


सत्ता पक्षाने केली दंडात्मक कारवाईची मागणी
नागपूर: महाल येथील नगरभवनात गुरुवार दि. २२ ऑगस्ट रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रश्नोत्तराच्या तासात विषय क्र.१६७ मधील मनपाच्या अस्थाई वाहनचालकांना नोकरीत पुन्हा समाविष्ट करुन घेण्याबाबत, नुकताच आलेल्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत चर्चा सुरु असताना,हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे सभागृहात यावर चर्चा करता येणार नाही असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले, मात्र या विषयावर जवळपास अर्धा तास चर्चा झाली आहे, अस्थाई कर्मचारींबाबत महापौर नंदा जिचकार यांनी ठोस निर्णय घ्यावा यासाठी विरोधक अडून बसले यानंरतही महापौरांनी लगेच दूसरा विषय पुकारला त्यावर अचानक काँग्रेसच्या तीन-चार नगरसेवकांनी संतापून राष्ट्रगीताला प्रारंभ केला, यावर महापौर ही गोंधळल्या,त्या देखील सभागृहातील सर्व सदस्यांसोबत काही क्ष् ण उभ्या झाल्या व नंतर लगेच पुन्हा आसनावर बसल्या.राष्ट्रगाननंतर विरोधकांनी लगेच सभात्याग केला.
अस्थाई वाहनचालकांना न्याय मिळावा, त्यांच्या विरोधात आता सर्वोच्च न्यायालयात खटला चालवू नये, औद्योगिक, सत्र व उच्च न्यायालय या तिन्ही न्यायलयात या कर्मचार्यांच्या बाजूने निकाल लागला आहे, त्यांना देखील कुटुंबिय आहे, त्यांच्यावर अन्याय होऊ नये,यावर चर्चा पूर्ण करावी व ठोस निर्णय घेण्यात यावा ही विरोधकांची मागणी होती. मात्र प्रशासकीय अधिकारी शेख यांनी माहिती दिल्याप्रमाणे उच्च न्यायालयाच्या निर्णया विरोधात महापालिकेतर्फे सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केल्यामुळे सभागृहात चर्चा घेेण योग्य नाही,असे सांगताच विरोधकांनी मग हा विषय,विषय पत्रिकेत आणलाच कसा याचे उत्तर प्रशासनाने द्यावे अशी मागणी विरोधी पक्ष् नेते तानाजी वनवे यांनी केली. सत्ता पक्ष्ाकडे उत्तर नसल्यामुळे ते सभागृहाची दिशाभूल करीत असल्याचे ते म्हणाले.कमलेश चौधरी यांनी कागदपत्रे महापौरांच्या आसनाकडे भिरकावली. आपल्या मुद्दाला महापौर दाद देत नसल्याचे बघून काँग्रेसचे बंंटी शेळके,नितिन साठवणे व हरिश ग्वालबंशी यांनी राष्ट्रगानाला सुरवात केली.राष्ट्रगानामुळे सर्वच सभासद,पत्रकार दीर्घामधील पत्रकार हे सुद्धा उभे राहीले. महापौर नंदा जिचकार या देखील उभ्या झाल्या मात्र लगेच खाली बसल्या. राष्ट्रगान सुरु असताना उभे राहावे कि बसावे याचा बराच गोंधळ त्यांच्या चेहरयावर उमटला. मात्र शेवटी त्यांनी आसनावर बसून राहाणे पसंद केले.
राष्ट्रगानाचा अपमान करणारे नगरसेकवांवर कठोर व दंडात्मक कारवाई करावी- दयाशंकर तिवारी(ज्येष्ठ नगरसेवक)
सभागृहाच्या इतिहासात आजपर्यंत असं अघटित घडले नाही. राष्ट्रगान विषयी या देशात एक संहिता आहे जी काटेकोरपणे पाळली जाते. विरोधकांनी ती संहिता पाळली नाही आणि राष्ट्रगीताचा अपमान केला.ज्या राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी अनेकांने बलिदान दिले त्या राष्ट्रगीताला विरोधकांनी राजकारणासाठी मजाक बनवले. हा अक्ष् म्य गुन्हा आहे.याची गांर्भियाने सभागृहाने नोंद घ्यावी. अवेळी स्वार्थी राजकारणासाठी ज्यांनी राष्ट्रगीताचा अपमान केला त्या नगरसेवकांना कठोर शिक्ष्ा झालीच पाहिजे जेणेकरुन पुढे असे करण्याचे धाडस कोणी करणार नाही. राष्ट्रगीताला एवढ्या हलक्या तर्हेने घेणारे नगरसेवक यांना महापौरांनी आधी नोटीस जारी करावी. त्यांनी आपल्या कृत्याची क्ष् मा मागितली तर ठीक नाही तर त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी दयाशंकर तिवारी यांनी केली. राष्ट्रगीताच्या अपमानाचे हे काळे पान येणार्या पिढीने वाचू नये यासाठी नागपूर शहराच्या वैभवशाली महापालिकेच्या इतिहासातून हे काळे पान काढून टाकण्याची विनंती त्यांनी महापौरांना केली.
विरोधी पक्षात असताना आम्ही लोकशाहीची इतकी क्रूर थट्टा कधीही केली नाही-प्रवीण दटके(माजी महापौर)
मला जवळपास अठरा वर्षे झाली मी या सभागृहाचा सभासद आहे. आम्हीही विरोधक होतो मात्र आज जे सभागृहात घडलं ते अतिशय दूर्देवी आहे. लोकशाहीची ही क्रूर थट्टाच विरोधकांनी केली. या पूर्वी कधीही इतिहासात असे घडले नाही. मनाप्रमाणे झाले नाही तर हा मार्ग विरोधकांनी निवडला जो अतिशय चूकीचा आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेले अल्याचे कळल्यानंतर यावर चर्चा करणे योग्य नव्हते म्हणून महापौरांनी पुढचा विषय पुकारला. राष्ट्रगीताचा जो अपमान आज सभागृहात झाला आहे त्यासाठी त्या नगरसेवकांनी तात्काळ सभागृहाची आणि राष्ट्राची माफी मागावी. अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार रहावे असे दटके म्हणाले. बसपाच्या सदस्या यांनी राष्ट्रगीत सुरु असताना महापौर का बसून होत्या? असा प्रश्न उपस्थित केला यावर दटके यांनी तांत्रिक बाजू समजावून सांगितली. मी देखील महापौर राहीलो आहे, महापौरांचा पाय हा सतत बेलवर असतो.सभागृहाचे मिनिट्स खोळंबू नये यासाठी महापौरांना आसनावर बसून राहणे क्रमप्राप्त होतं असे दटके यांनी उत्तर दिले. राष्ट्रगीताचा अपमान करण्याचा महापौरांचा कोणताही हेतू नसल्याचे ते म्हणाले.
महापौर चुकल्याच- आभा पांडे (ज्येष्ठ नगरसेविका)
बेल वाजपण्याचं तांत्रिक कारण सांगून राष्ट्रगीत सुरु असताना महापौर या आसनावर बसल्या हे त्यांचे चुकलेच. राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी त्यांनी उभे राहायला हवे होते.त्या उभ्याही राहील्या होत्या मग मात्र त्यांना कोणी बसायला सांगितले का?याचा शोध पत्रकारांनीच घ्यावा. विरोधकांनी राष्ट्रगीत सुरु केले कारण अनेकदा त्यांचे म्हणने सुरु असताना महापौर राष्ट्रगीत सुरु करतात आजही विरोधक बोलत असताना त्यांचे म्हणनेच ऐकून घेतले जात नव्हते परिणामी त्या तीन नगरसेवकांनीही मग राष्ट्रगान सुरु करुन सभात्याग केला.यामागे त्यांचा कोणताही वाईट हेतू नव्हता. याला जर इतिहासाचे काळे पान म्हटले जात असेल तर ते पान काळं करण्याची जबाबदारी कोणाची? बेल वाजवण्यासाठी चपराश्यालाही त्या सांगू शकल्या असत्या, आयुक्त स्वत: उभे राहीले, महापौरांनीही उभे राहायला हवे होते. त्यांच्यावर कारवाई होईल का?
महापौरांवरच गुन्हा दाखल झाला पाहिजे- प्रफुल्ल गुडधे पाटील (ज्येष्ठ नगरसेवक)
सभागृहात गोंधळ सुरु असताना महापौरांचाही हा रेकॉर्ड आहे त्या राष्ट्रगान प्रारंभ करुन देतात. त्यावेळी राष्टगानाचा अपमान होत नाही का? सभागृहात राष्ट्रगानाला त्या काही नगरसेवकांनी प्रारंभ करताच मी पण उभा झालो, महापौर मात्र दोन वेळा उभ्या झाल्या व बसल्या, यासाठी महापौरांवरच गुन्हा दाखल झाला पाहिजे.




आमचे चॅनल subscribe करा
