फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमनपाच्या आणखी एका कंपनीवर गाज: हंजर बायोटेकची विभागीय चौकशी

मनपाच्या आणखी एका कंपनीवर गाज: हंजर बायोटेकची विभागीय चौकशी

आमदार विकास ठाकरे यांनी विधान सभेत उपस्थित केला प्रश्न

 नागपूर: हंजर बायोटेक कंपनीने महापालिकेत केलेल्या गैरव्यवहाराची विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती चौकशी समिती नेमून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभेमध्ये उपस्थित केलेल्या तारांकीत प्रश्नाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या उत्तरात समिती स्थापन करण्याचे आणि दोषींविरुद्ध कारवाईचे आदेश दिले.

नागपूर महापालिकेचे अधिकारी यांनी मागील अनेक वर्षांपासून कंपनीला पाठिशी घातले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन हंजर कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची व दोषी अधिका-यांना निलंबित करण्याची मागणी ठाकरे यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली होती. नागपूर शहरातील कच-यावर भांडेवाडी येथे प्रक्रिया करुन कंपोसट खत निर्मीतीसाठी हंजर बायोटेक या कंपनीशी एप्रिल २००९ मध्ये १२ वर्षांचा करार करण्यात आला.

या करारानुसार दररोज ६०० मॅट्रीक टन कच-यावर प्रक्रिया करायचे होते. प्रत्यक्षात २०० मॅट्रीक टन कच-यावर प्रक्रिया करण्यात येत होती. सध्या तर २० मॅट्रीक टन कच-यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. नागपुरातील नागरिक कृती समितीने कच-यांची योग्य व करारानुसार विल्हेवाट होत नसल्यामुळे उच्च न्यायालयात धाव घेतली. महापालिका आणि कंपनीला प्रत्येकी २० लाख रुपायांचा दंड केला. या कंपनीने अद्यााप दंड भरला नाही.

हंजर कंपनीने या प्रकल्पामध्ये ५० कोटी किंमतीची यंत्रसामग्री लावली असे प्रमाणीत करुन काम मिळवले. व नंतर प्रकल्पाला स्वत: आग लावून जाळून टाकले आणि विमा कंपनीकडून विम्याची रक्कम वसूल केली. या कंपनीने देशभरातील १९ महापालिकांना सुमारे १२०० कोटी रुपयांनी गंडविले आहे. यामध्ये सासवड, पुणे, फरीदाबाद, भावनगर, दुर्गापूर या व इतर महापालिका आणि नगरपालिका आहेत. पंजाब नॅशनल बॅकेला २५० कोटी रुपयांनी ने बुडविल्याची सीबीआय चौकशी सुरु आहे. यातील काही रक्कम हुमा सिंथेटीक प्रायवेट लिमिटेड या हंजर ग्रुप मधील कंपनीमध्ये वळती केल्या आहेत. अशा या बिओटी तत्वावरील असलेला प्रकल्प महापालिकेला हस्तांतरीत होणार होता. परंतु प्रकल्पात प्रक्रिया करण्याची क्षमता नाही, असे आमदार ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या