फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजभारत-पाक अघोषित युद्ध पेटले...

भारत-पाक अघोषित युद्ध पेटले…

Advertisements

आसमंतात मिसाईल्सचा मारा
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय फजिती
काश्‍मीर एलओसीवर पुन्हा एकदा बोफोर्स तोफांची कमाल
एका तासात पाकिस्तानचे हवाई हल्ले भारताच्या अभेद्य सुदर्शन-४०० ने केले निकामी
भारताचे तिन्ही सैन्य प्रत्यक्ष युद्धात उतरले
पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुल्ला मुनीरची उचलबांगडी
बलूच लिब्रेशन आर्मीने पाकिस्तानाची गॅस पाईप लाईन केली उधवस्त: सकाळी देखील पाकिस्तान सैन्याच्या वाहनाला केले लक्ष्य
रात्री १२ वाजता तुर्कीस्तानचे कार्गो विमान पाकिस्तानमध्ये दाखल झालं : पाकिस्तानला मदत करण्याचा प्रयत्न
नागपूर,ता.८ मे २०२५: भारताच्या बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानच्या ९ दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने चवताळून आज सायंकाळी भारताच्या सीमावर्ती भागावर ड्रोन,मिसाईल व रॉकेट्सच्या माध्यमातून हल्ले केले.याचा भारताच्या अभेद्य सुदर्शन-४०० या एअर डिफेंस सिस्टिमने अचूक वेध घेऊन पाकिस्तानचे सगळे हल्ले आसमंतातच उधवस्त केले व भारत-पाकमध्ये अघोषित युद्ध सुरु झाले.’ऑपरेशन सिंदूरची’ व्याप्ती आज दोन्ही देशात अघोषित युद्धात परिवर्तित झाली.
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे तीन फायटर प्लेन अवकाशातच भस्मसात केले.यात दोन एफ-१६,२ जेएफ १७ तसेच J-११  याचा देखील समावेश आहे.एफ-१६ चा पायलट हा भारतीय सैन्याच्या हाती सापडला आहे.महत्वाचे म्हणजे पाकिस्तानच्या कोणत्याही हल्ल्यात भारताचे कोणतेही नुकसान झाले नाही.पाकिस्ताच्या SWARMड्रोनला राजस्थानच्या जैसलमेरजवळ ध्वस्त करण्यात आले.याशिवाय पाकिस्तानचा AWACS हा ड्रोन देखील उधवस्त करण्यात आले.,जालंधर,पंजाब,अखनूर,चंढीगड,काश्‍मीर अश्‍या अनेक सीमावर्ती भागात पाकिस्तानने हवाई हल्ले केले.राजस्थान,बिकानेर,काश्‍मीर,गुजरातमधील ७० पेक्षा अधिक भागात ब्लॅकआउट करण्यात आले.पाकिस्ताने भारताच्या १५ शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.मात्र,त्याच्या या दु:स्साहपूर्ण कृत्याचा युरोपियन युनियनने गंभीर दखल घेऊन पाकिस्तानला समज दिली.या कृत्यामुळे पाकिस्तानची आंतराष्ट्रीय फजिती झाली.अमेरिकेने देखील पहलगाममध्ये घडलेली घटना दूर्देवी असल्याचे सांगून पाकिस्तानाचे कान उपटले.इटलीच्या उपपंतप्रधानांनी भारताचे पराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांच्यासोबत संवाद साधला.यूएसने ’पाक आतंक को बढावा देना बंद करे’असे खडे बोल सुनावले.अमेरिकेनेही पाकला फटकारलं.भारताला आपल्या संरक्षणासाठी कारवाई करण्याचा अधिकार असल्याचे अमेरिकेने सुनावले.एफ-१६ ही लढाऊ विमाने अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवाद्यांविरुद्ध वापरण्याच्या अटीवर दिली होती.मात्र,पाकिस्तानने आज ती भारताविरुद्ध वापरल्याने अमेरिकेने नाराजी व्यक्त केली.
भारताने केवळ पाकिस्तानच्या ९ दहशतवादी तळे नष्ट केली होती मात्र,पाकिस्ताने भारताचे सैन्य केंद्र तसेच रहीवासी भागात हवाई हल्ले सुरु केले.याशिवाय पुंछमध्ये नागरिकांच्या वस्त्यांवर तुफान गोळीबार सुरु केला ज्याला भारताकडून चोख उत्तर दिले जात आहे.काश्‍मीरमधील तंगहार,कुपवाडा मध्ये देखील पाकिस्ताने मिसाईल हल्ले केले.चांदीपुरात उद्यात या संदर्भात डीआरडीओने आपातकालीन बैठक देखील बोलावली असल्याची माहिती समोर आली आहे.भारतीय लष्कर बोफोर्सच्या मदतीने पुन्हा एकदा पाकिस्तानला चोख उत्तर देत असून कारगिल युद्धाच्या वेळी बोफोर्सची ताकत शत्रू देशाला नामोहराम करण्यासाठी गाजली होती.भारताच्या द्वेष करणारा आणखी एक मुस्लिम देश तुर्कीस्तानकडून पाकिस्तानने घेतलेल्या ड्रोन सिस्टिम ज्याचा ‘हमास’या दहशतवादी संघटनेकडून वापर केला जातो त्या ड्रोन्सचा अक्षर: फज्जा उडला.त्या ड्रोन्सपासून संरक्षणाची भारताने आधीपासूनच तयारी केली होती.रात्री १२ वाजता तुर्कीस्तानचे कार्गो विमान पाकिस्तानमध्ये दाखल झालं,भारताविरुद्धच्या युद्धात तुर्कीस्तान हा मुस्लिम देश पाकिस्तानला मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे.तुर्कीमध्ये देखील एस-४०० ही सिस्टिम आहे,हे विशेष.भारतासह जगातील केवळ तीन देशांमध्येच ही सिस्टिम असून अमेरिका,चीन आणि रशिया या देशांचा यात समावेश आहे.
या युद्धात भारताचे जल ,थल आणि हवाई हे तिन्ही सैन्य उतरले असून आज दूपारी पाकिस्तानच्या रावलपिंडी स्टेडियम,पेशावर,इस्लामाबाद,बहावलपूर,कराची,सियालकोट,कोटली या सर्वच भागात भारताकडून मिसाईल,ड्रोन हल्ले करण्यात आले.पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर श्रीनगर,अवंतीपुरा एअरपोर्ट सह देशातील २४ विमानतळे ही बंद करण्यात आली आहे.भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व अर्धसैनिक दलाच्या डीजींसोबत चर्चा केली.राजस्थान ते पंजाब,काश्‍मीरपर्यंतच्या सीमेचे संरक्षण करण्यासाठी हायअलर्ट जारी करण्यात आले आहे.पाकिस्तानने उत्तर,दक्षीण अश्‍या सर्व भागांवर युद्ध पुकारले असून जम्मू-काश्‍मीरला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तिन्ही सैन्याला मोकळीक दिली असून त्याचे परिणाम युद्धभूमीवर प्रत्यक्षात दिसून पडत आहे.२००१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांनी पाकिस्तानला आता ‘आर किंवा पार’च्या लढाईचा इशारा दिला होता,यासाठी पीओकेच्या सीमेवर तब्बल सहा महिने भारतीय सैन्य हजर होते मात्र,प्रत्यक्षात कृती ही पंतप्रधान मोदी यांनीच केली असून आता पाकिस्तानसोबत भारताच्या तिन्ही सैन्य दलांची  ‘आर या पार’ची लढाई होत असताना दिसून पडत आहे.या युद्धात भगवान श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राची कमाल, सुदर्शन-४०० या एअर डिफेन्स सिस्टिमने कलियुगात दाखवून दिल्याची चर्चा संपूर्ण सोशल मिडीयावर रंगली आहे.मोदी पर्वात आज ‘घूस के मारेंगे’चा प्रत्यय केवळ भारतानेच नव्हे तर संपूर्ण जगाने अनुभवला,हे विशेष! एस-४०० ने एकाच वेळी अनेक ड्रोन्स हवेतच नष्ट केले.पाकिस्तानने पठाणकोटच्या एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न केला.जम्मूच्या सांबामध्येही ड्रोन हल्ला केला.हल्ल्यासाठी पाकिस्तानने ८ मिसाईल डागले.ती सगळी हवेतच सुदर्शन-४०० ने उधवस्त केली.

पाकव्याप्त काश्‍मीरच्या मुज्जफराबादमध्ये ही मोठा धमाका झाला असून या भागात देखील ब्लॅक आऊट झाला.जवळपास पाकिस्तानच्या ५२ मिसाईल  विविध महत्वाच्या स्थळी भारताने आज उधवस्त केल्या.पाकिस्तानचे सगळे मंसुबे भारतीय सैन्याने उधळून लावले.उशिरा रात्रीपर्यंत हे हवाई युद्ध सुरु होते.उद्या देशाचे परराष्ट्र सचिव पत्रकार परिषदेत या युद्धाची नेमकी स्थिती देशवासीयांसमोर स्पष्ट करतील.सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उद्या सकाळी ९ वा.तिन्ही लष्कर प्रमुखांसोबत बैठक बोलावली आहे.चांदीपुरात उद्या दुपारी २ वा.डीआयजीने डीआरडीओची बैठक बोलावली आहे.
कराची बंदर उधवस्त-

नेव्हीने उशिरा रात्री मिसाईल डागली…१९७१ मध्ये ऑपरेशन ‘मेघदूत’पाकीस्तानला आठवले असून आता ऑपरेशन ‘सिंदूर’ ने २०२५ मध्ये कराची बंदर उधवस्त करुन पाकिस्तानचे आर्थिकरित्या मोठे नुकसान.पाकव्याप्त कोटलीमध्ये भारताकडून ड्रोन आणि मिसाईल हल्ला करण्यात आला.
पाकिस्तानच्या मोठ्या शहरात अफरातफरी मजली होती.पाकच्या इस्लामाबाद देखील भारतीय हवाई हल्ल्याने हादरले.तुरुंगात डांबलेल्या माजी पंतप्रधान इमरान खानच्या समर्थकांनी उशिरा रात्री मोठी बाईक रॅली काढून पाकचे लष्कर प्रमुख मुल्ला मुनीर यांची हकालपट्टी करुन,या युद्धात भारतासोबत जिंकायचे असेल व भारताला मुसलमानांची ताकत दाखवायची असेल तर त्वरित इमरान खानची तुरुंगातून सुटका करावी अशी मागणी केली.
पाक सरकारकडून रात्री उशिरा पाकिस्तानचा लष्कर प्रमुख मुल्ला मुनीरची हकालपट्टी करण्यात आली असून काही दिवसांपूर्वीच मुल्ला मुनीरने हिंदू-मुस्लिम हे एकत्रित राहूच शकत नाही,अशी वल्गना केली होती.त्याच्या या भडकाऊ भाषणानंतर २२ एप्रिल २०२५ रोजी काश्‍मीरमध्ये पहलगाममध्ये २६ निष्पाप पर्यटकांची हत्या मुस्लिम दहशतवाद्यांनी केली.
महत्वाचे म्हणजे पाकिस्तानमधील बलुच लिब्रेशन आर्मीने देखील या युद्धात प्रत्यक्षात उतरुन, दुपारी पाकिस्तानच्या सैन्य वाहनाला लक्ष्य करुन उडवून दिल्याचा व्हिडीयो व्हायरल केला.यात चार पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला.उशिरा रात्री याच गटाने बलूचिस्तानमध्ये गॅस पाईप लाईन उधवस्त केली.स्वतंत्र बलुचिस्तानसाठी अनेक दशकांपासून बलुच बंडखोरांचा लढा सुरु आहे.१९४७ मध्ये पाकिस्तान स्वतंत्र झाल्यानंतर पाक सैन्याने बलुचिस्तान या स्वतंत्र देशाला बळजबरीने आपल्या अधिपत्याखाली आणले.तेव्हापासून बलूच बंडखोरांचा लढा स्वातंत्र्यासाठी पाक सैन्याविरुद्ध सुरु आहे.
……………………….
तळटीप-
भारताला धमकावणारे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरिफ हे स्वत: बंकरमध्ये लपले असून पाकिस्तानचे अने सैनिक चौक्या सोडून पळाल्याची माहिती समोर आली आहे.भारतीय सैन्याने पाकिस्तानला ‘ईट का जबाव पत्थर से’दिले असून आतंकिस्तानची पुरती दाणादाण उडाली आहे.भारतावर हल्ल्याची घोडचूक शाहबाज शरीफला चांगलीच भोवली.
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या