

तीन केन्द्रांवर कोव्हॅक्सीन उपलब्ध
नागपूर, ता.२८ : शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला कोव्हीशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे मनपाच्या सर्व लसीकरण केन्द्रांवर मंगळवारी (२९ जून) रोजी कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही, ही माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन लस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, आशिनगर झोन च्या मागे (डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे उपलब्ध आहे.
तसेच ज्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे.
रविवारी लसीकरण बंद होते तर साेमवारी सर्व केंद्रांवर लसीकरण सुरु ठेवण्यात आले होते.मात्र मंगळवारी पुन्हा मनपाच्या सर्व केंद्रांवर लसीकरण होणार नसल्याचे मनपातर्फे प्रसिद्ध करण्यात आले.याचा अर्थ नागपूर शहरात मनपाच्या सर्व केंद्रांवर एक दिवसा आड लसीकरण पार पाडल्या जात आहे,नियोजन नसल्यामुळे याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.




आमचे चॅनल subscribe करा
