फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमहापालिकेत नाही तुम्ही विधी मंडळात पाहीजे:अजित पवार

महापालिकेत नाही तुम्ही विधी मंडळात पाहीजे:अजित पवार

Advertisements

आभा पांडे यांचा दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रवादीत प्रवेश

नागपूर,ता. ७ फेब्रुवारी:जेवढे मला करता येईल तेवढाच मी शब्द देत असतो.तुम्ही ज्या निष्ठेने राष्ट्रवादी पक्ष्ात आला,बेरजेचं राजकारण केलं,तुमचं मनेागत ऐकताना पक्ष्ाचे नेते शरद पवार यांच्याविषयी अभिमान दाटून आला,त्यांनीच राजकारणात महिलांना ३३ टक्के आरक्ष् णाचा कायदा आणला त्यामुळेच आज आभा पांडे यांच्यासारख्या धडाडीच्या महिलेला राजकारणात ही उंची गाठता आली,मी कोणाच्या अपेक्ष्ा वाढवत नाही मात्र तुमची पात्रता ही महानगरपालिकेसाठी नसून तुमच्यासारख्या महिलेने विधी मंडळात असायला हवे,असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

ते शांतीनगर येथील मुदलियार लॉन येथे आयोजित अपक्ष् नगरसेविका आभा पांडे यांच्या पक्ष् प्रवेश सोहळ्यात बोलत होते.याप्रसंगी मंचावर राष्ट्रवादीचे नेते प्रफूल्ल पटेल,आ.सलील देशमुख,आ.प्रकाश गजभिये, माजी आमदार दिनानाथ पडाेळे,शहराध्यक्ष् अनिल अहीरकर,नगरसेवक दुनेश्‍वर पेठे,प्रशांत पवार आदी नेते उपस्थित होते.याप्रसंगी बाेलताना अजित पवार म्हणाले,की गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आधीच सांगितले होते की दिमाखदार सोहळ्यात मला उपस्थित राहायचे आहे.मी आणि प्रफूल्ल पटेल यांनी शब्द दिला होता.दूर्देवाने अनिल देशमुख यांना करोनाची बाधा झाली,मात्र मी वी.सी वरुन सोहळ्यात उपस्थित राहील मात्र आभा पांडे यांचा पक्ष्ांतर सोहळा हा पुढे ढकलू नये अशी त्यांची ईच्छा होती.आजचा दिवस खरंच पक्ष्ासाठी अानंदाचा दिवस असल्याचे ते म्हणाले.
उत्तराखंडात आज हिमकडा कोसळल्यामुळे ज्या निष्पाप मजुरांचा हकनाक बळी गेला त्यांना भापवूर्ण श्रद्धांजली वाहत या पुढे देशात कुठेही अश्‍या दूर्देवी घटना घडता कामा नये,असे ते म्हणाले.त्यांच्या कुटुंबियांना हे दू:ख सहन करण्याची ताकद मिळाे,अशी प्रार्थना त्यांनी केली.शरद पवार यांच्या नेतृत्वावर व पक्ष्ाच्या ध्येय धोरणांवर निष्ठा ठेऊन आभा पांडे यांचा आज पक्ष् प्रवेश झाला आहे,याचा मला आनंद झाला.मी लक्ष् पूर्वक आभा पांडे यांचे मनोगत ऐकत होतो,ज्या पोटतिडकीने त्यांनी आपली भूमिका मांडली,ती कौतुकास्पद असल्याचे सांगून मी आणि प्रफूल्ल पटेल हे १९९१ पासून राजकारणात आहोत,आम्ही आपल्या राजकीय जिवनात अनेक चढ-उतार बघितले.राजकीय व्यक्तींची आम्हाला योग्य ओळख आहे.

आभा पांडे यांनी अपक्ष् म्हणून निवडणूक लढवली.कोणत्याही पक्ष्ाचे पाठबळ नसताना घरातला कर्ता पुरुष ज्यप्रमाणे कुटुंबियांची काळजी घेतो,त्याप्रमाणे त्यांनी आपल्या प्रभागातील जनतेवर लक्ष् ठेवले.आज येथे कार्यक्रमस स्थळी जो प्रचंड जनसमुदाय उपस्थित आहे ही त्यांच्या कामाचीच पावती आहे.नाहीतर देशातील काही पुढारी कसे पैसे देऊन माणसे आणतात तरीही खुर्च्या मोकळ्याच दिसतात,भाषणे लांबली की उरली सुरली जनता ही पाय काढते,असा टोला हाणीत,आजची गर्दी मात्र स्वयंफूर्त असल्याचा गौरवोद्गार केला.

पाच वर्षा पासून राज्यात भारतीय जनता पक्ष्ाची सरकार होती.देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते.मात्र कायदा,सुव्यवस्थेची काय अवस्था होती?नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे मात्र त्यांच्याच काळात नागपूर ही ‘क्राईम कॅपिटल’म्हणून ओळखल्या जाऊ लागली!गुंडांना त्यांनी महामंडळांवर बसवले,लाल दिव्यांची गाडी दिली,असा घणाघाती हल्ला करीत स्वार्थाकरिताच असणा-या कुठल्या लोकांचे समर्थन तुम्ही नागपूरकर करता?असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.लोकांचा विश्‍वासघात करणारे त्यांचा कारभार होता.गोर गरीबांच्या शिक्ष् णात देखील भ्रष्टाचारच केला.लुबाडणूक केली. जे विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत,जवाबदार नागरिक म्हणून घडणार होते,त्यांच्याच मनपा शाळेतून संडास गायब केले?

आभा पांडे यांनी आपल्या भाषणात सांगितले ते ऐकून धक्काच बसला.रस्ते गायब होतात हे ऐकले होते मात्र नागपूरातील गोर गरीब विद्याथ्हर्थ्यांसाठी महानगरपालिकेच्या शाळेती संडासच गायब करुन टाकले?फाईल पाच संडासाची तयार झाली,प्रत्यक्ष् शाळेत तीनच संडास!भाजपचे सत्ताधारी संडास देखील बेपत्ता करतात हे पहील्यांदात ऐकले.कुठल्या पातळीवर ते जाऊ शकतात,हे समजले.मिळालेल्या सत्तेचा वापर सर्वसामान्य जनतेसाठी करायचा असतो. सत्तेची धुंधी डोक्यात जाऊ द्यायची नसते,अश्‍या शब्दात त्यांनी भाजपला टोला हाणला.नागपूरात असा कारभार करताना मस्तवाल झाला का?असा संतापही व्यक्त केला.आभा पांडे यांनी सांगितल्याप्रमाणे मनपाच्या दवाखान्यातून डॉक्टरच बेपत्ता होते?शासनाचा पगार घेता,त्यांच्या पगारावर शासन कोट्यावधी पैसा खर्च करते.गोर गरीब जनतेच्या आरोग्यासाठी असणा-या दवाखान्यात अनुपस्थित राहून आरोग्याची थट्टा मस्करी करतात का?अश्‍या डॉक्टरांना तर त्वरीत निलंबित करायला हवे होते.एकदाच संधी देतोय,या पुढे माझे लक्ष् राहणार आहे,गोर गरीब जनतेच्या आरोग्याची अशी हेलसांड केली तर स्पष्टपणे सांगतोय,नोकरी राहणार नाही,घरी बसावे लागेल अश्‍या शब्दात त्यांनी इशारा दिला.

करोनासारख्या अत्यंत कठीण काळात पोलीस विभाग,पॅरा मेडीकल, अंगणवाडी सेविका,आशा वर्कस,स्वच्छताकर्मी,डॉक्टरर्स,परिचारिका वर्ग इ.यांनी खूप मोलाचे काम केले. पोलिसांवर तर विमानाने फूले उधळण्यात आली हे संपूर्ण जगाने पाहीले.करोनामुळे देशच नाही तर या महामारीमुळे संपूर्ण जगच हादरले.कसे होणार?या विवंचनेत संपूर्ण जग हादरले मात्र पोलिस डगमगले नाहीत.राज्य सरकार त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभी राहणार,काही कामचूकार यांचा अपवाद सोडला तर,पोलिसांचे काम खरंच वाखाण्याजोगेच होते. आभा पांडे यांनी मनपातील ऐवजदार,स्वच्छता कर्मचारी यांच्याबाबतीत ज्या मागण्या केल्या आहेत,त्यासाठी मुंबईत लवकरच बैठक घेऊ.यासाठी आभा पांडे,अनिल अहिरकर,रमेश बंग,गृहमंत्र्यांसोबत बैठक घेता येईल.

अनिल देशमुख आणि रमेश बंग यांना एकसाथ करोनाने गाठले,त्यांच्यातील ‘समीकरण‘ काही सूटत नाही,अशी मिश्‍कीली करीत अाता करोनावरील सिरमची लस बाजारात आली आहे,त्यामुळे गृहमंत्री लवकरच क्वारंटाईनमधून बाहेर पडतील.उपजराजधानीचा सबळ व निर्मळ विकास झाला पहिजे.कुठल्याही घटकावर अन्याय होता कामा नये.आभा पांडे यांचे भाषण ऐकल्यावर कळले भाजप हे काहीच लक्ष् देत नाही,साधी माणूसकी जिथे दाखवायची ती देखील दाखवित नाही.केंद्रात दोन टर्ममध्ये ते सत्ताधारी आहेत,राज्यात त्यांची सत्ता होती,फडणवीस हे मुख्यमंत्री,बावणकुळे उर्जामंत्री,मुनगंटीवार हे वनमंत्री व अर्थमंत्री अशी महत्वाची खाती विदर्भाकडे होती मात्र याचा माझ्या नागपूरसाठी काय उपयोग झाला?

नागपूरच्या जनतेने त्यांना संधी दिली होती मात्र त्यांनी जनतेसाठी काय केले?त्यांच्याकाळात तर करोना ही नव्हता!फडणवीस यांना तर नागपूरकर जनतेने ऐन तरुण वयात महापौर होण्याची संधी दिली,मात्र त्यांचेच प्रश्‍न ते सोडू शकत नाही,वरुन याचे शल्य देखील त्यांना बोचलं नाही?कचरा व्यवस्थापनात सपशेल अपयशी ठरले,आभा पांडे यांनी श्‍मशान भूमीचे जे वर्णन भाषणात केले ते ऐकून अंगावर शहारे आले.काळाचे,नियतीचे बोलावणे कधीही येऊ शकतं.बोलावणे आले की जायचे असते,प्रत्येक धर्म,पंथ,जातीचा माणूस जात असतो,तिथं ही भाजपच्या सत्ताधा-यांचे असे दूर्लक्ष्?काय माणसे आहेत ही?नागपूरकर जनता काय अपेक्ष्ा करीत असतील यांच्याकडून?

आभा पांडे यांनी भाजपच्या भ्रष्टाचारावर ज्या बाबींचा उल्लेख केला त्या सर्वांचे पुरावे त्यांनी मी आज आणि उद्या नागपूर व अमरावतीत आहे, मला आणून द्यावीत,पुरावे उद्याच आणून द्या,मी उगाच कोणामागे चौकशी लावणारा माणूस नाही,कोणाला त्रास देण्याची मंशा ही नाही मात्र गोर गरीब जनतेला लुबाडण्याचा प्रयत्न झाला असेल तर कारवाई ही झालीच पाहिजे.सर्व प्रश्‍नांवर मुंबईत बैठक लावली जाईल.तुमचे प्रश्‍न धसास लावाले जातील.जे मला नागपूरकरांसाठी करता येईल ते मी नक्की करणार आहे,असा मी तुम्हाला शब्द देतो.
पुरुषांपेक्ष्ा महीला या राजकारणात संधीचं सोनं करतात.आज आभा पांडे यांनी जे भाषण केले आहे.ते शरद पवार यांच्या महिलांच्या आरक्ष् णाच्या धोरणामुळेच शक्य झाले.आभा पांडे यांनी म्हणूनच आता विधान सभेचा विचार करावा.काळानुरुप माझा पक्ष् पुढचे निर्णय घेईल.ज्यांच्यात धमक आहे,ताकत आहे,अश्‍यांकरिता महानगरपालिका नव्हे त्यांनी विधी मंडळात असायला हवं.मी कोणाची अपेक्ष्ा वाढवत नाही,अशी पुश्‍ती ही त्यांनी जोडली.

कडक मुंढे पाठवले होते!

मी तुमच्या नागपूर शहराचा कार्यभार सुधारण्यासाठी कडक तुकाराम मुंढे मनपा आयुक्त पदी पाठवले होते मात्र तुम्ही त्यांना कंटाळला त्यामुळे आम्ही त्यांना परत बोलावंल,असा टोमणा ही अजित पवार यांनी आपल्या भाषणात हाणला.वेडीवाकडी कामे करणा-यांचे त्यामुळे फावले. जनतेचा पै न पै सत्कारणी लागला पाहिजे.आभा पांडे यांनी अत्यंत बारकाईने मनपाच्या कारभाराचे मुद्दे भाषणात मांडले.राष्ट्रवादी पक्ष् हा माणसे जोडण्याचे काम करतो.आभा पांडे यांच्यासारख्या महिला आज राष्ट्रवादीसोबत जुळल्या,या माझ्या भगिनी सोबत या पुढे राष्ट्रवादी आता एकत्र काम करणार.

काळ बदललाय,शरद पवार किवा मी अनेक दशकांचे आमचे राजकारण झाले.सोशल मिडीया आला.काळानुरुप आपणही बदलायला हवे.चांगली माणसे आम्ही पक्ष्ात घेण्याचा निर्धार केला आहे.आभा पांडे यांच्यासारख्या तत्परतेने काम करणा-या महिलेमुळे या परिसरात आता राष्ट्रवादी वाढणार आहे,याची मला खात्री आहे.लोकांचे प्रश्‍न सुटले पाहीजे.यासाठी मंत्री जयंत पाटील,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,काँग्रेस पक्ष् हे सर्व सोबत मिळून जातीयवादी,विखारी प्रचाराच्या विरोधात काम करु,असे ते म्हणाले.जाती-जातीत,धर्मा-धर्मात अंतर पडू नये राष्ट्रवादीची हीच भूमिका असल्याचे ते म्हणाले.

महापौरांना येथल्या लोकांनी घरी बसवले!

याप्रसंगी बोलताना नुकतेच पदवीधर मतदार संघात वैदर्भिय सुशिक्ष्ति मतदारांनीच महापौरांनाच पाणी पाजले,शिकल्या सवरल्या लोकांनी महापौरांना पाणी पाजण्याचे काम केले असा टोला हाणीत केंद्रात मोदी सरकार दुस-यांदा आले मात्र जगाचा पोशिंदा असणा-या शेतक-यांचीच काय अवस्था केली?आंदोलन करु नये म्हणून रस्त्यांवर खिळे ठोकलेत?कुठल्या सरकारने असे केले?इंग्रजांच्या काळात आपण गेलो आहोत का?शेतक-यांना न्याय द्यायला तयार नाहीत,विरोधी पक्ष्ाच्या खासदारांना आंदोलनकांसोबत भेटू दिले नाही,ही कुठली दादागिरी?जी जनता अश्‍या राजकारण्यांना डोक्यावर बसवते ना तीच डोक्यावरुन खाली ही पाडते,अशा इशारा त्यांनी दिला.
सत्ता येत असते,जात असते,डोक्यात सत्तेची मस्ती जाता कामा नये.करोनामुळे देशाचा विकास दर घटला,काय अर्थसंकल्प दिला आहे अर्थमंत्र्यांनी?गॅस सिलेंडर,पेट्रोल,डिजेल सर्व महाग केलं.हे सराकरा गाेर गरीबांचे आहे की मूठभर उद्योगपतींचे?नागपूरकरांनो विचार करा,पूर्वी टाटा,बिर्ला होते आता कोणते उद्योगपती आहेत?या तुमच्या शांतीनगरमध्ये मुस्लीम आहेत,अल्पसंख्यांक आहेत,बारा बलुतेदार अाहेत,तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या पक्ष्ाला संधी दिली आता एकदा राष्ट्रवादीला संधी देऊन बघा,असे आवाहन त्यांनी केले.
पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकेत राष्ट्रवादीला लोकांनी निवडून दिले.अाज आभा पांडे या राष्ट्रवादी झाल्या.त्यांच्या मदतीने इथला परिसरही राष्ट्रवादीमय होईल आता अशी कृती करावी लागेल.अहीरकर यांची मदत त्यांना होईल.माझ्या उपमुख्यमंत्री पदाची देखील पूर्ण ताकद मी त्यांच्या मागे लावायला तयार आहे.

समाजाला आता परिवर्तन हवे आहे.भाजपला ते परिवर्तन झालेले दाखवायचे आहे.‘ये तो बस शुरवात है आगे आगे देखीये होता है क्या?’आज आमचे नेते शरद पवार हे ऐंशी वर्षाचे आहेत तरीही काम करीत आहेत.समाजाच्या कुठल्याही घटकाला,शेतकरी,व्यापारी,विद्यार्थी यांना आवश्‍यकता भासल्यास त्यांच्या हिताचे निर्णय ते आपलेपणाने देतात.

आता या पुढे विदर्भाला राष्ट्रवादीमय करण्याचा प्रयत्न करु.यासाठी आभा पांडे यांना भाऊ या नात्याने मी सर्वतोपरी मदत करील. भावाकडे आलेल्या बहीणीचा हात मी खाली जाऊ देणार नाही यासाठी शब्द देतो.आपल्या मराठीत एक म्हण आहे ’आगीतून फूफाट्यात’असे आभा ताईना कधीच वाटणार नाही.उलट आधीच राष्ट्रवादीत का आलो नाही असे वाटून आणखी चांगले झाले असते असे त्यांना वाटेल तसा सन्मान त्यांना राष्ट्रवादीत मिळेल,असे आश्‍वासन ही यावेळी अजित पवार यांनी दिले.

आभा पांडे या तर नागपूरच्या लढवैय्या झाशीची राणी-प्रफूल्ल पटेल
अनिल अहिरकर यांनी आभा ताईसाेबत माझी पहीली भेट विमानतळावर घालून दिली होती.त्या वेळी त्या एक नगरसेविका म्हणून मला भेटल्या होत्या. आज या मंचावर मला त्यांच्यातील राजकारणी बघायला मिळाला.त्यांच्या समाजकार्य,राजकारणाची खोली समजली,त्यांचे ओजस्वी भाषण ऐकले आणि ज्या प्रमाणे आपण अश्‍या लढवय्या महिलांना ‘झाशी ची राणी’संबोधतो त्याचप्रमाणे आभा पांडे या नागपूरच्या लढवैय्या झाशीच्या राणी आहेत,अश्‍या शब्दात प्रफूल्ल पटेल यांनी आभा पांडे यांचा गौरवोदग्ार केला.
एक उत्कृष्ट काम करणारी,चांगली प्रतिमा असणारी महिला पक्ष्ात प्रवेश करतेय याचा मला विशेष आनंद आहे.मी मनापासून त्यांचे पक्ष्ात स्वागत करतो,असे ते म्हणाले.माझा पक्ष् शरद पवार,जयंत पाटील,अजित पवार यांच्या नेतृत्वात चांगल्या पद्धतीने काम करत आला आहे.गेल्या साठ वर्षांपासून पवार यांच्यासारख्या जाणत्या राजाने महाराष्ट्रात एखाद्य योद्धाप्रमाणे काम केले.

मात्र विदर्भात एक गैरसमज ठलकपणे आढळतो तो म्हणजे राष्ट्रवादी हा फक्त पश्‍चिम महाराष्ट्राचा पक्ष् आहे!मी नागरी उड्डयन मंत्री असताना विदर्भाबाबतची कोणतीही मागणी राज्यातील राष्ट्रवादी सरकारने त्वरित पूर्ण केली.नागपूरच्या विकासासाठी अनेक योजनांसाठी निधी दिला.मात्र आम्ही त्याचा प्रचार-प्रसार केला नाही.नागपूरात किवा विदर्भात आमच्याकडून थोडी कमी राहीली हे आम्ही कबूल करतो.म्हणूनच या पुढे आता विदर्भात राष्ट्रवादी वाढवण्यासाठी जोराने प्रयास सुरु केला.

तीन तीन वेळा वेगवेगळ्या प्रभागातून निवडून येणे हे वाटते तेवढे सोपे नाही.एवढी चांगली नगरसेविका तुम्हाला मिळाली,हे तुमचेच भाग्य आहे.आभा ताई तुम्हाला येथील जनता तर खूप प्रेम करतेच अाहे मात्र आम्ही तुम्हाला आणखी बळ देऊ.काम आणखी वाढवू. भाजपचा भ्रष्ट कारभार,चुकीची कामे यांची तुम्ही आपल्या भाषणात अनेक उदाहरणे दिलीत,आता अहिरकर व तुम्हाला सोबत घेऊन आम्ही मनपा निवडणूकांसाठी एक चमूच तयार करु.

मनपा निवडणूकीत राष्ट्रवादीला पहील्या क्रमांकाचा पक्ष् बनवू,असा निर्धार करा.मी नागपूरला नेहमीच येत असतो.मात्र नागपूरकडे आजपर्यंत आम्ही लक्ष् दिले नाही मात्र या पुढे आता असे होणार नाही.आता आम्ही हे चित्र पालटणार आहोत.नागपूरात मोठमोठ्या घोषणा तर खूप झाल्यात. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे गेल्या ७ वर्षांपासून केंद्रात मंत्री आहेत,काय केले त्यांनी?फक्त सिमेंटचे रस्ते आणि उड्डाण पूल म्हणजेच विकास आहे का?त्यातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला!
मिहानची दशी बघितली का?५३ टक्के राज्य आणि ५७ टक्के केंद्र मिळून नागपूरचे विमानतळ आम्ही हस्तांतरित केले होते.अद्याप ही ते तसेच आहे.पाच वर्षात फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात विमानतळाचे काहीच काम सुरु झाले नाही.मिहानच्या मार्फत तर नागपूर शहराचे चित्रच बदलू शकले असते.नागपूरच्या मुलांना पुणे-मुंबईकडे जावे लागत आहे.नागपूरात राष्ट्रवादीच्या माध्यमातून काम करुन दाखवले तर पूर्ण विदर्भात पक्ष्ाची ताकद दिसेल.पक्ष् कश्‍याप्रकारे काम करतो हे तुम्हाला कळेल.तुमचे परिश्रम मन जिंकेल आणि लोकच तुम्हाल प्रमाणपत्र देतील.अजित पवार यांनी देखील हेच सांगितले आहे,उद्याच्या विदर्भाचे चित्र वेगळे राहणार आहे.त्यासाठी लोकांची चांगली सेवा करण्याचा निर्धार आतापासूनच करा,असे आवाहन याप्रसंगी पटेल यांनी केले.

आभा पांडे यांच्या प्रवेशामुळे पक्ष्ाची ताकद वाढेल:अनिल देशमुख
गृहमंत्री अनिल देशमुख यांना करोना झाला असल्यामुळे त्यांनी या कार्यक्रमात वी.सी.च्या माध्यमातून सहभाग नोंदवित रुग्णालयातूनच आभा पांडे यांना शुभेच्छा देत आभा पांडे यांच्या प्रवेशामुळे पक्ष्ाची ताकद वाढणार असल्याचे सांगितले.मंचावर उपस्थित अजित पवार तसेच प्रफूल्ल पटेल या दोन्ही नेत्यांच्या उपस्थित मी हेच सांगेल की आपला मानसन्मान सर्व सहका-यांसह पक्ष्ात ठेवला जाईल.

९० टक्के समाजकारण १० टक्के राजकारण हेच माझ्या यशाचं गमक:आभा पांडे

पक्ष् प्रवेशप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना आभा पांडे म्हणाल्या की मी आजपर्यंत ९० टक्के समाजकारण तर १० टक्केच राजकारण केले.१९९७ पासून माझी राजकारणात सुरवात झाली.अनेक अडचणी आल्या,अनेक संघर्षांवर मात केली.मात्र माझी जनता कायम माझ्यासोबत राहीली,याचा मला सार्थ अभिमान आहे.माझ्याकडे डोळ्यात अश्रू घेऊन येणारा माणूस हसत जातो.त्याच्या चेह-यावरीच कृतज्ञता बघून माझं मन समाधानाने भरुन जातं.खूप काही कमावले,असं मला वाटतं.मी अनेक श्रीमंत लोकं बघितली मात्र माझ्या पाठीशी एवढी जनता आहे की मी स्वत:ला करोडपतीच समजते.

मला याच जनतेने एक वेळ नाही तर तीन वेळा निवडून दिलं.२०१७ ची निवडणूक तर मी कोणत्याही पक्ष्ाचे पाठबळ नसताना ७२ हजार मते घेऊन जिंकले.भारतीय जनता पक्ष्ाचे दोन दोन आमदार,कृष्णा खोपडे व विकास कुंभारे हे माझ्या विरोधात प्रचार करीत होते तरीही जनतेने माझ्यावर विश्‍वास ठेवला.

मनपात मी स्थायी समितीची अध्यक्ष् देखील राहीले.यामुळे अनेक आर्थिक बाबी कळल्या.नागपूर सुधार प्रन्यासशी विशवस्त म्हणूनही काम पाहीले.या पदावर असताना अनेक ले-आऊट धारकांना न्याय मिळवून दिला.मनपा सभागृहात आयएएस अधिकारी असणारे मनपा आयुक्तांसोबत वन टू वन संवाद साधला.सभागृहात आपले सादरीकरण प्रभावी असले तर पक्ष्ाची देखील प्रतिष्ठा वाढते.फक्त फेसबूक,सोशल मिडीयावर माझे काम नाही माझे काम हे जमीनीवरचे आहे.

आेसीडब्ल्यू या एजंसीला जेव्हा भारतीय जनता पक्ष्ाच्या सत्ताधा-यांनी शहरातील पाणी पुरवठयाचे चोवीस बाय सातचे काम सोपवले तेव्हा माझ्या प्रभागतील एका एका थेंब पाण्यासाठी मला आंदोलन करावे लागले.सभागृहात महापौर पदी एक महीलाच होती. मी पाण्यावर प्रश्‍न विचारणार आहे हे एजेंडामध्ये असतानाही त्यांनी माझा प्रश्‍न पुकारला नाही आणि पुढचा प्रश्‍न पुकारला.यामुळे मला संताप आला आणि मी एजेंडाची ती प्रत फाडली व महापौरांच्या तोंडावर फेकला व सभागृहाचा त्याग केला.पत्रकारांनी मला प्रश्‍न विचारला,मी हेच सांगितले जोपर्यंत माझ्या प्रभागातील पाण्याचा प्रश्‍न सुटत नाही मी पाण्याचा थेंबही ग्रहण करणार नाही.

माझ्या कार्यकर्त्यांसह मी उपोषणाला बसले.तब्येत बिघडू लागताच मला रुग्णालयात भर्ती करण्याचा घाट घालण्यात आला मात्र मी आयुक्तांना यासाठी नकार दिला. शेवटी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवर चर्चा केली,सत्ताधारी नेते रात्री दीड वाजता आंदोलन स्थळी आलेत,अटी मान्य केल्या व माझे उपोषण सुटले.

मनपात भाजपच्या काळात एक एक प्रथा निर्माण झाली आहे ती म्हणजे प्रत्येक कामासाठी एजंसी आणि सल्लागार नियुक्त करणे.मग मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी कशासाठी आहेत?यावर सभागृहात मी एक तास चाळीस मिनिटे बोलली.ऐवजदारांना ॲक्यूपेंसी प्रमाणपत्र देखील मिळत नाही.मनपा शाळेचेही तेच हाल आहेत.गरीब मुले ज्या मनपा शाळेत शिकतात त्या शाळेत सर्व शिक्ष्ा अभियानाअंतर्गत शासनाकडून निधी आला.एका शाळेत पाच संडास बांधल्याचे फाईल मला आढळली.मी प्रत्यक्ष् त्या शाळेत गेले असता मला फक्त तीन संडास बांधलेले दिसले!भाजपच्या सत्ताधा-यांनी गरीब मुलांचे शाळेती संडास ही खाऊन टाकले!

८ वी.पर्यंत शिक्ष् ण आहे मात्र चित्रकला हा विषय शिकवला जात नाही मात्र दोन दोन लाखांची बिले ही चित्रकला साहित्यावर निघाली!७ हजाराच्या सायकलचे बिल निघाले ६४ हजार प्रति सायकल!मी यावर प्रश्‍न विचारु नये म्हणून सभागृहात मला दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र त्यांना ठणकावून सांगितले तुम्ही बहूमताच्या जोरावर मला येथे दाबू शकता मात्र जनतेच्या सभागृहात दाबू शकणार नाही.त्याचे ऑडीट झाले आणि घोळ समोर आला.

याच शांतीनगर मध्ये यूपीएससीचा दवाखाना आहे. या दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी दोन दवाखान्यांचा कारभार सांभाळते. माझ्याकडे अनेक तक्रारी आल्यानंतर मी स्वत: त्यांना जेव्हा जेव्हा भेटायला गेले त्या अनुपस्थित होत्या.फोन केला तर मी दुस-या दवाखन्यात असल्याचे त्या सांगत होत्या.एके दिवशी मी माझ्या कार्यकर्त्याला दूस-या दवाखान्यात पाठवले व व्हिडीयो कॉल लावायला सांगितले. त्यावेळी त्यांचा खोटेपणा सिद्ध झाला.हे दवाखाने गरीबांच्या आरोग्यासाठी असून अश्‍या अधिका-यांमुळे कोणताही फायदा होत नाही.

याच भागातील रेड लाईट भागाचा अनेक नागरिकांना त्रास होत होता.तत्कालीन पोलीस अधिकारी डीसीपी अविनाश कूमार यांच्या सहकार्याने मोठे आंदोलन छेडले.आज ७० टक्के येथूून तो व्यवसाय नष्ट झाला असून फक्त ३० टक्के उरला आहे.
मनपा कर्मचा-यांना ७ वा वेतन अायोग लागू करण्यासाठी दरवर्षी बजेट यायचं,प्रत्येक बजेटमध्ये दोन कोटींची तरतूद असायची.मात्र शेवटी आघाडी सरकारनेच ते आश्‍वासन पूर्ण केली.

करोनाच्या काळात एलेक्सीस रुग्णालयासोबत तसेच मेडीकल रुग्णालयात करोनाच्या रुग्णांसाठी लढावे लागले.त्यासाठी स्वत:कोविड वार्डात जावे लागले.शासनाकडून रुग्णालयांना निधी मिळतोय.तो करोना बाधितांच्या योग्य उपचारांवर खर्च व्हावा यासाठी भांडावे लागले.
शहरातील कचरा उचलण्यासाठी ज्या कनक एजंसीला करारपत्र दिले त्याच्या गलथान कारभारामुळे त्याच्यावर ९८ लाखांचा दंड बसवला.कनकचा व्यक्ती भेटायला आला मात्र मी माझ्या घरातून संपंन्न असल्याचे सांगून भेटण्यास नकार दिला.डेग्यू,मलेरियाचा विषय असो किवा मस्कासाथ पूलाचा विषय,प्रभागात कोट्यावीधची कामे केली.

चार वार्डाचा एक प्रभाग असल्यामुळे जनतेच्या प्रश्‍नासाठी माझे दोन कार्यालय आहेत एक शांती नगर एक इतवारीला.ही तर जिवंत माणसांसाठीची कामे होती आता मृत व्यक्तींची व्यथा सांगते.याच शांतीनगरमध्ये श्‍मशान घाट आहे.त्या ठिकाणी पाच-पाच फूटांचे खड्डे पडले होते.त्या खड्ड्यात खाली लाकडे मध्ये मृतदेह वर लाकडे ठेऊन प्रेतांना जाळले जात होते.मला ही अवस्था कळली तेव्हा श्‍मशानातही मला पोहोचावे लागले.माझ्याच समोर एक प्रेत खड्डयात पडलं आणि त्यांचे कुटुंबिय सळाखीने त्या प्रेताला वर काढण्याचा प्रयत्न करीत होते!
मी लक्ष् वेधी लावली.महापौरांनी लक्ष् नाही दिले तर त्याच खड्डयात बसून आंदोलन करेल,असा इशारा दिला,दोन दिवसात घाटावरील ते खड्डे बूजवण्यात आले.

नापगूर शहरात भारतीय जनता पक्ष्ाने मनपात फक्त भ्रष्टाचाराचा खेळ मांडला असल्याचा घणाघात याप्रसंगी आभा पांडे यांनी केला.आज फक्त माझ्या प्रभागाची जनता नव्हे तर समस्त नागपूरचीच जनता मला येऊन सांगते,ताई आता भाजपाचे काही नाही….करोनाच्या काळात सत्ताधारी असतानाही जनतेला जे हाल सोसावे लागले त्यामुळे आता नागपूरकर जनतेनेच निर्धार केला

आहे,आता परिवर्तन करणार.
या परिवर्तनाची नांदी म्हणजे माझा राष्ट्रवादीत प्रवेश आहे.या पक्ष्ाचे सर्वेसर्वा शरद पवार हे शेतक-यांचे कैवारी आहेत. ते झोपलेल्यांना उठवतात,उठलेल्यांना चालवता,चालणा-याला धावायला लावतात,धावत्या माणसाला खांद्यावर फूले,शाहू,आंबेडकराचा विकासाचा मंत्र देतात.

शहरात पक्ष् कसा वाढवता येईल यासाठी निष्ठेने काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.एक महिन्याआधी मी सांख्यिकीय अभ्यास केला किती उमेदवारांनी ५ हजारपेक्ष्ा जास्त मते घेतली आहेत ती राष्ट्रवादीच्या कामाची आहेत.स्वत: पंतप्रधान मोदी हे शरद पवार यांच्याकडे राजकारणाचे धडे घ्यायला चार वेळा गेले मी त्या पक्ष्ात आज प्रवेश घेतला आहे त्याचा आनंद होत असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी मनपाच्या ऐवजदारांसाठी त्यांनी अधिसंख्याक केलेल्यांना ७ वा वेतन आयोगाचा लाभ मिळावा,मागील फडणवीस सरकारने फक्त त्यांना लॉलीपॉपच दिला,मृतांच्या वारसदारांना नोकरीत संधी मिळावी,यातील एक वर्षाची अट काढण्यात यावी,सफाई कामगारांच्या वारसदारांना नोकरीत समाविष्ट करावे,करोनामुळे मृत पावलेल्या कर्मचा-यांना शासनाने घोषित केल्याप्रमाणे ५० लाख रु.ची निधी मिळावा.अाशा वर्कसला नियमित करण्यात यावे.अनूसुचित जमातीमधील शासकीय,निमशासकीय पदधारकांना अधिसंख्या केले आहे त्यांना त्यातून मुक्त करावे अशी मागणी त्यांनी केली.

सूत्र संचालन किशोर गलांडे यांनी केले.आभार अनिल अहीरकर यांनी मानले.

कार्यक्रमाला भरगच्च गर्दी होती.संपूर्ण परिसरात आभा पांडे यांचे मोठमोठे कटआऊट्स लक्ष् वेधत होेते.संपूर्ण परिसरात राष्ट्रवादीचे झेंडे झळकत होते. भाषणाच्या दरम्यान ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज..अजित पवार अजित पवार’‘विदर्भ का नेता कैसा हो..अनिल देशमुख जैसा हो’ आभा ताई आगे बढो.हम तुम्हारे साथ है’या ना-यांनी परिसार दणानूण गेला.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या