

खासगी रुग्णालयांचे संचालक व मनपा अायुक्तांची ‘गळाभेट‘निषेधार्ह्य
नागपूर,ता. २६ मे: इंडियन मेडीकल असोसिएशन व विदर्भ हाॅस्पीटल असोसिएशनने नुकतीच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. व अति.आयुक्त जलज शर्मा यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सोपवले यात त्यांच्या रुग्णालयांवर ऑडीटसाठी जवाबदारी निश्चित करण्यात आल्यास ते कोविडवर उपचार करणे बंद करतील असे निवेदनाच्या आड सरळ-सरळ धमकीच देण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले.‘जय जवान जय किसान’संघटनेची मागणीच ही आहे शहरातील या सर्व खासगी रुग्णालयांच्या जमिनींचेच ‘ऑडीट’झाले पाहिजे,यातून किती रुग्णालयांनी मनपाच्या नियमांचे भंग केले,किती रुग्णालयांनी मनपा पदाधिक-यांच्याच संगनमताने मनपाच्याच जमिनी लाटून त्यावर अद्यावत रुग्णालये बांधली आहे,हे सत्य जनतेसमोर येईल अशी मागणी ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष् प्रशांत पवार यांनी पत्रकाद्वारे केली.
खासगी रुग्णालयांचे संचालक करोनासारख्या महाभयंकर महामारीच्या काळात रुग्णांवर उपचार करण्याचे सोडून उलट त्यांच्यावर मनपा प्रशासनाचे किवा न्यायालयांची देखरेख नकोच,अशी मागणीच करुच कशी शकतात?याचा अर्थ मनपा पदाधिकारी आणि प्रशासनासोबतच त्यांची ‘मिलीभगत’उघड होते,असा आरोप त्यांनी केला.
नागपूरकर जनता, कोेविडवर उपचार न करण्याची खासगी रुग्णालयांची धमकी ही कदापि सहन करुन घेणार नाही,जाणकारांनी तिसरी लाट येण्याची जी शंका व्यक्त केली आहे त्यातही ‘वाहत्या गंगेत हात धूण्याची’संधी खासगी रुग्णालयांना हवी आहे त्यामुळेच ते न्यायालयाच्या आदेशानंतरही मनपा प्रशासनाद्वारे खासगी रुग्णालयात ‘ऑडिटर्स’नेमण्यास विराेध करीत असल्याचा जळजळीत आरोप त्यांनी केला.
मनपा आयुक्तांनी त्यांना समज देण्याऐवजी व त्यांच्यावर देशात लागू असणा-या साथरोग व आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्याऐवजी त्यांचे म्हणने मुकाट्याने खाली मान टाकून ऐकून घेतले ,असे आयुक्त व गेल्या वर्षभरापासून खासगी रुग्णालयांवर देखरेखीसाठी जे अति.आयुक्त जलज शर्मा नियुक्त करण्यात आले मात्र त्यांनी एकाही खासगी रुग्णालयांना नोटीसीरुपात ‘प्रेमपत्र‘देण्यापलीडे कोणतीच कारवाई केली नाही, असे अति.आयुक्त या दोघांचीची तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उचलबांगडी करावी अशी मागणी प्रशांत पवार यांनी केली.
एप्रिल महिन्यात ज्याप्रमाणे शहारातील अनेक खासगी रुग्णालयांनी गरीब,गरजू रुग्णांची आर्थिक लृट केली,एका माऊलीने तर आपले मंगळसूत्र देखील आपल्या मुलासाठी विकले,मध्यमवर्गीयांची संपूर्ण जमापूंजी उपचारावरच संपली,ज्येष्ठांचे भविष्य निर्वाह निधीच या खासगी रुग्णालयांनी लाखो रुपयांचे अवास्तव बिले काढून लाटल्या,अश्या खासगी रुग्णालयांविरोधात आयुक्त हे कठोर कारवाई करणार नसतील,त्यांच्या रुग्णालयांचे ‘ऑडिट‘करणार नसतील तर ‘जय जवान जय किसान’संघटना आयुक्तांचाच घेराव करेल,असा इशारा प्रशांत पवार यांनी दिला.




आमचे चॅनल subscribe करा
