फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजभीषण अपघात! वर्ध्यात कार पुलावरुन कोसळली, मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू

भीषण अपघात! वर्ध्यात कार पुलावरुन कोसळली, मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू

Advertisements

वर्धा,२५ जानेवारी २०२२ : चारचाकी एक्सयुव्ही वाहनावरून नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. अपघातात मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दूर्देवी घटना घडली. देवळी येथून वर्धेला येत असताना सेलसुरा जवळ हा अपघात झाला. वाहनावरून नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून खाली वाहन खाली कोसळले व जवळपास ४० फूट पुलावरून चारचाकी वाहन खाली पडल्याने हा भीषण अपघात झाला.. सर्व मृतक २५ ते ३५ वयोगटातील असल्याची माहिती आहे. रात्री एक वाजताच्या जवळपास अपघात झाला असून पहाटे चार वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु होते.

दरम्यान, अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच वर्ध्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप, सावंगी पोलिसी निरीक्षकही घटनास्थळी तातडीनं दाखल झाले आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांमधील सर्व विद्यार्थी हे सावंगी येथील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अपघातात दगावलेल्यांचे मृतदेह वर्धा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.

या अपघातात तिरोडाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार रहांगडाले याच्यासह इतर सहा जणांवर मृत्यूने घाला घातला असल्याची माहिती समोर आली आहे.

अविष्कार रहांगडाले याच्यासोबतच नीरज चव्हाण,नीतेश सिंह,विवेक नंदन,प्रत्युष सिंह,शुभम जयसवाल व पवन शक्ती असे मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.हे सर्व विद्यार्थी एमबीबीएस भाग १ व २ चे विद्यार्थी होते

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या