फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमनपा केन्द्रांमध्ये शुक्रवारी कोव्हीशिल्डचे लसीकरण नाही

मनपा केन्द्रांमध्ये शुक्रवारी कोव्हीशिल्डचे लसीकरण नाही

Advertisements

तीन दिवसांनंतर सुरु झालेल्या लसीकरणाला पुन्हा एकदाअनिश्‍चित ब्रेक

तीन केंद्रांवर फक्त कोव्हॅक्सीन मिळणार

नागपूर, ता. ८ : शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला कोव्हीशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे मनपाच्या सर्व लसीकरण केन्द्रांवर शुक्रवारी (९ जुलै) रोजी कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही, ही माहिती अतिरिक्त आयुक्त  राम जोशी यांनी दिली.

तब्बल तीन दिवसांनंतर सुरु झालेल्या लसीकरणाला पुन्हा एकदा ‘अनिश्‍चित ब्रेक’लागला आहे.कारण ही तेच आहे,राज्य सरकारकडून लसींचा पुरवठा न झाल्यामुळे!राज्य सरकार सांगते केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा झाला नाही!

तिसरी लाट पुढे येऊन ठेपली असताना व लसीकरण ही एकमेव आशेची किरण असताना भारतीय नागरिकांची अशीच‘फूटबॉल चेंडूसारखी’ अवस्था आणखी किती काळ होणार आहे?याचे उत्तर साक्ष्ात ब्रम्हदेव ही देऊ शकणार नाहीत!कदाचित करोना महामारी संपून ही जाईल तोपर्यंत नागरिकांचे भारतात लसीकरणच सुरु राहील…..!

यामुळेच नागपूर महानगरपालिकेतर्फे जेव्हा कधी लसीकरण सुरु होतं प्रत्येक केंद्रावर नागरिकांची गर्दी ऊसळताना दिसते.एकाच दिवसात ३६ हजार ५८६ नागरिकांचे लसीकरण ही काल बुधवारी झालं.यात पहीला आणि दूसरा डोज घेणारे तसेच सर्वच वयोगटातील नागरिक होते.प्रश्‍न तेव्हा निर्माण होतो जेव्हा या ‘विक्रमी’लसीकरणाचे ‘प्रशासकीय’कौतूक होतं.नेते,पदाधिकारी,प्रशासन सगळेच आपली पाठ थोपटून घेतात.तीन दिवसांच्या प्रतीक्ष्ेनंतर ५० लाखांच्या लोकसंख्येच्या शहरात एका दिवसात ३६ हजार नागरिकांचे लसीकरण होतं ही स्वत:ची पाठ खरे तर थोपटून घेणारी घटना नाही मात्र तरीही शासकीय केंद्रे तसेच मनपाच्या १४४ केंद्रांमध्ये नागरिकांसाठी लसीकरणाची ही मोफत सोय उपलब्ध करुन दिल्याबद्दल याबाबत ‘आभार’मानून नागरिकांनी गप्प बसावे व ‘आपली वेळ’येण्याची वाट बघावी,एवढंच तूर्तास नागरिकांच्या हातात आहे.

१८ वर्षावरील व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन लसीचा पहिला व दूसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, आशिनगर झोन च्या मागे (डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे उपलब्ध आहे त्याचा मात्र नागरिकांनी लाभ घ्यावा,अशी मनपाची सूचना आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या