

कलबुर्गीतील करोनाच्या रुग्णाच्या मृत्यूला अजून केंद्रीय आरोग्य विभागाने दुजोरा दिलेला नाही. पण कर्नाटकच्या आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी रुग्णाला करोना झाला होता असं स्पष्ट केलंय. यानंतर कर्नाटकच्या आरोग्य विभागाने आता रुग्णाच्या संपर्कात येणार नागरिकांचा तपास सुरू केला आहे. तेलंगण सरकारलाही याची माहिती देण्यात आली आहे. सिद्दीकी यांना करोनाची लागण झाली होती. तेलंगणमधील एका रुग्णालयात उपचारसाठी ते दाखल झाले होते.
देशातील ७ राज्यांमध्ये करोनाचे १६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे करोनाच्या रुग्णांची संख्या ७६ वर पोहोचली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, लडाख, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात करोनाचे नवे रुग्ण आढळन आले आहेत.
करोनाने आतापर्यंत जगभरात ४६०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १, २५, २९३ जणांना करोनाची लागण झाली आहे. भारतात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी आणखी खबरदारीचं पावलं उचलली आहेत. दिल्ली सरकारने ३१ मार्चपर्यंत सर्व शाळा, कॉलेजेस, चित्रपटगृह बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.




आमचे चॅनल subscribe करा
