

निवडणूकीच्या तोंडावर सुरु होणार इंग्रजी माध्यमाच्या सहा शाळा
मनपा आणि आकांक्षा फाऊंडेशनमध्ये सामंजस्य करार
केजी वन, केजी टू आणि इयत्ता पहिलीचे वर्ग लवकरच होणार सुरू
हर्डीकरांच्या काळात ११०० विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमात घेतलेल्या प्रवेशाचे काय झाले?
नागपूर, ता.१२ : नागपूर महानगरपालिकेच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आमुलाग्र परिवर्तन ठरणारा महत्वाचा विषय अखेर मार्गी लागला. नागपूर शहरातील सहा विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. आकांक्षा फाऊंडेशन या संस्थेच्या सहकार्याने नागपूर शहरामधील झोपडपट्टी भागामध्ये सहा इंग्रजी माध्यमाच्या शाळा या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत असून यासंदर्भात मनपा आणि आकांक्ष्ा या स्वयंसेवी संस्थामध्ये २० वर्षांसाठी सामंजस्य करार झाला आहे. या सहाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये महाराष्ट्र शैक्षणिक मंडळाच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जाईल. या नव्या सहा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये लवकरच नि:शुल्क केजी वन, केजी टू आणि इयत्ता पहिलीच्या वर्गांना सुरूवात होणार आहे, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी आज मनपा मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली मात्र मनपाच्या अनेक शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा या गोपाल बेहरे हे शिक्ष् ण समिती सभापती असताना सुरु झाल्या होत्या,जवळपास ११०० विद्यार्थ्यांनी नर्सरी ,के जी-१ व के जी-२ मध्ये प्रवेश ही घेतला होता या शाळांचे पुढे काय झाले?असा प्रश्न आता नागपूरकर जनतेला पडला आहे.
विशेष म्हणजे मनपाच्या निवडणूकांना अवघे ६ महिन्यांचा अवधी राहीला आहे,परिणामी निवडणूकीच्या तोंडावर मनपा शिक्ष् ण समिती सभापतींना उशिरा सुचलेले शहाणपण अशी टिका आता समाज माध्यमात उमटत आहे.गेल्या वर्षी २०२० मध्येच शिक्ष् ण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी ही योजना सभागृहाच्या पटलावर ठेवली होती,हे विशेष मात्र तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या योजनेला फूल्ली मारत,या ६ शाळा सीबीएसई अभ्यासक्रमाच्या असतील असा प्रस्ताव बदलला.
यानंतर कोरोनाच्या काळखंडात हा प्रस्ताव चांगलाच रखडला,दरम्यान मनपाच्या चमूने पिंपरी-चिंचवड,मुंबई,पुणे,ठाणे इ.ठिकाणी अकस्मात भेट दिल्या व आकांक्ष्ा या संस्थेच्या कामाची पारख केली असे महापौर म्हणाले.
‘बनातवाला’ ही मनपाची इंग्रजी माध्यमाची शाळा पूर्वी भाड्याच्या इमारतीमध्ये सुरु होती.तत्कालीन मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ३ कोटींचा प्रस्ताव सभागृहात पारित करवून घेतला व आज ही शाळा स्वत:च्या मोठ्या इमारतीत सुरु आहे.शिक्ष् ण सभापती दिलीप दिवे यांनी आणलेला ६ इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा प्रस्ताव हा १३ कोटी रुपयांचा आहे.
गोपाल बेहरे हे शिक्ष् ण समिती सभापती असताना त्यांच्या कार्यकाळात मनपाच्या अनेक शाळांना ‘इंटरनॅशनल स्टॅण्डर्ड ऑफ ऑरगनायझेशन‘(आयएसओ)चे मानांकन मिळाले होते.दर तीन वर्षांनंतर या पुरस्कारासाठी पुन्हा त्या शाळांची तपासणी केली जाते,दिवे सभापती पदी रुजू झाल्यानंतर पुढे या मानांकनाचे काय झाले?हे विद्यार्थ्यांनाही माहिती नाही ना नागपूरकर जनतेला माहिती!
विशेष म्हणजे बेहरे यांच्या कार्यकाळातच मनपाच्या शाळांमध्ये इंग्रजी व गणित शिकवणा-या शिक्ष् कांची वानवा होती,आता नव्याने सुरु होणा-या या ६ इंग्रजी शाळांमध्ये किती शिक्ष् कांची वर्णी लागते,हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.या शाळांमध्ये शिक्ष् क नियुक्तीचे अधिकार आकांक्ष्ा संस्थेला असणार आहे,करारात तसे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे नुकतेच दानागंज मॉल संबधीच्या करारात अनेक अटी व शर्थींचा कसा भंग झाला हे २२ जून रोजी पार पडलेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफूल्ल गुडधे पाटील यांनी पुराव्यानिशी याचा तपशील मांडला,आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी दानागंज मॉलसंबधी कराराचा फेरप्रस्ताव सभेत सादर केला होता व तो मंजूर करावा अशी विनंती महापौरांना केली होती,तो फेरप्रस्ताव मंजूर करतानाच महापौर दयाशंकर तिवारी यांनी या पुढे काेणत्याही संस्थेसोबत,कंपन्यांसोबत करार-मदार करताना तो जनतेचे हित लक्ष्ात घेऊन व जनतेच्या व मनपाचे आर्थिक नुकसान होणार नाही,हे लक्ष्ा त घेऊनच करार-मदार करावे,अशी सूचना दिली होती.
आता आकांक्ष्ासोबत २० वर्षांचा करार करताना महापौरांनीच या कराराची हमी घेत,या ६ शाळांमध्ये रुजू होणा-या शिक्ष् कांना ६ वां वेतन आयोग लागू होणार असल्याचे सांगितले.मनपाच्या इतर शाळांमध्ये शिक्ष् कांना सध्या ७ वा.वेतन आयोग लागू असला तरी इतर खासगी शाळांच्या तुलनेत या ६ शाळेत शिकवणा-या शिक्ष् कांचा पगार खूप जास्त असणार आहे,अशी पुश्ती ही त्यांनी जोडली. शिक्षकांच्या वेतनाचा भार नागपूर महानगरपालिका आणि आकांक्षा फाऊंडेशनद्वारे उचलला जाणार आहे. शिक्षकांच्या वेतनासाठी पहिल्या वर्षी संस्थेद्वारे ३० टक्के तर मनपाद्वारे ७० टक्के, दुस-या वर्षी संस्था ३५ टक्के व मनपा ६५ टक्के, तिस-या वर्षी संस्था ४० व मनपा ६०, चवथ्या वर्षी व त्यापुढे संस्था ४५ टक्के तर मनपा ५५ टक्के भार निर्वहन करणार आहे.
महत्वाचे म्हणजे,करोनाच्या अति भयंकर महामारीच्या काळात अनेक पालकांची नोकरी सुटली,काम धंदे बंद होते,आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली अश्यात खासगी शाळांनी देखील पालकांची चांगलीच कोंडी केली.ज्या पालकांना शैक्ष् णिक शुल्क भरणे शक्य झाले नाही त्यांच्या पाल्यांना टी.सी देण्यात आली नाही तसेच ऑन लाईन वर्गाची लिंक ही पाठवण्यात आली नाही.पालक आणि विद्यार्थी सर्वच करोनाच्या या तडाख्यात मानसिक,शारिरीक व आर्थिकरित्या चांगलेच भरडले गेले.अश्यावेळी मनपाच्या शाळांची इंग्रजी माध्यमांची स्थिती चांगली असती तर या शहरातील पालक वर्गाला फार मोठा दिलासा मिळाला असता,असे आता बोलले जात आहे.
गेल्या १५ वर्षांपासून मनपात भाजपची सत्ता आहे मात्र ऐन निवडणूकीच्या तोंडावर असा स्तुत्य उपक्रम सुरु करुन भाजपला काय साध्य करायचे आहे?असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
पत्रकार परिषदेमध्ये उपमहापौर मनीषा धावडे, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, उपसभापती सुमेधा देशपांडे उपस्थित होते.
या असणार आहेत इंग्रजी माध्यमाच्या शाळा-
उत्तर नागपुरातील राणी दुर्गावती प्राथमिक शाळा, पूर्व नागपुरातील बाभुळबन मराठी प्राथमिक शाळा, दक्षिण-पश्चिम नागपुरातील स्व.बाबुराव बोबडे मराठी प्राथमिक शाळा, पश्चिम नागपुरातील रामनगर मराठी प्राथमिक शाळा, दक्षिण नागपुरातील रामभाऊ म्हाळगीनगर मराठी प्राथमिक शाळा आणि मध्य नागपुरातील स्व.गोपालराव मोटघरे (खदान) हिंदी उच्च प्राथमिक शाळा या मनपाच्या बंद पडलेल्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू होणार आहेत.
इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाल्या म्हणजे मराठी, हिंदी किंवा उर्दू माध्यमांच्या शाळा बंद होतील असे गृहीत धरु नये. मराठी, हिंदी व उर्दू माध्यमाच्या शाळांना अद्ययावत करण्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्थानी पुढे यावे, असे आवाहनही महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.
या संस्थेद्वारे शालेय प्रशासन व व्यवस्थापन, शाळांमध्ये नियुक्त करावयाचे शिक्षक, शाळेचा दर्जा आदी बाबींची पूर्तता केली जाईल. मनपातर्फे इमारत, दुरूस्ती, विद्युत व्यवस्था, पाणीव्यवस्था, गणवेश, पाठ्यपुस्तके, शालेय पोषण आहार, विद्यार्थ्यांना नि:शुल्क बस पास याची जबाबदारी पार पाडली जाईल, अशी माहिती यावेळी शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांनी दिली.




आमचे चॅनल subscribe करा
