फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजमजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

Advertisements

आरोग्य, जेवण व निवास व्यवस्था शासन करणार

मुंबई, दि. 28: ‘कोरोना’ प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मजूर, कामगार यांनी कामाचे ठिकाण सोडून जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

या मजुरांच्या आरोग्याची काळजी, जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यासाठी शासन सक्षम आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.

 ठाकरे म्हणाले, मजूर, कामगारांचे आरोग्य, जेवण तसेच आहे त्याच ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश महसूल यंत्रणेला आणि स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे कोणीही कामाचे ठिकाण सोडून जाऊ नये. मदतीची आवश्यकता असल्यास तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा महानगरांच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग  कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या