फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमहपाैरांनी मोदींऐवजी लिहले मुख्यमंत्र्यांना पत्र!

महपाैरांनी मोदींऐवजी लिहले मुख्यमंत्र्यांना पत्र!

Advertisements


लस खरेदीच्या परवागीबाबत समाजमाध्यमात टिका

सवंग लोकप्रियतेची घोषणा: विरोधी पक्ष् नेते प्रफूल्ल गुडधे पाटील यांचा प्रहार

नागपूर,ता. ७ मे: एकीकडे राज्य सरकार हे लसीकरणाच्याबाबतीत पूर्णपणे केंद्रावर निर्भर असून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील केंद्राला पत्र लिहून राज्यांना लस खरेदीबाबत स्वायत्ता द्यावी यासाठी अनेकदा विनंती केली मात्र अद्याप त्यांच्या पत्राला उत्तर मिळाले नाही.महाराष्ट्राला पुरेश्‍या लसी उपलब्ध नसल्याचे राजकारण केंद्र व राज्य सरकारमध्ये जुंपलेले राज्याची जनता बघतच आहे,अश्‍यावेळी नागपूर महानरगपालिकेचे महापौर दयाशंकर तिवारी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांना शहरातील नागरिकांसाठी लस खरेदीची परवागनी दय्ावी,अशी मागणी करणारे पत्र लिहीत असल्यामुळे समाज माध्यमात याचे तीव्र पडसाद उमटले आहे.

केंद्राने आधीच सहा कोटी लसींची खैरात जगभरात वाटल्याने देशात लसीचा प्रचंड तुडवटा भासत आहे.ना ज्येष्ठांना ना तरुणांना लसी उपलब्ध होत आहेत.स्वत:राज्य सरकार हे आपल्या नागरिकांसाठी स्वखर्चाने परदेशातून लस खरेदीबाबत पाऊले उचलत असताना महापौर दयाशंकर तिवारी यांचे लस खरेदी करण्यासाठीचे पत्र म्हणजे सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठीचा खटाटोप असून जनतेच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक असल्याची टिका समाज माध्यमात उमटली. काँग्रेस पक्ष्ाचे ज्येष्ठ नेते प्रफूल्ल गुडधे पाटील यांनी देखील असे पत्र लिहून लोकप्रियता मिळवण्याऐवजी उपलब्ध लसींचा योग्य पुरवठा नागरिकांना करण्याकडे लक्ष् द्यावे असा सल्ला पत्रकाद्वारे दिला आहे.
महापौरांनी काल गुरुवार दि. ६ मे रोजी पत्र परिषद घेऊन मनपा स्वनिधीतून लस खरेदी करण्यास तयार असल्याचे सांगितले होते.तिसरी लाट येण्यापूर्वीची तयारी म्हणून आमदार व नगरसेवकांच्या निधीतून १६ कोटींची राशी जमविण्यास येईल याशिवाय विविध उद्योजकांनी त्यांचा सीएसआर निधी हा देखील मनपाला लस खरेदीसाठी द्यावा असे आवाहन केले होते.

गेल्या तीन महीन्यांपासून शहरात ज्येष्ठांच्या लसीकरणाचाच जिथे पूर्णपणे बोजवारा वाजला आहे,तिथे तिस-या लाटेपूर्वी मनपा स्वायत्तेने लस खरेदी करण्यासाठी उत्सूक असल्याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

जाणकरांनी तिसरी लाट ही सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान येण्याची शक्यता वर्तवली असून यावेळी लहान मुळे ही करोना संसर्गाला मोठ्या प्रमाणात बळी पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.अश्‍यावेळी लहान मुलांसोबत त्यांचे पालक कुठे राहतील?कोणती व्यवस्था मनपा अश्‍या लाटेला थोपवण्यासाठी करणार आहे?लहान मुलांचे डॉक्टर्स यांची शहरातील संख्या,बेड्स,उपचारपद्धती यांचा विचार न करता मनपाची निवडणूक लक्षात घेता,१५ कोटींचा हा निधी खासदार,आमदार,नगरसेवक यांच्याकडून जमा करण्याचा महापौरांचा मानस हा संशयास्पद वाटतो,अशी चर्चा माध्यमात रंगली आहे.

महापौरांना पत्र लिहायचेच होते तर मोदींना लिहायला हवे होते.यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मदत घ्यायला हवी होती.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांना लस खरेदीबाबत स्वायत्ता मिळाली नाही तर याचेही राजकारण करुन आम्ही तर नागपूरकर जनतेसाठी १५ कोटींची लस खरेदी करणार होतो,मुख्यमंत्र्यांनीच आम्हाला परवानगी दिली नाही?असे राजकारण ते खेळतील,अशी आशंका माध्यमात व्यक्त झाली मात्र या लसी महापौर साहेब नेमक्या कूठून,कोणाजवळून खरेदी करणार आहेत,याबाबत कोणताही खुलासा त्यांनी पत्र परिषदेत केला नाही.

प्रफूल्ल गुडधे पाटील यांनी भाजपने ज्याप्रमाणे उद्याेजकांकडून रेमडिसिव्हिरचा साठा उपलब्ध करुन घेतला त्याच धर्तीवर आता ते उद्योजक भाजपला ब्लॅमध्ये लस उपलब्ध करुन देणार आहेत का?असा टोला हाणला.
नागपूरकर जनता ही लसीकरणाच्या भोंगळ कारभाराला पुरती वैतागली असून अनेक लसीकरण केंद्रांवर याबाबत तरुणाईचा भडका उडाला असल्याचे चित्र आहे.

महापौर साहेब मनपाच्या आयसोलेशनचं आधी कार्यभार सुधरवा-
मनपा सदैव आपला डिमडिम मिरवून लसीकरण व मनपा दवाखान्यांमध्ये उपलब्ध बेड्स यांचा डंका माध्मात पिटते.काल दूर्गानगर येथे राहणारी ज्येष्ठ नागरिक ज्योती शिंदे यांनी त्यांना पहीली लस घेऊन ४५ दिवस उलटले असल्याने मनपाच्या साईटवर ऑनलाईन उपलब्धता शोधली. इमामवाड्याच्या आयसोलेशन केंद्रात ३ लसी ज्येष्ठांसाठी उपलब्ध असल्याने त्यांनी लसीसाठी रजिस्ट्रेशन केले. सकाळी ९ वाजता आयसोलेशन केंद्रावर पोहोचले असता तेथील कर्मचा-याने त्यांना दूस-या डोजसाठी लस उपलब्ध नसल्याचे सांगून हाकलून लावले. दूस-या डोजसाठी रजिस्ट्रेशनची गरज नसल्याचे ही सांगितले.पहीला डोज दिला जात असल्याचे सांगितल्याने त्यांनी आपल्या शेजारील महिलेला या केंद्रावर लसीकरणासाठी पाठविले मात्र त्यांनाही या केंद्रातील कर्मचा-याने त्यांचे रजिस्ट्रेशन नसल्याने त्यांना ज्येष्ठांच्या लसीकरण कोट्यातून पहीली लस दिली जाऊ शकत नसल्याचे सांगून पिटाळून लावले,विशेष म्हणजे हे ठिकाण वस्तीतील असल्याने या केंद्रावर कायम पोलीसांचा बंदोबस्त असतो त्यामुळे ज्येष्ठ नागरिक पोलिसांना बघून काहीच आक्ष्ेप न घेता मुकाट्याने निघून जातात.हे केवळ एक प्रातिनिधीक उदाहरण आहे.मनपाच्या सर्वच लसीकरण केंद्रांवर नोंदणीचा हाच भोंगळ कारभार सुरु आहे.

(ज्येष्ठ नागरिक ज्योती शिंदे यांचे आयसोलेशनमध्ये लसीकरणासाठी झालेली नोंदी)

डॉ.मंजू वैद्य ७ फूटावरुन तपासतात रुग्ण!
आयसोलेशनचा कारभार ज्या ‘सुयोग्य’ वैद्यकीय अधिकारी डॉ.मंजु वैद्य यांच्यावर आहेत त्या गेल्या अनेक वर्षापासून(करोनाच्या पूर्वीच्या काळापासूनच)वस्तीतील रुग्णांना टेथेस्कोप न लावता ७ फूटांवरुनच तपासून औषधे लिहून देत असल्याच्या अनेक तक्रारी येथील नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे केल्या आहेत. डॉ.मंजू वैद्य यांना मनपा १ लाख ४० हजार पगार देते,हा पगार जनतेच्या कराच्या पैश्‍यातून दिल्या जातो मात्र कर्तव्याच्या नावावर मनपाच्या दवाखान्यातील काही वैद्यकीय अधिकारी हे फूकटचा पगार लाटत असल्याचे दिसून पडतं.

मनपाच्या चकोले दवाखान्यात असताना याच डॉ.मंजू वैद्य यांच्या एकंदरित कारभाराला कंटाळून तेथील नागरिकांनी त्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले होते.डॉ.मंजू वैद्य या रुग्णासाेबत तुच्छतेने बोलतात,अशी अनेकांची तक्रार आहे.२००७ साली याच आयसोलेशनचा फॉर्मासिस्ट राजेंद्र काेरडे याच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक अारोप झाले.गरीबांच्या हक्काची औषधेही ब्लॅकमध्ये खुल्या बाजारात विकण्यात आली.सत्ताधारी भाजपच्या काळात मनपाच्या प्रत्येक दवाखान्यात सत्ताधारी नेत्यांची मर्जी राखणारेच अधिकारी व कर्मचारी अद्यापही सेवेत रुजू आहेत.याच भ्रष्ट अधिकारी व कर्मचा-यांकडून काही नेत्यांच्या घरी न चुकता ‘टक्केवारी’पोहोचत असल्याचा अारोप फार जुना आहे.

मात्र करोनासारख्या महाभयंकर प्रकोपाच्या काळात तरी मनपा आपला कारभार सुधरवेल अशी आशा असताना अद्याप मनपाच्या काही भ्रष्ट सत्ताधा-यांची ‘खाबूगिरी’कुठेही कमी झालेली नसून जनतेच्या जीवाशी निगडीत असणारी साधी लसीकरण व्यवस्था देखील त्यांना सुरळीत करता आली नाही. अश्‍यात महापौर यांचा १५ कोटींचा लस खरेदीचा दावा किती फोल ठरतो,यावर समाज माध्यमात तीव्र प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या