फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमध्य नागपूरातील ७७८ पोस्टल बॅलेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या खिशात!

मध्य नागपूरातील ७७८ पोस्टल बॅलेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या खिशात!

Advertisements

 

काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांचा आरोप

नागपूर: मध्य नागपूरातील जवळपास ८५१ कर्मचार्यांनी पोस्टल बॅलेटसाठी अर्ज केला होता जे निवडणूकीच्या दिवशी इतर मतदार केंद्रावर कर्तव्य बजावत होते. त्यापैकी ७७८ कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट पाठविण्यात आले मात्र रविवार व मतदानामुळे सोमवार हे दोन दिवस सरकारी सुटीचे असल्यामुळे हे पोस्टल बॅलेट या ७७८ कर्मचाऱ्यांना आज मिळाले. हे पोस्टल बॅलेट भरुन पोस्ट ऑफिसमध्ये सरळ ड्रॉप बॉक्समध्ये टाकण्याऐवजी काटोल रोड येथील मध्य नागपूरसाठी जे मतमोजणी केंद्र ठरविण्यात आले आहे तेथील निवडणूक निर्णय अधिकारी सरळ हे पोस्टल बॅलेट हातात घेत असल्याचा आरोप मध्य नागपूरातून काँग्रेसचे उमदेवार बंटी शेळके यांनी मंगळवार दि. २२ ऑक्टोबर रोजी केला.

कर्मचाऱ्यांची बाजू मांडायला ते मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना लेखी निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीत देखील तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्यासोबत कळमना येथे वाद झाला असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी अधिकारी हे भारतीय जनता पक्ष्ाच्या नेत्यांच्या दबाबाखाली काम करीत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. लोकसभेत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नाना पटोले यांचा याच मुद्दावर तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्यासोबत वाद झाला मात्र त्यांनी नाना पटोले, अभिजित वंजारी, प्रशांत पवार यांच्याच विरोधात गुन्हा नोंदवला. तोच प्रत्यय पुन्हा या विधानसभेच्या निवडणूकीत देखील येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

माझ्या मध्य नागपूरातून जवळपास शंभर ते सव्वाशे पोस्टल बॅलेटने मतदान करणारे कर्मचारी यांचा मला फोन आला. पोस्टल बॅलेट हे पोस्टाच्या माध्यमातूनच स्वीकारण्याचा नियम असताना कोटोल रोड येथील मतमोजणी केंद्रातील आरो हे या कर्मचान्यांना पोस्टल बॅलेट त्यांच्या हातात देण्याची दमदाटी करीत असल्याचा अारोप बंटी शेळके यांनी केला. त्यांना तीन-तीन चार-चार तास उभे ठेवण्यात आले. मध्य नागपूरातील पोस्टल बॅलेटचा वापर करणारे हे सरकारी कर्मचारी हे देखील या सरकारच्या विरोधात असल्याचा दावा शेळके यांनी केला. या कर्मचाऱ्यांचे मतदान थांबले पाहिजे हे षडयंत्र सरकार रचत असल्याचा आरोप त्यांनी केला. मध्य नागपूरच्या मतमोजणी केंद्रातील आरो पाटील यांना जाब विचारुन पोस्टल बॅलेटचा अर्थ विचारला, पोस्टलचा अर्थच ‘बाय पोस्ट’असा असताना तुम्ही तो हातात कसे स्वीकारण्याचे दडपण आणता?अ सा प्रश्‍न आम्ही एआरओला केला तेव्हा त्यांचे डोळे उघडले. पोस्टल बॅलेट हे ड्रॉप बॉक्समध्येय ड्रॉप केले पाहिजे मात्र या ८५१ मध्य नागपूरातील पोस्टल बॅलेट मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा किंवा ती मते काँग्रेसला मिळू नये यासाठी हे षडयंत्र रचले गेले अाहे असे शेळके म्हणाले.

जिल्हाधिकारी यांना लिखित तक्रार दिल्यावर यावर ते काय म्हणाले?या प्रश्‍नाच्या उत्तरात विद्यमान जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे हे उत्तम व चांगले प्रशासक असल्याची पावती शेळके यांनी दिली. ते एक नंबर असून दोन नंबरचे अधिकारी नाही. त्यांना निवेदन देता उलट ही गंभीर बाब लक्ष्ात आणून दिल्याबद्दल त्यांनी आमचे आभार मानले,त्यांनी देखील मानले पोस्टल ब ॅलेट हे कोणत्याही अधिकारी यांच्या हातात देणे चुकीचे आहे. याबात अहवाल मागवून योग्य ती कारवाई करण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याचे शेळके यांनी सांगितले. आमची कोणतीही विश्‍वसनीयता या सरकारमध्ये राहीली नाही किंवा सरकारी अधिकारी यांच्यामध्येही राहीली नसल्याचे ते म्हणाले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या