फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजमनपा सुरक्षा रक्ष् क कंत्राटात महिन्याला लाखोंचा भ्रष्टाचार!

मनपा सुरक्षा रक्ष् क कंत्राटात महिन्याला लाखोंचा भ्रष्टाचार!

Advertisements

‘जय जवान जय किसान’ संघटनेचा आरोप

नागपूर,ता. २१ जुलै: महापालिकेच्या सुरक्षा रक्ष् कांच्या कंत्राटात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष् प्रशांत पवार यांनी केला.

संबंधित कंत्राट रद्द करुन महाराष्ट्र सुरक्षा रक्ष् क महामंडळाच्यावतीने महानगरपालिकेत सुरक्षा रक्ष् कांची नियुक्ती करण्यात यावी,अशी मागणीही त्यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

महापालिकेत गेल्या २० वर्षांपासून सुपर सिक्युरिटी, किशोर सिक्युरिटी अँड सर्व्हिस, युनिटी सिक्युरिटी अँड ट्रोनिंग या ३ खाजगी एजंसींना २५० सुरक्षा रक्ष् कांचा पुरवठा करण्याचे कंत्राट मनपाने दिले आहे. किमान वेतनानुसार त्यांना १४ हजार ८२४ रुपये मासिक वेतन देणे बंधनकारक आहे. मात्र मनपातर्फे कंत्राटदारांना २४ हजार प्रति सुरक्षा रक्ष् काप्रमाणे वेतन दिले जात आहे.

सुरक्षा रक्ष् कांच्या खात्यात मात्र १४ हजार ८२४ रुपये जमा केले जात आहेत. युनिटी सिक्युरिटी तसेच किशोर सिक्युरिटी एजंसीतर्फे १४ हजारमधूनही रक्ष् कांकडून ७ हजार रुपये परत घेतले जातात. न दिल्यास कामावरुन काढून टाकल्या जातं.मनपाचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा त्यांच्या तक्रारीची दखल घेत नाही.या संपूर्ण व्यवहारात मनपातील काही पदाधिकारीसुद्धा लाभार्थी असल्याचा आरोप प्रशांत पवार यांनी पत्रकाद्वारे केला.

महिन्याला होतो लाखोंचा भ्रष्टाचार-
या सर्व एजंसीज सुरक्षा रक्ष कांची आर्थिक,मानसिक, भावनिक व शारिरीक पिळवणूक करीत असून जास्त काम व कमी पगार देऊन त्यांचा मानसिक छळ देखील केला जात आहे. पूर्ण वेळ काम करुन घेऊन अर्ध्यापेक्षाही कमी पगार त्यांना दिला जातो.या सर्व गैरप्रकारातून महिन्याला पंधरा ते वीस लाखांचा भ्रष्टाचार केला जात आहे.भ्रष्टाचाराचा हा पैसा शेवटी काेणत्या लाभार्थी पदाधिका-यांपर्यंत गेल्या वीस वर्षांपासून पोहोचतोय?याची देखील अायुक्तांनी संपूर्ण चौकशी करावी.

मनपातील ज्या वरिष्ठ अधिका-यांकडे या विभागाची जवाबदारी आहे तेच अधिकारी सुरक्षा रक्ष् कांच्या तक्रारींकडे लक्ष् देत नाही. २० वर्षांपासून त्याच-त्याच एजेंसीना सुरक्षा रक्ष् क पुरवठ्याचे कंत्राट प्राप्त होत आहे.

या मागील कारण स्थायी समितीला हे कंत्राटदार वार्षिक रक्कम देतात. मागील १ वर्षापूर्वी कंत्राटाचा कालावधी संपला तरी याच एजन्सींना काम सुरु ठेवण्यास सांगण्यात आले आहे. किमान महिन्याला १५ जे २० लाख रुपयांचा हा भ्रष्टाचार होत असून आयुक्तांनी या भ्रष्टाचाराचे लाभार्थी यांचा शोध घ्यावा, व या सुरक्षा रक्ष् क कामागारांचे आर्थिक व माानसिक शोषण संपवावे. कोरोनामुळे मनपाद्वारे शहरात जे विलगीकरण केंद्र तयार करण्यात आले आहेत त्या सर्व ठिकाणी जीव धोक्यात घालून हेच सुरक्षा रक्ष् क कर्तव्य बजावत असल्याचे पवार यांनी पत्रकात नमूद केले.

या तिन्ही एजंसीचे कंत्राट रद्द करुन भ्रष्टाचार रोखावा व शासनाच्या महाराष्ट्र सुरक्षा रक्ष् क महामंडळाच्यावतीने याच सुरक्षा रक्ष् कांची फेरनियुक्ती करुन त्यांच्यावरील अन्याय दूर करावा, अश्‍या मागणीचे निवेदन ’जय जवान जय किसान’संघटनेच्या वतीने आयुक्त तुकाराम मुंढे यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी अध्यक्ष् प्रशांत पवार यांच्याशिवाय सचिव अरुण वनकर उपस्थित होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या