फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमनपाचे डॉ.गंटावार स्वत:च्या खासगी रुग्णालयात सेवा देण्यात मग्न!

मनपाचे डॉ.गंटावार स्वत:च्या खासगी रुग्णालयात सेवा देण्यात मग्न!

Advertisements

(व्हिडीयोमध्ये रुग्णालयात खाट उपलब्ध आहे का बघून सांगतो,असा संवाद देखील ऐकू येत आहे)
६ महिन्यांपासून चक्क रजेवर: मनपाचा पगार मात्र सुरु

मनपाचे पदाधिकारी गंटावारांवर अद्यापही मेहरबानच

नागपूर,ता. १० मार्च: शहरात करोनाचा महाभयंकर प्रकोप सुरु असून करोना संसर्गाच्या या दुस-या लाटेने सर्वसामान्य नागरिकांवर अक्ष् रश: झडप घातली आहे.दररोज संसर्गितांचा आकडा हा ४ हजारच्या वर तर मृतकांचा आकडा हा अर्धशतक पार करीत आहे.दूसरीकडे शहरातील नागरिकांचे आरोग्य सांभाळण्याची जवाबदारी ज्यांच्यावर आहे त्या नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील बहूचर्चित सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार मात्र अद्याप ही ६ महिन्यांपासून रजेवर असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे.
एवढंच नव्हे तर रजेवर असताना देखील त्यांचा संपूर्ण पगार अगदी वेळेवर त्यांच्या खात्यात जमा होत असल्याचे सांगितले जात आहे.मनपाच्या कोणत्या नियमांअंतर्गत महामारीच्या काळात जनतेला आरोग्य सेवा पुरविण्याचे सोडून रजेवर असणा-या वैद्यकीय अधिका-याला पगार देण्याचा नियम आहे?अशी विचारणा आता केली जात आहे.

महत्वाचे म्हणजे गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून करोनाने जगासोबतच उपराजधानीतसुद्धा धूमाकूळ घातला आहे.त्यावेळी करोना हा विषाणू जगासाठी देखील नवा होता.त्यावरील प्रतिबंध,उपाययोजना,विलगीकरण,उपचार इ.चा संपूर्ण भार अद्यापही आरोग्य विभागावरच असताना गेल्या ६ महीन्यांपासून प्रदीर्घ रजेवर राहण्याची मुभा डॉ.गंटावार यांना कशी काय मिळते?कोणत्या सत्ताधारी पदाधिका-याचे ते इतके लाडके आहेत की एकीकडे सर्वसामान्य जनता ही उपचारासाठी तडफडत असताना मनपाचे हे वैद्यकीय अधिकारी धंतोली येथील आपल्या प्रशस्त खासगी ‘कोलंबिया’रुग्णालयात बसून जनतेचे प्राण वाचविण्यात(नोटा छापण्यात)मग्न आहेत?

‘सत्ताधीश’च्या हाती असाच एक व्हिडीयो आला असून यात डॉ.गंटावार युवा मोर्चाच्या सदस्यांशी रुग्णाच्या बिलावरुन तसेच विमा कंपन्यांकडून मिळणा-या अल्पशा भूगतानावरुन वाद घालताना दिसत आहेत.

येत्या तेव्हा याचना करुन येता,जीव वाचवल्यावर पैश्‍यांना घेऊन वाद घालतात,असे देखील ते बोलताना आढळून येत आहे.डॉक्टर हे देव मानले जातात,रुग्णांचा प्राण वाचविणे हा तुमचा माणूसकीचा धर्मच आहे,असे उत्तर एकाने दिले असता,मला नका शिकवू धर्मवगैरे असा अभिप्राय गंटावार देतात!

माजी व आजी मनपा आयुक्तांची मर्जी राखण्यात तसेच माजी व आजी महापौरांवर डॉ.गंटावारांनी अशी कोणती भूरळ घातली आहे की त्यांच्या निलंबनाचे आदेश जून २०२० च्या सर्वसाधारण सभेत निघाले असतानाही ते आपल्या पदावर अद्यापही ठाण मांडून बसले आहेत!

महामारीच्या काळात मनपा प्रशासनाने कश्‍याप्रकारे वारंवार ठाणबंदीचा निर्णय लादून सामान्य जनतेचे कंबरडे मोडले,हे सामान्य जनता व व्यापरी वर्ग बघतच आहे मात्र सामान्य जनतेच्या घामाच्या पैश्‍यातून एका वैद्यकीय अधिका-याला चक्क ६ महिन्यांपासून पगार देऊनसुद्धा जनतेला आरोग्यासाठी या डॉ.गंटावारांच्या सेवेचा कोणताही उपयोग होत नाही मात्र दूसरीकडे आपल्या खासगी रुग्णालयात बसून ते प्रत्येक खाटाची चांगलीच किंमत वसूल करताना दिसत आहेत.

आता तरी डॉ.गंटावार यांना कायमची सूटी देण्यात येईल का?की पुढील निवडणूकीपर्यंत त्यांच्यावर अशीच ‘मेहरबानी’होत राहणार ?याकडे आता जनतेचे लक्ष् लागले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या