फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमनपाची झाडे कापतात मनपाचेच जाहीरातदार!

मनपाची झाडे कापतात मनपाचेच जाहीरातदार!

Advertisements

स्वत:च्याच झाडांचे सरंक्ष् ण करु शकत नाही ती मनपा शहरातील झाडांचे सरंक्ष् ण काय करु शकणार?

पर्यावरणवाद्यांचा प्रश्‍न:शहरात जाहीरात माफियांचा धूमाकूळ

नागपूर,ता. ३ ऑगस्ट: या भूतळावर सर्वात कृतघ्न जर का कोणती निसर्गाची निर्मिती असेल तर ती मानवप्राणी असल्याचेेेेेेे बोलले जाते,त्याला फक्त ‘घेणं आणि ओरबाडणं’माहिती आहे ‘देणं’त्याला जमत नाही आणि समजत ही नाही,जे झाड मानवाला जगण्याचे श्‍वास पुरवतात,त्याच्या फूफ्फूसाठी प्राणवायू देतात त्याच झाडांना कृतघ्न मानवप्राणी हा निर्दयतेने कापून फेकतो,सध्या तर विकासाच्या नावाखाली अशी शेकडो उदाहरणे नागपूर शहरात घडत आहे,त्यातल्या त्यात झाड कापणं ही सर्वात सोपी गोष्ट असून शिवाय त्या लाकडाचे ‘दाम’ देखील माणसाला मिळतात,या लोभा पुढे प्राणवायुचा विचार करतोच कोण?अमरावती मार्गावर तर मनपामध्ये पैसे भरुन जाहीरात लावण्या-यांनी झाडांमुळे त्यांची जाहीरात रस्त्याच्या त्या बाजूने दिसत नसल्यामुळे चक्क मनपाचीच तीन चांगली मोठी झालेली झाडे कापून फेकली!

परिणामी शहरातील पर्यावरणवाद्यांना हा गंभीर प्रश्‍न पडला जी स्वायत्त संस्था स्वत:च्याच झाडांचे संरक्ष् ण करु शकत नाही ती शहरातील हजारो झाडांचे संरक्ष् ण कशी करु शकणार?मूळात करोनाचा प्रकोप कमी झाला असल्यामुळे मनपाचे सर्वाच्च पद भूषवणारे मनपा आयुक्तांनी आता शहराच्या इतर ही प्रश्‍नांकडे लक्ष् पुरवणे गरजेचे असताना ना त्यांचे लक्ष् पर्यावरणाकडे आहे ना शहरात साचलेल्या कच-याकडे असा संताप व्यक्त केला जात आहे.

२७ जुलै रोजी सकाळी अमरावती मार्गावरील या ठिकाणी एका ऑटामधून ३-४ माणसे आली आणि क्ष् णार्धात ३ झाडे कापून निघून गेल्याचे येथील प्रत्यक्ष् दर्शी सुरक्ष्ा रक्ष् काने सांगितले. या ठिकाणी ‘लोंदे ज्वेर्ल्स’ची जाहीरात झळकत आहे,याच ठिकाणी जुन्या कारचे शो-रुम आहे,अापले दूकान किवा आपली जाहीरात या झाडांमुळे लोकांना दिसणार नाही या सबबीखाली दुस-या शब्दात सांगायचे झाल्यास फक्त भौतिक लोभातून चांगली वाढलेली व तग धरुन उभी असणारी ३ झाडे क्ष् णार्धात कापून फेकण्यात आली!

आता मनपाचा उद्यान विभाग यावर काय कारवाई करणार याकडे शहरातील पर्यावरणवाद्यांचे लक्ष् लागले आहे.विना परवानगी झाड कापणे हा गुन्हा आहे.दंड व शिक्ष् ा अशी दोन्ही तरतूद या कायद्यात आहे.मनपा दरवर्षी लाखो रुपये वृक्ष् रोपणावर खर्च करत असते.मनपाच्या परवानगीशिवाय एक फांदी देखील कापण्याची परवानगी नागरिकांना नाही,अश्‍यावेळी मनपात जाहीरात विभागात जाहीरातीचे पैसे भरुन जर मनपाची एक नव्हे तर चक्क३-३ झाडे कापली जाणार असेल तर मनपाच्या प्रशासनावर गंभीर प्रश्‍नचिन्ह निर्माण होतो.

 

वृक्ष् तोडीबद्दल केला ४० काेटींचा दंड-भारताचेच उदाहरण-
साचलेले पाणी काढायच्या सबबीखाली ६३ झाडे तोडल्याप्रकरणी नुकतेच कलकत्ता उच्च न्यायालयाने सौमित्र कांता डे यांना ४० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.२०१७ मध्ये या गुन्ह्याची नोंद झाली होती.खासगी मालमत्तेच्या आवारात साचलेले पाणी काढून टाकण्याची कोलकत्ता महापालिकेकडून नोटीस मिळाल्याने पाणी काढण्यासाठी झाडे तोडावी लागली,असा दावा डे यांनी केला होता.मात्र,पाणी काढून टाकण्याचा व झाडे तोडण्याचा काहीही संबंध नव्हता,असा दावा पश्‍चिम बंगाल सरकारने केला.संबंधित जागेवर सप्ततारांकीत हॉटेल उभारण्यासाठी डे यांनी हे कृत्य केल्याचे सांगताच न्यायालयाने डे याना तब्बल ४० कोटी रुपयांचा दंड आकारला.
मग जो न्याय कलकत्ताच्या ६३ झाडांना मिळतो तो महाराष्ट्राच्या उपराजधानीतील झाडांना का मिळत नाही?असा सवाल शहरातील पर्यावरणवादी करतात.सरकार चुपचाप बसतं,न्यायालयात दाद मिळत नाही त्यामुळेच झाडांच्या मूळावर उठसूट उठण्याची हिंमत अश्‍या लोभी माणसांची होते,असा संताप ते व्यक्त करतात.

मुख्यमंत्री व गडकरी यांच्यावरही आगपाखड-
गडकरी यांच्या उड्डाण पुलाच्या उद् घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन हजेरी लावतात व त्यांचे कौतूक करतात,संपूर्ण महाराष्ट्रात पर्यावरणाला हानि न पोहोचवता रसत्यांचे जाळे विणले गेले पाहिजे अशी अपेक्ष्ा ही व्यक्त करतात मात्र दुसरीकडे सेवाग्राम आणि दत्तपूर या रस्त्याच्या कामासाठी एका रात्रीत ५५ अतिशय जुन्या वृक्ष्ांची कत्तल केली जाते ती ही मध्यरात्री याबाबत कोणीही बोलत नाही!

बांधकाम विभागाची या वृक्ष् तोडीसाठी परवानगी होती असा वाद पर्यावरणवाद्यामंध्ये व बांधकाम विभागातील अधिका-यांमध्ये रंगला असताना परवानगी होती तर झाडे कापताना पोलिसांचे संरक्ष् ण का घेण्यात आले?अशी विचारणा पर्यावरणप्रेमी करीत आहेत.परवानगी होती तर मध्यरात्रीच बांधकाम विभागाने कंत्राटदाराच्या मदतीने १०० वर्षे जुनी झाडे का भुईसपाट केली?

नुकतेच विधी मंडळात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जो हॅरिटेज ट्रीचा ठराव सादर केला तो ग्रामीण भागात लागू होत नसल्याचा अजब निकष लाऊन या भागातील ही ५५ झाडे मध्यरात्री कापण्यात आली मात्र हॅरिटेज ट्री हा नियम ग्रामीण भागातील झाडांनाही लागू होतो,या कापलेल्या झाडांचे वय मोजले असते तर ही संपूर्ण झाडे हॅरिटेज ट्री मध्येच मोडली असती असा दावा पर्यावरणवादी करीत आहेत.

शाश्‍वत विकासाकडे दूर्लक्ष् करुन गडकरी व मुख्यमंत्री हे ‘रस्ते बांधणी व झाडे कापणीसाठी’ फक्त एकमेकांची पाठ थोपटत असल्याची तीव्र नाराजी पर्यावरणवाद्यांच्या जगतात उमटली आहे.

आधी देखील भारतात रस्ते बनायचे मात्र तेव्हा झाडांची एवढ्या मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात नव्हती.आता पर्यावरणाचा नाही फक्त ‘पैश्‍यांचा‘विचार केला जात असल्याची उघड उघड चर्चा पर्यावरणवाद्यांमध्ये घडत आहे.

एका प्रतिष्ठित पर्यावरणवादी महिलेने तर पर्यावरण संरक्ष् णाचा लढा हा काही पर्यावरणवाद्यांचा नाही असे सांगून हा लढा लाेकांचा आहे,त्यांनीच तो लढला पाहिजे,असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या