फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमनपा आरोग्य अधिका-यांनाच मास्कचे वावडे!सामान्यांवर मात्र जबर दंड वसूली!

मनपा आरोग्य अधिका-यांनाच मास्कचे वावडे!सामान्यांवर मात्र जबर दंड वसूली!

Advertisements

नागपूर,ता. १० डिसेंबर: महानगरपालिकेतर्फे काल बुधवार दि. ९ डिसेंबर रोजी महालातील नगरभवनात राज्यस्तरावरील ‘कायाकल्प’पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडला.या सोहळ्यात मनपातील सर्व अधिकारी हे सुरवातीला मास्क ‘धारण’करुन होते मात्र अवघ्या काही वेेळातच त्यांचा मास्क हा गळ्यातील शोभिवंत पट्टी बनला व ‘इतरांना सांगे ज्ञान आपण कोरडे पाषाण’या उक्तीप्रमाणे मनपाच्या आरोग्य विभागाच्या अधिका-यांमुळेच करोनाच्या संसर्गाला चांगलीच चालना मिळाल्याची टिका आज मनपात ऐकू आली.

केंद्र शासनपुरस्कृत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत दिला जाणारा सन २०१७-१८ च्या कायाकल्प पुरस्कारांची घोषणा राज्यसरकारने केली.प्रथम पुरस्कार हा मनपाअंतर्गत संचालित इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्राने पटकावला,द्वितीय पुरस्कार फुटाळा प्राथमिक आरोग्य केंद्राने तर दोन आरोग्य केंद्रांना प्रोत्साहनपर पुरस्कार प्राप्त झाले.निश्‍चितच मनपासाठी हा बहूमान वाढवणारा सोहळा असला तरी तोंडावरील मास्क काढणे व एकाच माईकवर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी,उपमहापौर मनीषा कोठे,आरोग्य समिती सभापती विरेंद्र कुकरेजा.अति.आयुक्त राम जोशी इ.यांनी भाषणे ठोकणे हे कितपत संयुक्तिक होते?असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे.
माईकवर बोलताना प्रत्येकाने मास्क खाली गळ्यात लटकवला होता,दरवेळी माईक हा सॅनिटाईजही करण्यात आला नाही,परिणामी एकीकडे केंद्र व राज्य शासनाचे .दिशानिर्देश आहेत शक्यतो गर्दी टाळावी,सुरक्ष्ति अंतर राखावे व सर्वात महत्वाचे म्हणजे कायम मास्क घालून रहावे.अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष् ज्यो बायडेन यांनी तर अध्यक्ष्पदाची शपथ घेताच पुढील १०० दिवस अमेरिकेत सक्तीने मास्क परिधानाचा कायदा लागू करणार असल्याची घोषणा केली,यावरुन पाश्‍चात्य देशांनाही करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी‘मास्क’चे महत्व कळाले आहे मात्र नागपूर महानगरपालिकेतील आरोग्य विभागाचेच अधिकारी या संपूर्ण सोहळ्यात मास्क गळ्यात लटकावून ‘मिरवताना’दिसलेत.

एकाच माईकवर मास्क काढून भाषणे ठोकल्याने उडणारी थूंकी यातून करोनाचा संसर्ग झाला नाही का?असा संशय व्यक्त करुन ते मनपाचे अधिकारी असल्यामुळे त्यांना ‘करोना’ने सूट दिली असा याचा अर्थ होतो का?अशी कोटी देखील या सोहळ्यावर करण्यात आली.

सिग्नवलर मनपा सुरक्ष्ाकर्मींकडून जबर दंड वसूली!
वर्दळीच्या एका चौकात आपल्या खासगी कारमध्ये कुटुंबातीलच दोन सदस्य हे जात असताना वाहन चालवणा-या सदस्याने मास्क घातला होता मात्र शेजारी बसलेल्या सदस्याने मास्क हा तोंडावर न लावता कारच्या डेस्कबोर्डवर ठेवला होता,एवढेच निमित्त घडले आणि…जणू अट्टल गुन्हेगार सापडावा अशी झडप लगेच सिग्नलवर उभ्या सुरक्ष्ाकर्मीनी कारमधील या सदस्यांवर घातली व ५०० रुं.चा दंड ठोठावला!स्वत:च्या खासगी कारमध्ये स्वत:च्या कुटुंबातील सदस्यासोबत कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी करोनासंबंधीच्या नियमांचे उल्लंघन न करणा-या सामान्य जनतेकडून एनडीआरएसचे सुरक्ष्ाकर्मी हे फक्त मास्क न घातल्यामुळे जबरीने व वाद घालून दंड वसूल करताना शहरभर आढळतात,दुसरीकडे मनपाच्याच आरोग्य विभागाचे व इतर अधिकारी हे सार्वजनिक सोहळ्यात मास्क गळ्यात लटकावून सर्रास नियमांचे उल्लंघन करताना व्हिडीयो व फोटोमध्ये झळकतात तेव्हा सामान्यांचा संताप उफाळतो.

या सोहळ्यात मनपाच्याच काही महिला कर्मचारी या चक्क बिना मास्कने इतरांसोबत ‘सेल्फी’काढताना दिसतात आहेत,यामुळे देखील करोनाच्या नावाखाली मनपा अधिका-यांच्या या दुटप्पी धोरणांवर अनेकांनी आज खासगीत संताप व्यक्त केला.विशेष म्हणजे कालच्या सोहळ्यामुळेच अनेकांना करोनाचा संसर्ग झाला असल्याची चर्चा आज मनपात ऐकू आली!

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या