फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइममला त्या दोन पत्रकारांनी थेट खंडणी मागितली नाही,पण.....!

मला त्या दोन पत्रकारांनी थेट खंडणी मागितली नाही,पण…..!

Advertisements

बीसीएन न्यूजचे संस्थापक सिराज शेख यांचा पत्रकार परिषदेत आरोप

‘ओसी’मागतोय गेल्या १५ वर्षांपासून खंडणी:खंडणी देत नसल्यानेच छापतोय माझ्याविरुद्ध बातम्या!

३५ कंपन्यांची कामे माझ्याकडे:त्यामुळेच मुंबईत वास्तव्य

संबंध नसतानाही माझ्याविषयी चुकीच्या बातम्या होत आहेत प्रसिद्ध:सोमवारपासून करणार कायदेशीर कारवाई

नागपूर,ता.१ जुलै २०२३: गेल्या काही दिवसांपासून बीसीएन न्यूज व बीटीपीचे संस्थापक सिराज शेख यांच्याविरुद्ध दोन डिजिटल पोर्टलवर सातत्याने बदनामीकारक वृत्त प्रसिद्ध केल्या जात आहे,या मागे दोन लाखांची खंडणी मागितल्याची चर्चा आहे,नागपूरात काही महिन्यांपूर्वी क्रिकेटचा सामना रंगला हाेता,त्यात खायवाडी झाल्याच्या आरोपात चार बुकींना अटक देखील झाली होती,या प्रकरणात सिराज शेख यांचे नाव समोर आल्याने, नागपूरातील दोन पत्रकारांनी त्यांना त्यांच्याविरुद्ध बातमी प्रसिद्ध न करण्यासाठी दोन लाखांची खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला होता,मात्र ही खंडणी सिराज शेख यांना थेट न मागता नागपूरातीत त्यांचे काम पाहणा-या त्यांच्या सहका-याला मागण्यात आल्याचे आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत सिराज शेख यांनी सांगितले.

माझे गेल्या अनेक वर्षांपासून माध्यमकर्मींसोबत सलोख्याचे संबंध असल्याचे ते म्हणाले.मात्र,तरी देखील गेल्या काही दिवसांपासून माझ्याविरुद्ध दोन पत्रकार सातत्याने खोट्या बातम्या प्रसिद्ध करत असल्याचा आरोप त्यांनी केला.आज नागपूरात माझी ओळख बीटीपी व बीसीएन ग्रूपचा संस्थापक,अशी असून माझा कार्यभार सांगण्यासाठीच मी ही पत्रकार परिषद आयोजित केली असल्याचे त्यांनी सांगितले.

मी एकूण ३५ कंपन्यांसोबत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रुपाने जुळलो असून मला माझे साम्राज्य निर्माण करण्यासाठी अपार कष्ट पडले असल्याचे ते म्हणाले.या संपूर्ण कंपन्यांची नावे मी माझ्या प्रेस नोटसोबत दिली असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळेच मी इतका व्यस्त असतो की मला इतर कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देण्यास वेळ नसतो.त्यामुळेच अधिकतर मुंबईतच वास्तव्यास असतो कारण नागपूरातील कार्यालयात अनेक व्यक्ती अनावश्‍यक कामांसाठी येऊन बसतात आणि माझा वेळ खराब करतात,असे ते म्हणाले.

एवढा मोठा व्यवसाय सांभाळत असताना अनेक लोकांशी माझा संपर्क येतो,यात अनेक माझे कर्मचारी आहेत तर अनेक हे काम सोडून गेलेले आहेत.काही माझे ओळखीचे आहेत तर काही माझे नातेवाईक आहेत.मात्र,त्या सर्वांच्या चांगल्या-वाईट कामांसोबत दरवेळी माझं नाव जोडल्या जातं.माझ्या ओळखीच्या लोकांनी किंवा माझ्याकडे आधी काम करुन सोडून गेलेल्यांनी कोणतेही बेकायदेशीर काम केल्यास माझ्या नावासोबत त्यांचे कृत्य जोडल्या जातं.

मला दोन पत्नी असून पाच मुले आहेत.पहील्या पत्नीपासून तीन तर दुस-या पत्नीपासून दोन मुले आहेत.मी पाच मुलांचा पिता या नात्यानेच तसेच नागपूरातील माझा सहयोगी इमरान शेख यांच्याशिवाय कोणाच्याही कोणत्याही कृत्यासाठी जवाबदार नाही,असा खुलासा याप्रसंगी केला.

त्यामुळे माझ्या नावाची हेतुपुरस्सर बदनामी थांबविण्यात यावी.नागपूरातील पत्रकार रितेश बोरकर व रविकांत कांबळे यांनी माझ्या बदनामीकारक ज्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत त्याचे संपूर्ण पुरावे एकत्रित केले असून येत्या सोमवारपासून आम्ही त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यातील रविकांत कांबळे यांनी मला नंतर माफी मागणारे अनेक व्हॉट्स ॲप मॅसेज पाठवले असल्याचे सांगून ,याप्रसंगी त्यांनी उपस्थित पत्रकारांना ते मॅसेज दाखवित, ते मी सांभाळून ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.

छायाचित्र :मोबाईलवरील व्हॉट्स ॲपवरील मॅसेज वाचून दाखवताना सिराज शेख)

मला न्यायालयातून जामीन मिळाला असतानाही मला फरारी घोषित करुन मी दुबईला पळून गेलो किवा अमूक ठिकाणी दडून बसलो,अश्‍यास्वरुपाचे बदनामीकारक व प्रतिष्ठेला धक्का लावणा-या बातम्या प्रसिद्ध करण्याचा काय हेतू आहे,हे माझ्यापेक्षा जास्त उपस्थित पत्रकारांनाच माहिती असल्याचे ते म्हणाले.

‘ओसी’ची चर्चा….
याप्रसंगी बोलताना, मला फोनवर या दोन्ही पत्रकारांनी थेट खंडणी मागितली नसल्याचे सांगून मला गेल्या १५ वर्षांपासून एकच पत्रकार सातत्याने फोनवर थेट खंडणी मागत आहे,तो आपले नाव ‘ओसी’सांगतो,असा आरोप सिराज शेख यांनी केला.मी त्याला खंडणी देत नसल्यानेच तो सातत्याने माझ्या बदनामीकारक बातम्याही त्याच्या अतिशय लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांच्या या आरोपानंतर ‘ओसी’नामक त्या खंडणीबाज पत्रकाराची चांगलीच चर्चा पत्रकार परिषदेनंतर रंगली.हा पत्रकार महाराष्ट्राचा नंबर एक चे दैनिकाचा दावा करणा-या वृत्तपत्रातील, हिंदी आवृत्तीमध्ये काम करणारा असून, तो क्राईम बिट बघणारा पत्रकार आहे.यामुळे कोण किती पाण्यात मुरलेला आहे याचा चोख अंदाज या पत्रकाराला असल्यानेच, सिराज शेख यांनाही त्याने खंडणी मागण्याची परंपरा कायम ठेवली असल्याचे बोलले जात आहे.विशेष म्हणजे ३५ कंपन्यांचा कारभार बघणा-या सिराज शेख यांनाही त्या पत्रकाराचे संपूर्ण नाव माहिती असतानाही, त्यांनी मुद्दामून त्या पत्रकाराच्या आडनावाची तोडफोड करुन त्याला ‘जो…’ऐवजी ‘ओसी’संबोधले,हे चाणाक्ष पत्रकारांच्या नजरेतूनही नाही सुटले.

भुक्कड पत्रकारितेचा कळस-
पत्रकार परिषदेनंतर सिराज शेख यांच्याकडून पत्रकारांसाठी छोळे भटूरे,सँडविच,चहा-बिस्कीटांचा मेन्यू ठेवण्यात आला होता.यावर ताव मारल्यानंतर देखील एका मॅगनीजच्या संपादकाने पत्र परिषदेच्या आयोजकाकडे ,सिराज शेखसारख्या एवढ्या धनाढ्य माणसाची पत्रकार परिषद असताना मटणाचे जेवण का ठेवण्यात नाही आले?अशी विचारणा केली!यावर सिराज शेख यांच्या त्या खास सहका-याने नेहमीसारखेच हसत मुखाने आज शनिवार असल्याने अनेकांचा उपवास असतो त्यामुळेच साधेच पदार्थ ठेवले असल्याचे सांगितले.

इतक्या बेशरमपणे मटणाची मागणी करणा-या त्या मॅगझीनच्या संपादकावर अनेकांनी खासगीत चांगलाच रोष व्यक्त केला.यांना बातमीची भूक असते की लज्जतदार पदार्थांची?असा सवाल चर्चिला गेला.विशेष म्हणजे पत्रकार परिषद घेणारा किती धनाढ्य आहे किवा किती बेकायदेशीर धंदे करणारा आहे,त्याच्याकडे किती मालमत्ता आहे किवा त्याची खाऊ घालण्याची किती पत आहे, याच्याशी पत्रकार म्हणून ,पत्र परिषदांमध्ये येणा-यांना काही एक घेणे-देणे नसावे मात्र अलीकडे प्रेस क्लबमध्ये येणा-या पत्रकारांची व्याख्याच संपूर्ण:बदलली आहे,याचेच एक उदाहरण आजच्याही पत्रकार परिषदेत दिसून पडले.

अनेकांचा बातमीला ‘जय जातीवाद!’
पत्रकार परिषदेत हिरीरीने प्रश्‍न विचारणारे व डिजिटल माध्यमांमध्ये व स्थानिक वृत्त वाहीनीमध्ये रंगलेल्या एकमेकांच्या बदनामीकारक तसेच आरोप-प्रत्यारोप करणा-या बातम्यांमुळे ,पत्रकारिताच कशी बदनाम होतेय,याचा कंठशोष करणा-या काही पत्रकारांनी, पत्रकार परिषदेनंतर मात्र खासगीत, ‘ही बातमी करणार नसल्याचे’ सांगितले!ज्यांच्यावर आरोप झालेत ते पत्रकार‘जातीचे’असल्याने बातमी करणार नसल्याचे कारण ही सांगितले.

नागपूरच्या पत्रकारितेत शिरलेल्या या ‘जय जातीवादा’तून नीती आणि मूल्ये जपणा-या त्याच जातीच्या पत्रकारांचा मात्र आपण अवमान करीत आहोत,याचेही भान या काही जातीभान सांभाळणा-या व पत्रकार म्हणून मिरविणा-यांना राहीले नाही,याचेच हे द्योतक म्हणावे लागेल.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या