यामार्फत विकास कामांना खिळ बसवली जात आहे. नागपूरकर जनतेला माहीती आहे या मागील‘बोलवते धनी’कोण आहेत?या ही विरोधात भाजप पक्ष् हा संघर्षाची भूमिका घेणार असल्याचे ते म्हणाले.

महापौर यांच्यासोबतच उपमहापौर मनीषा कोठे यांनी देखील आज आपला राजीनामा आयुक्तांना सोपवला.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या