फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर मनपामनपा निवडणूकीत पूर्ण ताकदीने उतरणार: ॲड.धनराज वंजारी

मनपा निवडणूकीत पूर्ण ताकदीने उतरणार: ॲड.धनराज वंजारी

Advertisements

.

राजकीय पक्षांचे ओबीसी सेल फक्त हस्तक

५ सप्टेंबरला पक्षाचा संकल्पदिन व निधीप्रदान सोहळा

नागपूर,ता. ३ सप्टेंबर २०२१: ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहूजन आघाडीत असताना ओबीसी बांधवांचे प्रश्‍न पोटतिडकीने मांडले मात्र त्यांच्या पक्ष्ात ओबीसींना योग्य न्याय मिळत नाही,ओबीसींच्या न्याय हक्कासाठी प्रकर्षाने लढा होत नसल्याचे बघून वंचितच्या बाहेर पडलो,पदमुक्त झालो आणि ‘नॅशनल डेमोक्रेटिक काँग्रेस’ची स्थापना केली.आमचे घोषवाक्यच ‘आता एकच रस्ता..बहुजनांची सत्ता’ही असून आमच्या संघटनेला मोठ्या प्रमाणात ओबीसी समजाचा,पदाधिकारांचा आणि नेत्यांचाही पाठींबा मिळत आहे,महाराष्ट्रातील येत्या महानगरपालिकांच्या निवडणूकीत एकूण ४ शहरात आमची संघटना पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे नॅशलन डेमोक्रेटिक काँग्रेसचे अध्यक्ष् ॲड.धनराज वंजारी यांनी आज पत्रकार भवन येथे आयोजित पत्र-परिषदेत सांगितले.

याप्रसंगी मंचावर संघटनेचे केंद्रिय सरचिटणीस प्रा.रमेश पिसे,केंद्रिय सरसंचालक वंदना बनकर,संजय हेडाऊ,मंगलमुर्ती सोनकुसरे,ॲड.वासुदेव वासे,पुलसर सतीबावणे,पुरुषोत्तम कांबळी,वैभव बनकर,जय मुसळकर,ॲड.वासुदेव वासे,सुनिल लाचलवार,सुनिल लोखंडे,हरिदास हटवार,महान नागपूरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना ॲड.वंजारी म्हणाले,की ओबीसींसाठी वेगळे प्रावधान असणे खूप गरजेचे आहे.अनुसूचित जाती,जमातींसाठी संविधानातच आरक्ष् ण दिले आहे मात्र ओबीसींसाठी फक्त आरक्ष् णाचे ‘धोरण ’ आहे,या दोन्ही बाबींमध्ये खूप मोठा फरक आहे.या धोरणाला कायदेशीर व संवैधानिक आधार देण्यासाठी ओबीसींची संघटना असणे अत्यावश्‍यक होते.

राजकीय पक्षांमध्ये ओबीसी सेल आहेत मात्र त्यांना स्वतंत्र असे धोरण नाही,पक्षाच्या धोरणाशी त्यांना बांधिलकी जपावी लागते त्यामुळे अश्‍या राजकीय पक्षांच्या ओबीसी सेलकडून ओबीसींना न्याय मिळणे अशक्यप्राय बाब आहे,राजकीय पक्षांच्या ओबीसी सेलचे पदाधिकारी हे फक्त ‘हस्तक’असल्याची टिका त्यांनी केली.या देशात अमाप धार्मिक आणि सामाजिक संघटना आहेत मात्र स्वतंत्र नेतृत्वाखाली ओबीसींची संघटनाच नाही.

ओबीसी नेतृत्वाचा पक्ष् ही झालेला नाही.या देशात ७४ ते ७८ टक्के ओबीसींची व्याप्ती आहे मात्र त्यांचा फक्त राजकीय उपयोगासाठी वापर होतो.त्यामुळेच १० जुलै २०२१ रोजी पत्र-परिषद घेऊन ‘नॅशनल डेमोक्रेटिक काँग्रेस’च्या स्थापनेची घोषणा केली.७ ऑगस्ट मंडळ दिनाचे औचित्य साधून पक्षाच्या मुख्यालयाचे नागपूरात उद् घाटन झाले.

आमच्या पक्षाला संपूर्ण महाराष्ट्रात भरघोस पाठींबा मिळत आहे.लाेक जुळत आहेत.इतर पक्षात जशी हूल्लडबाजी करुन राजकारण केल्या जातं तसे आमच्या संघटनेत होणार नाही,आमची संघटना सिद्धांत आणि तत्वांशी संधान साधणारी संघटना असणार आहे.गोवारी,आदिवसी,विशेष मागासवर्गीय वर्ग इ. प्रवर्गाचे हे संघटन आहे.

वंचितच्या बाहेर पडताच २६३ पदाधिका-यांचा मला पाठींबा मिळाला असल्याचे ॲड.वंजारी यांनी सांगितले.लोकांचा मनापासून सहभाग मिळत असल्याचे ते म्हणाले.म्हणूनच येत्या ५ सप्टेंबर माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार निवास कॅन्टीन हॉल,सिव्हील लाईन्स येथे सकाळी १०.३० वा.संकल्पदिन व निधीप्रदान सोहळ्याचे आयोजन केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

मनपाच्या निवडणूकीत इतर पक्षांशी युती करणार का?या संदर्भात बोलताना याविषयी आताच सांगणे कठीण असल्याचे ते म्हणाले.
प्रत्येक मोठ्या पक्षांची स्वतंत्र ओबीसी सेल असताना तुमच्या संघटनेचे भवितव्य काय?याबाबत बोलताना ओबीसी समाजाच्या लक्षात आता आले आहे या पक्षांचे ओबीसी मेळावे कसे होतात!या ओबीसी सेल स्वतंत्र नसून फक्त त्या-त्या राजकीय पक्षांचे हस्तक आहेत.यामुळे या राजकीय पक्षातील ओबीसी वर्ग ही प्रचंड अस्वस्थ आहे.आज ना उद्या ते सुद्धा आमच्या मंचावर आल्याशिवाय राहणार नाहीत,असा दावा ॲड.वंजारी यांनी याप्रसंगी केला.एक दिवस आमची संघटना खूप मोठी होणार असल्याचे ते म्हणाले.

बिहारमध्ये २००५ साली नितीश कुमार यांनी पक्ष् स्थापन केला व पहीली मनपाची निवडणूक लढवली तेव्हा पहीलच्या प्रयोगात ६ जागा मिळाल्या,आज तो पक्ष् बिहारमध्ये सत्ताधारी आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दूसरे उदाहरण देता येईल,मुंगी एवढे असून हत्तीशी लढा दिला,असाच लढा देणारे पदाधिकारी,कार्यकर्ते माझ्या दोन्ही बाजूला बसले आहेत,असे ते म्हणाले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या