
खाजगी आय.टी.क्राफ्टवर लाखोंची उधळण
नागपूर: महापालिकेचा जनसपंर्क विभाग असताना खाजगी आय.टी.क्राफ्ट कंपनीला ओक्टोबर २०१६ पासून काम देण्यात आले. तीन वर्षांचा करार करण्यात आला. या कंपनीला महिन्याला ४ लाख रुपये देण्यात येते होते. मनपाच्या सर्व उपक्रमांना सोशल मिडीयावर प्रसिद्धी देण्यासाठी जनसंपर्क विभागाला सहायक म्हणून या संस्थेला काम देण्यात आले होते मात्र करारात नमूद केल्याप्रमाणे ही कंपनी कोणतीही सेवा देत नसून फक्त बैठकींचे वृतांत पत्रकारांना ई-मेलने पाठवते,मूळात बातम्या करणे हे मूळ करारात नमूद नसून मनपातील सर्व उपक्रमांना सोशल मिडीयावर प्रसिद्धी देणे हेच करार पत्रात नमूद आहे. मात्र आपले काम सोडून जनसपंर्क विभागाचे काम ही कंपनी करीत आहे,यामुळे महापालिकेने आता जनसंपर्क विभागच बंद करुन टाकावा,अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी गुरुवारी मनापाच्या सर्वसाधारण सभेत केलीे.
आय.टी.क्राफ्ट कंपनीचा करार तीन वर्षांनंतर संपुष्टात आला असताना पुन्हा याच कंपनीला दोन वर्षांची मुदत वाढ देण्यात आली मात्र या कंपनीचे काम समाधानकारक आहे का,याची कोणतीही तपासणी होत नाही.या वेळी ४ लाखा वरुन ३ लाख ७९ हजार रुपये कंपनीला दिले जाते. जनसंपर्क विभागावर देखील १० लाख रुपये कर्मचा-यांच्या पगारावर खर्च होत आहे. याचाच अर्थ वर्षाकाठी ८७ लाखांच्या जवळपास मनपा आय.टी.क्राफ्टवर खर्च करतेय,एकाच कामासाठी महापालिका ही दोन ठिकाणी लाखोंची उधळण करतेय,मनपाकडे असा कोणता खजिना उपलब्ध आहे?असा संताप सहारे यांनी व्यक्त केला.
कराराप्रमाणे सहा व्यक्तिंची अट मंजूर करण्यात आली आहे. त्यातही प्रत्येक पदे जी भरली जाणार त्यासाठी शैक्ष् णिक व पत्रकारीतेतील तीन वर्षांच्या अनुभवाची अट आय.टी.क्राफ्टसोबतच्या करारात नमूद आहे मूळात ही सहा पदे भरण्यात आली आहे का?सध्या स्थितीत फक्त एक समनव्यक पद सोडले तर इतर सर्व हे अपात्र आहेत अशी माहिती त्यांनी सभागृहाच्या निर्दशनास आणून दिली.तीन वर्षांचा पत्रकारीतेचा अनुभव नसलेले ज्यूनिअर कर्मचारी यांच्याकडून ही कंपनी तकलादू कामे काढून घेत आहे. मूळात सोशल मिडीयावर मनपाच्या कोणत्याही उपक्रमांना हवी तशी प्रसिद्धी या कंपनीने मिळवून दिल नाही.पत्रकारांनाही ज्या बातम्या, नियमात नसताना ही कंपनी पुरवते त्याही फक्त मराठी भाषेत असतात. मग जनसंपर्क विभागाचे कार्य तरी कोणते?याची माहिती देण्याची विनंती सहारे यांनी केली.
महापौर संदीप जोशी यांनी अशी माहिती देण्याचे निर्देश दिले असता मनपाच्या जनसंपर्क विभागात सध्या स्थायी कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याचे सांगितले.जनसंपर्क विभागातील कर्मचारी हे स्मार्ट सिटीचे कामे पाहतात मात्र या विभागात स्थायी कर्मचारी नसल्याची प्रशासनाने सांगितले.
माजी महापौर नंदा जिचकार यांनी कंपनी चांगलं काम करीत असल्याची पुश्ती जोडली.यावर कंपनीसोबत ज्या हेतूसाठी करार केला तो हेतू साध्य झाला का?असा प्रश्न उपस्थित केला.लाखो रुपये खाजगी कंपनीवर खर्च करण्यापेक्ष्ा मनपाच हायटेक कामासाठी योग्य कर्मचारी नियुक्त करण्यास सक्ष् म नाही का?असा सवाल त्यांनी केला. मनपाच्या विविध योजनांविषयी जनजागृतीसाठी कंपनीला लाखो रुपये देण्यात येतात मात्र माझ्या स्वत:च्या फेसबूकवर एक ही पोस्ट या कंपनीतर्फे जनजागृतीपर आली नाही.ज्या उद्देशाने या कंपनीला काम देण्यात आले ते काम जनसंपर्क विभागाचे आहे.
या कपंनीला मनपाची आर्थिक परिस्थिती गंभीर असताना पोसायची किवा नाही याचा निणर्य सभागृहाला घ्यायचा आहे..या कंपनीसोबतचा करार रद्द करुन जनसंपर्क विभागाकडे पुन्हा त्यांचे काम सुपुर्द करावे. आपले कर्मचारी बातमी तयार करतात आणि ही कंपनी फक्त पैशांची उचल करते असा घणाघात सहारे यांनी केला.
शहरातील खड्डे शोधण्यासाठी ही कंपनी काम करतेय असे ऐकले मात्र किती खड्डे सोशल मिडीयावर या कंपनीने आजपर्यंत शोधून दिले?कराराच्या विरोधात जाऊन ही कंपनी फक्त मनपाला १० टक्के काम देते,या कंपनीचे काम समाधानकारक नाही.
करारात समाविष्ट नसताना या कंपनीचे कर्मचारी मनपातील सर्व सभांच्या बैठकींचे वृतांत लिहते. कोण वृतांत लिहातात?असा सवाल सहारे यांनी केला यावर प्रशाससनाने आय.टी.क्राफ्ट असे उत्तर दिले. मग जनसंपर्क विभागच बंद करुन टाका आणि दहा लाख महिन्याचे वाचवा,अशी मागणी सहारे यांनी संतापून केली.
यावर महापौर संदीप जोशी यांनी मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांनी माहिती घ्यावी व अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवावा,त्यानंतर निर्णय घेऊ,असे निर्देश दिले.




आमचे चॅनल subscribe करा
