फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजमहाजेनकोत ‘विशिष्ट’संचालकाचा अट्टहास कोणाच्या फायद्यासाठी!

महाजेनकोत ‘विशिष्ट’संचालकाचा अट्टहास कोणाच्या फायद्यासाठी!

Advertisements

अधिवेशात प्रकरण अंगावर शेकण्याच्या शक्यतेने तात्पूरत्या नियुक्तीवर कामकाज सुरु

नागपूर,ता. ६ सप्टेंबर: महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी(महाजेनको)च्या निर्मिती संचालक या पदावर ‘विशिष्ट’व्यक्तिचीच नेमणूक करण्यासाठी नुकताच सगळा आलबेल कारभार पार पडल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली. विशिष्ट व्यक्तिीलाच या पदावर प्रस्थापित करण्यासाठी पडद्यामागे मोठ्या ‘अर्थपूर्ण’ घडामोडी घडल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.

या पदासाठी ३१ ऑगस्ट रोजी ऑन-लाईन मुलाखती पार पडणार होत्या. प्रारंभी ४ एप्रिल रोजी व त्यांनतर १४ ऑगस्टपर्यंत अर्ज मागवण्यात आले. १४ ते २७ ऑगस्ट दरम्यान अर्जांची छानणी इ.सोपस्कार पार पडून यानंतर मुलाखतीसाठी ३१ ऑगस्टचा दिवस उर्जा विभागाकडून नियोजित करण्यात आला.मात्र २७ ऑगस्ट रोजी अचानक या विभागाकडून १० लोकांना त्यांच्या ३१ ऑगस्ट रोजी ऑन-लाईन मुलाखती होतील असे एसएमएसद्वारे कळविण्यात आले!

ऑन-लाईन मुलाखतीत एखाद्या उमेदवाराला काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास त्याची जवाबदारी महाजेनकोवर नव्हती,परिणामी एका विशिष्ट व्यक्तिलाच या पदावर नेमण्यासाठी महाजेनकोने असा ऑन-लाईन मुलाखतीचा फंडा वापरल्याची जोरदार चर्चा आहे.या विषयी पुणे आणि मुंबईच्या दोन वृत्तपत्रात बातमीही छापून आली.

या बातमीची दखल घेत कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री कार्यालयात तातडीने एक ई-मेल पाठवला. ३० ऑगस्ट रोजी त्यांनी हा मेल पाठवला होता.हा मेल मुख्यमंत्री कार्यालयाने उर्जा मंत्र्यांच्या विभागाकडे फॉरवर्ड केला.परिणामी ३१ ऑगस्ट रोजी होणा-या नियोजित ऑन-लाईन मुलाखती झाल्या मात्र त्याचा निकाल जाहीरच करण्यात आला नाही! तसेच या एवढ्या महत्पवूर्ण पदावर तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे!

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन हे तोंडावर आले असता,हा मुद्दा जरी प्रश्‍नोत्तराचा तास नसला तरी चर्चेला येऊ शकतो,ही शक्यता लक्ष्ात घेऊन मुलाखती घेण्यात आलेल्या दहा अधिका-यामधून उर्जा विभाग किंबहूना उर्जा मंत्र्यांनी नेमकी कोणाची नियुक्ती केली हे आज ७ दिवस लोटले तरी घोषित झाले नाही,उलट या पदावर तात्पुरती नियुक्ती करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
हे पद इतर शासकीय विभागातील पदाप्रमाणेच ‘मलाईदार’पद समजल्या जातं.या पदावर नियुक्तीसाठी सहा आकडी रक्कम देखील मोजण्यास अधिकारी मागे-पुढे पाहत नाहीत,अशी चर्चा आहे.

आमदार भातखळकर यांनी आपल्या मेलमध्ये उल्लेखल्याप्रमाणे निर्मिती संचालक पदाची भरती प्रक्रिया ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्यात आली.सदर भरती प्रक्रिया कोणतीही लेखी परीक्ष्ा न घेता केवळ मुलाखतीच्या आधारे पार पाडली जात आहे. मूळात महाजेनको मधील मुख्य अभियंत्यांची १२ पदे व कार्यकारी संचालकांची ३ पदे मागील ३ वर्षांपासून रिक्त असून त्या पदांबाबत कोणतीही भरती प्रक्रिया ही राबविलीच गेली नाही. या उलट सद्यास्थितीत कार्यरत असलेल्या निर्मिती संचालक यांचा कार्यकाळ ३० ऑगस्ट रोजी संपणार आहे ,परंतू त्यापूर्वीच भरती प्रक्रिया राबवण्यात आली!त्यामुळे यात ठरलेल्या ‘विशिष्ट’व्यक्तिचीच निवड केली जाणार आहे व त्याकरिता मोठा अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचा संशय निर्माण झाला आहे. करोनाच्या परिस्थितीचा फायदा घेऊन घाईत पार पाडली जाणारी ही भरती प्रक्रिया तात्काळ थांबवून त्यात जो ‘अर्थपूर्ण’व्यवहार घडला आहे,त्याची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री कार्यालयाताल पाठविण्यात आलेल्या आपल्या मेलमध्ये केली आहे.

या पदावरुन निवृत्त झालेले चंद्रकांत थोटवे यापूर्वी २००९ ते २०१६ या कालावधीत प्रकल्प संचालक होते. निर्मिती संचालक म्हणून त्यांनी २०१६ मध्ये सूत्रे हाती घेतली व ३१ ऑगस्ट रोजी त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला.या पदासाठी राज्यातील तसेच राज्याबाहेरुन देखील अनेकांनी अर्ज केलेत.मात्र या पदावर विशिष्ट व्यक्तिचीच नेमणूक व्हावी,असा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे.यासाठी ऑन-लाईन मुलाखतीचा फंडा वापरण्यात आला. विशिष्ट वेळेत लॉग-इनचे बंधन ठेवण्यात आले.निर्धारित वेळेत मुलाखत अपुरी राहील्यास अथवा मुलाखत न झाल्यास उमेदरवार हा या शर्तीतून बाद ठरणार होता. तांत्रिक अडथळ्यांचे कारण पुढे करुन उमेदवारांना बाद करण्याचा डाव असल्याचे सूत्रानी सांगितले. निर्मिती संचालक या पदासाठी मोठी बोली लागली असून या व्यवहाराची कल्पना महाराष्ट्राचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांना तरी आहे का?असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

थोटवे यांच्या कार्यकाळात अनेक प्रकल्पाचा खर्च भरुन न निघाल्यामुळे त्याचा अतिरिक्त खर्च महानिर्मिती व जनतेवर आल्याची तक्रार महानिर्मितीमधील एका कर्मचा-याद्वारे करण्यात आली होती हे विशेष!

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या