फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमनपा आयुक्तांना केंद्रिय अनुसूचित जाती आयोगाची नोटीस:१५ दिवसात मागितला खुलासा

मनपा आयुक्तांना केंद्रिय अनुसूचित जाती आयोगाची नोटीस:१५ दिवसात मागितला खुलासा

Advertisements


आयुक्तांनी दाखवली नोटीसीला केराची टोपली!घेतल्या उमेदवारांच्या मुलाखती!

नागपूर,ता.११ एप्रिल २०२३: मनपातर्फे कंत्राटी विधी अधिकारी सहाय्यक या पदासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून संवैधानिक आरक्षणाच्या तरतुदींची पायमल्ली केल्याचा पार्श्वभूमीवर ,केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाने याची गंभीर दखल घेत,आयुक्तांना नोटीस बजावली असून, हे प्रकरण आयुक्तांच्या चांगलेच अंगाशी येणार असल्याचे बोलले जात आहे.

नागपूर महापालिकेच्या आस्थापना विभागामार्फत दिनांक २७ मार्च २०२३ रोजी कंत्राटी विधी अधिकारी सहाय्यक या तीन पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून प्रत्यक्ष मुलाखत दिनांक ११ एप्रिल २०२३ ला आयोजित करण्यात आली होती,ज्यामध्ये विधी अधिकारी सहाय्यक हे तीन पदे खुल्या संवर्गातील ठेवण्यात आले.हे आरक्षणाच्या संवैधानिक तरतुदीला बगल देण्याचा प्रकार असून, आरक्षण असलेल्या इतर संवर्गावर अन्याय कारक होते,जी अत्यंत गंभीर बाब होती.

मनपा आयुक्तांनी घेतलेल्या असंवैधानिक निर्णयाची आणि कृतीची गंभीर दखल केंद्र सरकारच्या अनुसूचित जाती आयोगाने घेतली व यांदर्भात आयोगाने मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना तात्काळ नोटीस बजावली असून येत्या १५ दिवसात केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाला आपला विस्तृत खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे .

एवढेच नव्हे तर खुलासा हा दिलेल्या वेळेत न दिल्यास मनपा आयुक्तांवर आयोगातर्फे समन्स बजावण्यात येईल अशी तंबी सुद्धा नागपूर मनपाला दिली !

महत्वाची बाब म्हणजे मनपा मध्ये लोकप्रतिनिधी कार्यरत नसताना आणि राज्य सरकारची कोणतीही पुर्व परवानगी न घेता, मनपाच्या आकृतिबंध मध्ये नमूद नसलेल्या पदाची जाहिरात, मनपा आयुक्तांनी केवळ हेतुपुरस्सरपणे काढली.

शासकीय पदावरील एका आयएसआय अधिका-यांनी केलेला हा प्रकार म्हणजे, संपूर्णतः कायदेकक्षाबाहेरील बाब असून असंवैधानिक असल्याचे अँड राहुल झांबरे यांनी आज पत्रकार भवन येथे आयोजित पत्र परिषदेत सांगितले.

अत्यंत गंभीर बाब म्हणजे,केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाने दि.१० एप्रिल २०२३ रोजी मनपा आयुक्तांना नोटीस बजावल्या नंतरही दुसऱ्याच दिवशी मनपा आयुक्तांनी तडकाफडकी आज दि.११ एप्रिल २०२३ रोजी उमेदवारांची थातुरमातुर मुलाखती घेऊन आयोगाला चिथावणी देण्याचा प्रकार करण्यात आला !

हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचे ॲड.झांबरे याप्रसंगी म्हणाले.

याशिवाय मनपाच्या मागासवर्गीय कक्षाच्याही आरक्षण बिंदु नियमावलीची पूर्व परवानगीही मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी घेतली नसल्याचा आरोपही यावेळी अँड. राहुल झांबरे यांनी केला. त्या

मुळे २७ मार्च २०२३ रोजी विशिष्ट अशा केवळ खुल्या संवर्गातील तीन कंत्राटी विधी अधिकारी सहाय्यकाची नियुक्ती करण्याबाबतची जाहिरात तात्काळ रद्द करावी तसेच आज घेतलेल्या मुलाखतीच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणीही पत्रकार परिषदेत अँड. राहुल झांबरे यांच्यासह अँड. प्रतीक पाटील, अँड. नितीन गवई,अँड. समिंद्रा करवाडे अँड. राजन फ़ुलझेले,अँड. युवराज कांबळे, अँड. मधुकर गडकरी यांनी केली.
……………….

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या