

बडकस चौकात संघाचा गणवेष जाळण्याच्या प्रश्नावर भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा
नागपूर: मध्य नागपूरच्या ‘वार्ड समस्या निवारण समितीतर्फे’ रविवारी दूपारी ३ वा. चुनावी अखाडा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मध्य नागपूरमधील सर्व उमेदवार उपस्थित राहणार होते व वार्डाच्या समस्यांवर जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देणार होते मात्र बघता बघता वैचारिक राजकीय मतभेदांचा मूळ कार्यक्रम बाजूला राहीला आणि प्रकरण हाणामारी,गुद्दागुद्दीवर आले, कार्यकर्त्यांनी माईक,खूर्च्या फेकण्यास सुरवात केली, भांडण,निषेध आणि शिविगाळ येथपर्यंत प्रकरण पोहोचले.
मध्य नागपूरचे भाजपचे उमेदवार विकास कुंभारे हे प्रचार रॅलीत व्यस्त असल्यामुळे त्यांंच्या वतीने भाजप प्रतिनिधी म्हणून माजी मनपा सत्ता पक्ष् नेते दयाशंकर तिवारी यांनी कार्यक्रमात उपस्थिती दशर्वली. काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्यासह वंचित आघाडीचे कमलेश भागवतकर, रमेश पुणेकर मंचावर उपस्थित होते. प्रश्नाची सुरवात बंटी शेळके यांच्यापासूनच झाली, शेळके हे ‘चमको आंदोलन’करतात,त्यांचे सर्व राजकारण व्हाॅट्स ॲपवर चालते असा अारोप त्यांच्यावर करण्यात आला, मध्य नागपूरच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्याकडे काय उपाय आहे?याचे उत्तर देताना शेळके म्हणाले,त्यांच्याकडे शंखपुष्पी आहे, दिलेल्या वचनांना विसरणार नाही तसेच ‘विकास’जनतेवर लादणार नाही, मध्य नागपूरच्या नागरिकांना जसा विकास हवा आहे तसा विकास केला जाईल. ओसीडब्ल्यू,एसएनडीएल,कनक यासारख्या खाजगी कंपन्यांना कामे देणार नाही, भाजपसारखे सिमेंटचे रस्ते ही बनवणार नाही असे ते म्हणाले. यानंतर एका प्रश्नकर्त्याने बडकस चौकात संघाची चड्डी व टोपी कां जाळली?या मागे मुस्लिमांची मते मिळवण्याचे राजकारण होते का?असा प्रश्न शेळके यांना विचारला,यावर सरसंघचालक यांनी पती-पत्नीचे संबंध हे कॉट्रेक्ट असतं, पतीला आपल्या पत्नीला सोडण्याचा अधिकार आहे असे वक्तव्य केले होते त्या वक्तव्याचा निषेध म्हणून मी संघाची टोपी आणि चड्डीची राख केली असे उत्तर शेळके यांनी दिले. तीनशे कोटी खर्च करुन भाजपच्या उमेदवाराने फक्त डागाची इमारत बांधली, त्यात गरीबांसाठी एक्सरे मशीन,सोनोग्राफी मशीन,सीटी स्कॅन हे बाराही महीने बदंच असते,एका सुप्रसिद्ध रक्त पेढीत वर्षाला २७ हजार लोकं रक्तदान करतात, एका पिशवीची किंमतच पाच हजार चारशे रुपये आहे, दूसरीकडे काँग्रेसने २०१३ साली ‘ब्लड ऑन कॉल’ही योजना डागा,मेडीकल,मेयाेमध्ये राबवली, या रुग्णालयात रक्तदान केल्यास ओएमसी हे डोनेट कार्ड रक्तदात्याला मिळायचे,हा कार्डधारक रक्तदाता देशात कुठल्याही भागात असला तरी या कार्डमुळे त्याला रक्ताच्या पिशवीवर ५० टक्के सुट मिळायची, भाजपने ती योजनाच गुंडाळली व एका खाजगी रक्तपेढीचा व्यवसाय भरभराटीला आणला,असा अारोप शेळके यांनी केला. भाजपच्या फक्त नावातच विकास आहे, यांच्या विकासाच्या कामगिरीवर संविधानाची पाने ही कमी पडतील,अशी टिपण्णी देखील शेळके यांनी केली.

संघाच्या मुद्दावर तसेच तीनशे कोटींच्या डागा रुग्णालयाच्या इमारतीवर केलेली शेळके यांची टिका दयाशंकर तिवारी यांना रुचली नसल्याने ते बोलण्यासाठी उभे राहताच प्रचार रॅलीत जाण्यास उशिर होत असल्याचे कारण सांगून बंटी शेळके यांनी मंच सोडला,यावर दयाशंकर तिवारी यांनी संताप व्यक्त केला आणि आईच्या गर्भात बाळ हळूहळू विकसित होतो,तसे डागा रुग्णालय विकसित होईल, काँग्रेसच्या मंत्र्याने बारा वर्षा डागा रुग्णालयाची एक वीट देखील रचली नाही,असा आरोप केला तसेच उमेदवार हा आपली बाजू मांडून निघाला त्यांनी दूसरी बाजू देखील समजून घ्यायला थांबले पाहिजे,असा आदेश केला मात्र शेळके हे निघून जाऊ लागताच, तिवारी यांनी सूत्र संचालन करणारे संजय मिरे यांच्या थोबाडीत लगावली व ‘हे स्क्रीप्ट तू प्लान केलं आहेस का?’असा आरोप केला. फक्त काँग्रेसची बाजू मांडण्यासाठी या कार्यक्रमाची रुपरेषा आखली का?असा संताप त्यांनी व्यक्त करताच तिवारी यांचे समर्थक तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच हाणामारी जुंपली, खुर्च्याची तोडफोड करण्यात आली, तिवारी यांनी माईकच खाली फेकला. सूत्र संचालक याने शेवटी स्टेजच्या मागे धाव घेतली,तिथूनही त्याला शोधून काढण्यात आले.
पहील्यांदा मतदान करणार्या तरुणाचा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत!
मध्य नागपूरच्या मतदारांनी त्यांच्या मनातले प्रश्न,समस्या मांडण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सर्वाधिक तरुणाई ही सहभागी होती. एका तरुण मतदाराने मंचावरील सर्वच पॅनलिस्टला प्रश्न विचारला ‘मी फर्स्ट टाईम वोटर आहे, पहील्यांदाच मी विकासाच्या नावावर लोकसभेत गडकरी यांना मत दिले, आता मी दुसर्यांदा मतदान करणार आहे मात्र यावेळी मी संभ्रमात आहे,मी विकासाच्या नावावर मत देऊ की मी विशिष्ट जातीचा आहे म्हणून जातीच्या नावावर उमेदवाराला मत देऊ? या प्रश्नाचे उत्तर त्याने सर्वच राजकीय पक्ष्ांच्या उमदेवारांना विचारले होते मात्र दयाशंकर तिवारी यांनी आधी मी संघाच्या बाबतीत शेळके जे बोलले त्यावर उत्तर देईल असे म्हणून बोलायला सुरवात करताच,शेळके निघून जाऊ लागले आणि पुढे संपूर्ण महाभारत ‘मध्य नागपूरच्या’ जलालपूरा पोलिस स्टेशन समोरील मोकळ्या मैदानातच रंगले, त्या तरुण मतदाराचा शेवटी हिरमोड झाला…त्याला ही कळून चूकले जातीपातीच्या नावावर की विकासाच्या नावावर? मत देण्यासाठी त्याला उत्तर मिळवण्यास अद्याप अजून एक शतक तरी जाऊ द्यावे लागेल.
महीला पत्रकाराचा मोबाईल हिसकावला-
या सर्व दंगलीचं चित्रिकरण महिला पत्रकार करीत असता त्यांचा मोबाईल हिसकण्याचे आदेश एका पक्ष्ाच्या नेत्याने दिले असता,त्या पक्ष्ाच्या कार्यकर्त्यांनी लगेच त्या महिला पत्रकाराभोवती घेरा घातला व जबरीने त्यांच्या हातामधील मोबाईल हिसकावले, मोबाईल हा लॉक असल्यामुळे ‘मॅडम मोबाईल अनलॉक करा अन्यथा येथून जाऊ देणार नाही,अशी धमकी देण्यात आली’ कार्यकर्त्यांचा आवेश बघता महीला पत्रकाराने मोबाईल अनलॉक करुन त्यांच्या हातात दिला, त्यांनी मोबाईल गॅलरीत जाऊन कार्यक्रमाचे सगळे फोटोज व चित्रिकरण डिलीट केले.
या प्रकरणावर त्या पक्ष्ाच्या पदाधिकारी यांना विचारणा केली असता,असे काही घडलेच नाही असे त्यांनी सांगितले.




आमचे चॅनल subscribe करा
