फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमनपाचे ‘सर्वोच्च‘ सभागृह डबे खाण्यासाठी उपलब्ध!

मनपाचे ‘सर्वोच्च‘ सभागृह डबे खाण्यासाठी उपलब्ध!

Advertisements

आरोग्य विभागाच्या बैठकीत दशकांची पंरपरा खंडीत

आरोग्य विभागाचे अधिकारी लोकप्रतिनिधींपेक्षाही ‘भारी’

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. ३ ऑक्टोबर: मनपाच्या आरोग्य विभागाचा आढावा घेणारी बैठक काल शनिवारी महाल येथील नगरभवनात पार पडली.सकाळी १० ते सायंकाळी ४.३० दरम्यान पार पडलेल्या या बैठकीचे वैशिष्ठ म्हणजे बैठकी दरम्यान सर्रास डबे उघडण्यात आले,अधिकारी व कर्मचा-यांसाठी जेवणाची प्लेट जागेवर बसल्या-बसल्याच उपलब्ध करण्यात आली,बैठकीमुळे क्षीणलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांसाठी चहा देखील सभागृहातच अनेकदा फिरला,प्लास्टिकच्या कप्सच्या ‘कच-याने’ सभागृहाची आणखी ‘शोभा‘ देखील वाढली,यावरुन मनपाचे ‘सर्वोच्च’ सभागृह हे आता आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांना डबे खाण्यासाठी उपलब्ध झाले असल्याची जोरदार चर्चा कालच्या सभेनंतर रंगली.

अनेक अधिका-यांना सभागृहाचा हा अवमान रुचला नाही मात्र मनपा मुख्यालयातील दिपाली नगरारे या परिचारिकेच्या निर्देशानुसार जेवण व चहा सभागृहाच्या आतच उपलब्ध करुन देण्याच्या निर्देशा पुढे ते ही हतबल झाले व सर्वोच्च सभागृहाचा हा नैतिक व संवैधानिक अपमान मूग गिळून बघत बसण्याची वेळ त्यांच्यावर आली.

या सभागृहात नागपूरकर जनतेचे प्रश्‍न मांडले जातात,त्यावर चर्चा होते,प्रशासनाला निर्देश दिले जातात,अश्‍या राज्याच्या उपजराजधानीतील सर्वोच्च सभागृहाचे चक्क ‘उपहारगृह’करण्याचे धाडस मनपाच्या आरोग्य विभागाकडून सर्रास केल्या जात असल्यामुळे मनपा प्रशासन हे लोकप्रतिनिधींपेक्षा ही ‘किती भारी’आहेत याचा प्रत्यय नागपूरकरांना आला.

लोकप्रतिनिधींना देखील सभागृहात जेवण किवा चहा घेण्यास मज्जाव आहे,हे विशेष! अर्थसंकल्प सभेच्या वेळी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिका-यांसाठी जेवणाची व्यवस्था ही बाहेर मंडप टाकून केली जाते ते ही सभा स्थगित असते त्याच वेळी जेवण केल्या जातं.कालच्या सभेत मात्र सर्वोच्य सभागृहाचा परंपरागत पायंडाच अक्षरश: मोडण्यात आला.पुण्यातील डॉ.डेकाटे यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.एकीकडे डॉ.डेकाटे यांनी मनपा प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारावर तोशेरे ओढत चांगलीच खरडपट्टी काढली,दूसरीकडे त्यांच्याच्या परवानगीने सभागृहाच्या आत खाण्या-पिण्याची परवानगी प्रदान करण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली.

विशेष म्हणजे आरोग्य विभागाचे ‘गाजलेले धुरंधर वैद्यकीय अधिकारी’यांनीच एवढ्या महत्वाच्या बैठकीला चक्क दांडी मारली.यात बहूचर्चित डॉ.गंटावार यांचा ही समावेश होता.जवाबदारीच्या पदावर असलेल्या डॉ.भावना सोनकुसळे या देखील अनुपस्थित होत्या.यांच्या अनुपस्थितीची दखल अति.आयुक्तांमार्फत घेण्याची शक्यता धुसरच असल्याचे बोलले जात आहे.तसे ही नागपूरकरांचे प्राथमिक आरोग्य हे मनपाच्या आरोग्य विभागाच्या लेखी किती महत्वपूर्ण आहे याची प्रचिती याच वर्षी एप्रिल व मे महिन्यात करोनाच्या दुस-या लाटेदरम्यान नागपूरकरांना चांगल्याने आली आहे.

सर्वोच्य सभागृहाचे डेकोरम न पाळल्या गेल्याचे दोषारोपण अनेक निवृत्त ज्येष्ठ अधिकारी हे नव्या अधिका-यांना देत असून ‘मन मानेल’तसा कारभार सध्या मनपात सुरु असल्याचा ‘सूर’ उमटत आहे.सभागृहाच्या आत खाण्या-पिण्याचे पदार्थ खाऊ नये असा कोणताही लेखी नियम नसला तरी देशाचे असाे किवा मनपाचे सर्वोच्च सभागृह ते लेखी नियमपरंपरा अश्‍या दोन प्रकारे संचालित होत असतात.

सभागृहाच्या आत बसून खाणे-पिने करु नये अशी परंपरा गेल्या अनेक दशकांपासून पडलेली असताना काल या परंपरेलाच फाटा देण्यात आला.सभागृहात एका मनपाच्या युपीएसचीच्या दिव्यांग डॉक्टरला जागेवरच जेवण्याची अशी परवानगी दिली असल्याचे प्रशासनातील एका अधिका-याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले मात्र त्या डॉक्टर महोदया दोन वेळा उठून स्वच्छता गृहात जाऊ शकतात मात्र याच सभागृहाला लागून असलेल्या भव्य कक्षात जाऊन जेऊ शकत नव्हत्या का?असा प्रश्‍न उपस्थित केल्या जात आहे.

सर्वोच्च सभागृहाचे नियम किवा परंपरा हे दिव्यांग असो किवा सर्वसामान्य प्रशासकीय अधिकारी,सर्वांना समानरुपात लागू होत असतात.उद्या देशाच्या सर्वोच्च संसदेत देखील एखादा दिव्यांग कर्मचारी हा प्रचार माध्यमांमध्ये चक्क जेवण करतानाचे दृष्य भारतीयांना बघायला मिळाल्यास जी प्रतिक्रिया देशभर उमटेल तशीच संतापजनक प्रतिक्रिया कालपासून नागपूरकरांमध्ये उमटली आहे.
जिथे लोकप्रतिनिधी असणा-या नगरसेवकांना देखील बाहेर जाऊन चहा घ्यावा लागतो तिथे मनपाच्या आरोग्य विभागाच्या अधिका-यांना व कर्मचा-यांना कशाची एवढी मिजाज आहे?असा संताप व्यक्त केला जात आहे.

जर एखादी दिव्यांग डॉक्टर सभागृहाच्या आतील कक्षापर्यंत ही चालू शकत नाही तर त्यांना सरकारी नोकरी देण्यातच कशी आली?डॉक्टर म्हणून कर्तव्य बजावताना फिरावं ही लागतं मग त्या जागेवरच बसून कार्य साधत असतात का? महीनाकाठी ६० हजार पगार घेणा-या दिव्यांग डॉक्टर जर सर्वोच्च सभागृहात बसूनच जेवण करण्याच्या पात्रतेच्या असतील तर त्या रुग्ण कसे तपासतात?तपासतात कि नाही?असे अनेक प्रश्‍न आता उपस्थित केले जात आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या