
अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी राजेंद्र उचके यांची पोलिसात तक्रार
आरोपीच्या पत्नीसोबत होते अनैतिक संबंध
नागपूर,ता.१० जुलै २०२२: नागपूर महानगरपालिका (NMC) ही अनेक कारनाम्यांमुळे सतत गाजतच असते,आज मात्र एका आगळ्यावेगळ्या कारणाने,एक मानवीय स्वभाव व संवेदनशील कारनाम्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली.मनपाच्या अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी राजेंद्र उचके यांनी केलेल्या तक्रारीप्रमाणे त्यांना अमित सोनी या इसमाने तब्बल एक कोटींची लाच मागितली,या मागील कारण होते अमित सोनी याच्या पत्नीसोबत उचके यांचे अंतरंग संबधांचे चित्रीकरण!
पत्नीसोबत असणा-या अंतरंग संबधांचे सगळे व्हिडीयोज व छायाचित्रे, नातेवाईकांमध्ये व्हायरल करण्याची धमकी देत, अमित सोनी याने उचके यांना तब्बल एक कोटींची लाच मागितली.उचके यांनी एवढे पैसे देण्यास असमर्थता दर्शवल्याने हा सौदा, ७० लाखात तय झाला.या पैकी २८ लाखांची पहीली किश्त सदर येथील एका नामांकित हॉटेलमध्ये देत असताना, उचके यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रंगेहात राजनांदगाव येथील अमित सोनी याला अटक केली.
आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.उचके आणि आरोपीची पत्नी हे नात्यात दूरचे मामा-भाची लागतात.तिच्या वडीलांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती व ते वाहनचालक होते.अश्यावेळी उचकेंनी तिला व तिच्या कुटूंबियाला भरघोष आर्थिक मदत केली.
याच काळात त्यांच्यात अंतरंग संबंध जुळले.याच्या चित्रफिती आणि छायचित्रेही तिच्या मोबाईलमध्ये सेव्ह झाल्या!गेल्या वर्षी २०२१ च्या ऑक्टोबर महिन्यात तिचा विवाह झाला.अमितला पत्नीच्या मोबाईलमध्ये उचकें साेबतच्या अंतरंग चित्रफिती दिसल्या.यानंतर त्याने उचके यांना, नातेवाईकांमध्ये या चित्रफिती व्हायरल करण्याची धमकी देत, एक कोटी रुपयांची लाच मागितली.
वाटाघाटीनंतर हा सौदा ७० लाखांपर्यंत आला.याची पहीली किश्त २८ लाख रुपये होती.हीच रक्कम घेण्यासाठी अमित हा सदर येथील नामांकित हॉटेलमध्ये पोहोचला होता.तत्पूर्वी पोलिसांनी या ठिकाणी आपले जाळे विणले होते.
ही लाच स्वीकारताना पोलिसांनी अमित सोनीला रंगे हात दबोचले.या सर्व कटकारस्थानात अमित याची पत्नी सहभागी आहे किवा नाही,याचाही शोध पोलिस घेत आहेत.अद्याप तिला पोलिसांनी आरोपी (Crime)केले नाही.
अमितने पोलिसांना सांगितले की,त्याने फक्त उचकेंना पत्नीसोबतचे नाते या विषयी बोलण्यास बोलावले होते व हे नातं तोडून देण्यासाठी बाध्य करणार होतो मात्र उचकेंनी हे प्रकरण ‘सेटल’करण्यासाठी लाच देऊ केली.लोभात येऊन मी ती स्वीकारली,असा बचाव अमित याने केला.
पोलिसांनी आज त्याला न्यायालयात सादर केले.न्यायालयाने अमित सोनीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.




आमचे चॅनल subscribe करा
