

प्रशासकीय अधिका-याविरुद्ध अधिका-याचीच रंगवली लढत
नागपूर,ता. ४ जून: भारतीय जनता पक्ष् युवा मोर्चातर्फे सोशल मिडीयावरील पोस्ट ही चांगलीच वादग्रस्त ठरली असून यात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे विरुद्ध नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्येय यांच्यामध्ये कोण चांगले?कोण श्रेष्ठ?असा वाद निर्माण करण्यात आला आहे.
सध्या मनपा आयुक्त तुकराम मुंढे हे सोशल मिडीयावर ’छाये हूये ’असून त्यांच्या फॅन फोलोवर्सची संख्या ही दिवसागणित वाढत जात आहे. मनपात भाजपची सत्ता आहे मात्र गेल्या तीन महिन्यात ,जागतिक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात साथ रोग प्रतिबंतधक कायदा तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्यामुळे सरकार नावाची ‘व्यवस्था’ही पूर्णपणे ’घरी’बसली असून जनप्रतिनिधी,आमदार,नगरसेवक यांच्या हातात निर्णय घेण्याचे अधिकारच उरले नाहीत.शहरासंबंधी संपूर्ण निर्णय हे आयुक्त तुकाराम मुंढे हेच एकहाती राबवितात आहेत.
मुंढे हे २८ जानेवारी रोजी आयुक्त पदी रुजू झाले तेव्हापासूनच त्यांची कार्यशैली ही आजवरच्या आयुक्तांपेक्ष्ा ’वेगळी’ राहीली आहे. सत्ताधारी पक्ष्ाचीच नव्हे तर विरोधी पक्ष् व अपक्ष्ांशी देखील कधीही काेणत्याही निर्णयावर जुळवून घेतले नाही व निर्णयांचा धडाका लावला. नागपूरात अल्पावधीतच मुंढे हे तरुणाईच्या गळयाचे ताईत बनले व सोशल मिडीयावर सत्ताधारी वर्सेस मुंढे यांच्या लढतीमध्ये मुंढे यांचेच सर्मथक मोठ्या प्रमाणात निर्माण झाले.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष्ाच्या युवा मोर्चाचे काही ’अति उत्साही सभासद’यांनी सोशल मिडीयावर चक्क मुंढे वर्सेस पोलीस आयुक्त अशी लढत रंगविण्यास सुरवात केली.नागपूरात कोरोना विरुद्ध लढाईत फक्त मुंढे हे एकमेव सनदी अधिकारी लढत नसून त्यांच्यापेक्ष्ाही कईक पटीने पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांचे काम किती चोख आहे,हे सांगण्यास सुरवात झाली. शासनाच्या दोन समाज दर्जाच्या प्रशासकीय अधिका-यांमध्येच केल्या जाणारी ही अनावश्यक ’तुलना’ शहरातील अनेक भाजप समर्थकांनाच रुचली नाही.
अनेकांनी आपल्या पर्सनल फेसबूक पेजवर हा मुद्दा पोस्ट केला.नागपूरातील ‘कोरोना या महामारीचे संकट अद्याप टळले नाही,मुंढे चांगले कि भूषणकुमार चांगले!हे दाखवणे या अश्या परिस्थितीत योग्य आहे का?’असा सवाल काही सूजाण नागरिकांनी उपस्थित केला. ‘पार्टी विथ डिफरेन्स’म्हणवणारेच पक्ष्ाची विचारधारा कुठे घेऊन चालले आहेत?’शहरात भाजप युवा मोर्चाचा एक काळ आम्ही देखील बघितला आहे. अतिशय शिस्तप्रिय व तत्वाला घेऊन चालणारी ही शाखा होती,आज कसे आणि कोणत्या मानसिकतेचे तरुण यात सभासद करुन घेण्यात आले आहे!
आम्ही मुंढेंचे समर्थन करीत नाही मात्र आम्ही युवा मोर्चाच्या या ‘आगाऊपणाचे देखील समर्थक होऊ शकत नाही’अशी संवेदनाही अनेकांनी मांडली.व्यक्तिला नाही विचारांना विरोध असावा,हीच आपली संस्कृती असल्याचीही ’कानटोचणी’करण्यात आली.शहरातील भाजपचे वरिष्ठ नेतृत्व काय करीत आहे?भाजपच्या वरिष्ठांनी फेसबूकवर अति उत्साही असणा-याया ट्रोलर्सला रोखावे,एकाला कमी लेखण्याच्या नादात दुस-या सनदी अधिका-याच्या पदाचे व प्रतिष्ठेचे अवमूल्यन होत असल्याकडे लक्ष् द्यावे. युवा मोर्चाचे हे पाऊल म्हणजे मुंढे यांनाच आणखी प्रसिद्धीच्या झोतात आणणारीच कृती आहे.
सर्वांप्रतिच सन्मान मात्र इतरांनीही कोरानाविरोधात खूप काही केले हेच दाखवण्याचा प्रयत्न-शिवाणी दाणी(अध्यक्ष्,शहर भाजप युवा मोर्चा)
आम्ही तुलना करीत नाही. प्रत्येकच जण देशासाठीच सगळेकाही करतो आहे.मग तो देशाचा नागरिक असो, अधिकारी असो,राजकारणी असो.यथाशक्ती तो कोराेनाविरोधतल्या लढ्यात गेल्या तीन महिन्यांपासून सहभागी आहे. आम्ही सोशल मिडीयावर त्यांचेच गूणगाण करीत आहोत. मात्र काही अधिकारी ‘सर्व काही मीच केले’हे सातत्याने नागपूरकर नागरिकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करीत आहे.सोशल मिडीयावर तसा आव आणतात.याच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी ‘एजंसीच’नेमली आहे. बाकीच्यांनी देखील खूप चांगले काम केले व करीत आहेत. इतरांनी देखील खूप चांगले काम केले आहे मग ते पोलीस अायुक्त असाेत किवा वैद्यकीय क्ष्ेत्रातले कोव्हिड योद्धे,शहरातील फक्त एक सनदी अधिकारीच नव्हे तर बाकीच्यांनी देखील खूप काही केलं आहे,हे दाखवण्यासाठीच व लक्ष्ात आणून देण्यासाठीच भाजयुतर्फे सोशल मिडीयावर असा प्रचार करण्यात आला.
एका माध्यमकर्मीची सूचक पोस्टवरील प्रतिक्रिया
असा वाद उत्पन्न होणे अतिशय दूर्देवी आहे.सध्या नागपूरातील सगळेच प्रशासकीय अधिकारी उत्तम काम करीत आहेत. त्यामुळे एकाचा विरोध करण्यासाठी दुसर-याचा राजकीय हेतूने वापर करणे योग्य नाही. जे लोकं सध्या अप्रासंगिक झाले आहेत त्यांचं हे दूखणं आहे. प्रशासकीय अधिकारी अल्पावधीतच आपल्या कामामुळे लोकांच्या गळ्यातील ताईत बनतो पण आपल्याला वर्षानुवर्षे चांगली रचनात्मक काम करुनही शिव्यांचेच धनी का व्हावे लागते?याचाही विचार झाला पाहीजे.
काही अति उत्साही कार्यकर्ते लोकांच्या डोळ्यात धूळ झोकून,खोटं बोलून,एखाद्याची बदनामी करुन या परिस्थितीचा तात्पुरता फायदा करुन घेतीलही,पण असे फार काळ टिकणार नाही.आज प्रत्येक व्यक्तिकडे माहितीचा अखंड स्त्रोत आहे.दिसणारी प्रत्येक गोष्ट पडताळून पाहण्याची दृष्टि आहे.प्रत्येक सुज्ञ माणूस आपाल्यातला विवेक जागृत ठेऊन व्यक्त होत आहे. लोकांना गृहीत धरण्याचे दिवस आता निघून गेलेत. आता लोकं मेंढरासारखी मागे धावत नाहीत..तेव्हा राजकीय क्ष्ेत्रात काम करणा-या व्यक्तींनी कुठलीही कृती करण्याआधी या सगळ्या गोष्टींचा विचार करावा.
नव्या दमाच्या अधिका-यांची काम करण्याची आपली स्टाईल आहे. समस्या सोडविण्यासाठी नव्या आयडिया आहेत.शाश्वत विकासासाठी याचा फायदा व्हावा म्हणूनच सरकार त्यांची नियुक्ती करीत असते.सगळीच कामं जर लोकप्रतिनिधींनीच करायची असेल तर प्रशासनाची गरजच काय?जनप्रतिनिधींचे काम हे कायद्या बनविण्याचे तर प्रशासनाचे काम त्याची अंमलबजावणी करण्याचे आहे. सल्ला मसलत, सूचना आणि समन्वय या सगळ्या गोष्टींसह देखरेख ठेवणे लोकप्रतिनिधींचे काम आहे. प्रत्येकाने आपले काम केले तर वादच उद् भवणार नाही. अधिकारी असो किवा जनप्रतिनिधी प्रत्येकोन आपल्यातल्या ‘अहंकार’ बाजूला ठेवला तर मान-सन्मान आणि प्रतिष्ठा दोन्ही मिळेल.लोकांचीही कामे होतील….लोकशाहीत हेच अपेक्ष्ति आहे.




आमचे चॅनल subscribe करा
