फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमनपाच्या ‘सेवानिवृत्तांनाही’ आता सातव्या वेतन श्रेणीचा लाभ

मनपाच्या ‘सेवानिवृत्तांनाही’ आता सातव्या वेतन श्रेणीचा लाभ

Advertisements

आभा पांडे यांच्या प्रयत्नांना यश:उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रस्तावावर शिक्कामोतर्ब

नागपूर,ता. १७ जून: महानगरपालिकेच्या हजारो अधिकारी व कर्मचा-यांना सातव्या वेतन श्रेणीचा लाभ मिळण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस व ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून त्यांनी हे निवेदन दिले होते.उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ मनपाचे आयुक्त राधाकृष्णन बी.यांच्यासोबत दूरध्वनीवरुन संवाद साधला व त्वरित प्रधान सचिव यांना नागपूर महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंबधी निर्देश दिले.

नगरसेविका आभा बिज्जू पांडे यांनी सांगितले की दि.१० जून २०२१ रोजी त्यांना उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयातून त्यांच्या निजी सचिव यांच्याद्वारे सूचना मिळाली की लवकरच या प्रस्तावाबाबबत अधिसूचना जारी केली जाईल.१६ जून २०२१ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द पाळला व आभा पांडे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश झाले.त्यांच्या या निर्णयामुळे मनपातील हजारो सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचा-यांना याचा लाभ होणार आहे.

महत्वाचे म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून या विषयाला घेऊन मनपाचे प्रशासन हे सातत्याने राज्य शासनाची दिशाभूल करीत होती.विशेष म्हणजे याचा लाभ एकमेव नागपूर मनपा सोडून राज्यातील सर्व महानगरपालिकेत लागू झाला होता.

आभा पांडे यांनी उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष् या बाबीकडे वेधले व उपमुख्यमंत्री यांनी सहानुभूतीपूर्वक या प्रस्तावावर विचार करुन तो प्रस्ताव लगेच स्वीकृत केला. राज्यातील इतर महानगरपालिकेप्रमाणेच नागपूर महानगरपालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचा-यांना देखील सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळायलाच पाहिजे असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

८ डिसेंबर २०२१ च्या शासन निर्देशानुसार नागपूर मनपाच्या कर्मचारी व शिक्ष् कांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला मात्र निवृत्ती वेतनधारकांबाबत मनपा आयुक्तांनी शासनाचे स्पष्ट आदेश असून देखील निर्णयच न घेतल्यामुळे सर्व निवृत्ती वेतनधारकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली होती.

वास्तविक पाहता महाराष्ट्र शासनाने राज्यातील ज्या-ज्या महानगरपालिकांना सातवा वेतन आयोग लागू केला त्या-त्या मनपामध्ये निवृत्त वेतनधारकांनाही सदर आयोग लागू केलेला आहे.सर्व निवृत्त वेतनधारक हे मंजूर पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत तसेच प्रत्येक वेळी कार्यरत कर्मचा-यांसोबत सेवानिवृत्त कर्मचारी व शिक्ष् कांनासुद्धा अायोग लागू होत असतो.याकरिता शासनाने वेगळा आदेश कधीच काढलेला नाही.

निवृत्तीधारकांना कौटूंबिक जवाबदारी यासोबतच औषधोपचाराचा खर्चसुद्धा करावा लागत असतो.या सर्व मानवीय बाबींचा विचार करुन नागपूर मनपात निवृत्तीधारकांना देखील सातवा वेतन आयोग त्वरीत लागू करण्याचे आदेश प्रदान करावे,अशी मागणी आभा पांडे यांनी उपमुख्यमंत्री यांना २१ मे २०२१ रोजी निवेदनाद्वारे केली होती.

आभा पांडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या बहूप्रतिक्ष्ति निर्णयाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोेकळा केल्याने आभार मानले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या