
आपण सगळे भाऊ…सगळे मिळून खाऊ!हे जनसेवक की भ्रष्टसेवक?
नागपूर,ता.३१ ऑक्टोबर: सध्या शहरात कधी,कोणत्या,कोणाच्या ‘ऑडियाे क्लिीप्स’व्हायरल होतील याचा नेम नाही,त्यातल्या त्यात महानगरपालिकेशी संबधित ऑडियाे क्लिप्स तर हमखास प्रसार-प्रचार माध्यमांच्या हातात लागतात. जुलै महिन्यात कुख्यात गुन्हेगार साहील सय्यद याच्या मनपाशी संबंधित ऑडीयाे क्लिपने तर नागपूर शहरात भूकंपच आणला होता ज्यात त्यांने चक्क महापौर संदीप जोशी तसेच भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्याचा सूतोवाच केला होता,यात आज आणखी एका मनपाशीच संबंधित ऑडियो क्लिपची भर पडली असून यामध्ये भाजपच्या प्रभाग क्र.२६(वाठोडा) च्या नगरसेविका समिता राजेंद्र चकोले यांच्या पतीराजाची कंत्राटदाराला ’तार सप्तकात’ धमकवण्याचे सूर ऐकू येत आहे!
विशेष म्हणजे या नगरसेविका नेहरु नगर झोनच्या सभापती देखील आहे. सध्या ज्या पक्ष्ाची सत्ता देशावर राज करीत आहे त्या पक्ष्ात अजून ही पत्नीच्या पदावर पतीराजच ‘राज’करीत असल्याची ‘मध्ययुगीन परंपरा’ खंडीत न झाल्याचेच उत्तम उदाहरण पुरोगामी महाराष्ट्राच्या ‘उपराजधानीत’ यानिमित्ताने नागपूरकरांना बघायला मिळाले. पत्नी नगरसेविका असल्याने जणू महानगरपालिकेशी संबंधित कामांवर,फायलींवर पतीराजाचा अधिकार कोणत्या ‘संवैधानिक’ कायद्यात बसतो,यावर खरंच सत्ताधारी भाजप पक्ष्ाने संशोधन करण्याची गरज आहे,असे आता बोलले जात आहे.
भाजपच्या मनपातील गेल्या १४ वर्षांच्या सत्ताकाळात ‘संपूर्ण’ बहूमताच्या जोरावर या पक्ष्ाने महापालिकेत इतकी बजबजपुरी माजवून टाकली आहे की शहरातील मतदार आता येत्या निवडणूकीत या पक्ष्ालाच संपूर्णपणे १४ वर्षांच्या वनवास भाेगल्यावर घरी बसवण्याचा विचार करीत असल्याचे संतापाने बोलले जात आहे.ही ऑडियो क्लिप व्हायरल झाल्यानंतर या पतीराजाविषयी अनेक बाबीही समोर येऊ लागल्या आहेत.
दर्शन कॉलनीतील नंदनवन येथील मनपाच्या युपीएससी दवाखान्यात याच नगरसेविकेच्या पतीराजाच्या ‘ढवळाढवळ’नीतीमुळे एम्सचे डॉक्टर्स कसे रडकूंडीला आलेत याच्या कथा अद्यापही त्यांच्या स्मरणात आहेत.गेल्या वर्षी या दवाखान्यासोबत मनपाचा नॉन कंडिशनल टायअप झाला होता.मात्र पतीराजाच्या कारभारामुळे उच्च विद्याभूषित डॉक्टर्स हे वैतागून गेले होते.
भाजपची ही मोडस ओपरंडी आहे महिलांसाठी सीट आरक्ष्ति झाली की भाजपमधील पतीराज हे आपल्या पत्नीला निवडून आणतात,परिणामी त्यांचा कार्यभार‘सुरळीत’चालतच राहतो.याच दवाखान्यात डाॅ.हरीश कळमकर नावाचे ‘रिटायर मेडीकल ऑफिसर फ्रॉम गव्हरमेंट‘पदावर विराजमान होते.पतीराजासोबत त्यांची गट्टी इतकी गहरी होती की मनपाचा लाखो रुपयांचा पगार उचलूनही ते रुग्ण न तपासता फक्त पतीराजांसोबत गप्पा झोडत बसायचे,असा आरोप त्यांच्यावर केला जात होता.
या पार्ट टाईम डॉक्टर विरुद्ध तेथील आरोग्य अधिका-यांनी तक्रार करताच प्रशासनातील एका अतिरिक्त आयुक्तांनी देखील लगेच या डॉक्टरला आश्रय दिला होता. मात्र कोविडच्या काळात या एनयूएचएमच्या कंत्राटी पद्धतीने पार्ट टाईम सेवारत असणा-या डॉक्टरनी पद सोडून दिले. थोडक्यात सत्ताधारी व मनपा प्रशासन यांना सामान्य,गरिब,गरजू रुग्णांशी काही एक घेणेदेणे नाही,अशीच चर्चा त्यावेळी रंगली होती.कोविड-१९ मुळे तर मनपाच्या आरोग्य विभागाचे सगळे पितळेच नागरिकांसमोर उघडे पडले!
याच रुग्णालयातील चपराश्यासोबत देखील पतीराजाचे एवढे ‘घनिष्ठ’संबंध होते की जणू पतीराजच त्याचे आश्रयदाते झाले.परिणामी नियमानुसार सकाळी ८ वा.उघडणारा दवाखाना हा कधीही १० वा.शिवाय उघडण्यात आलाच नाही,केवळ रुग्णच नव्हे तर या दवाखान्यातील संपूर्ण स्टाफ हा देखील बाहेरच ताटकळत उभे असायचा मात्र दारुचे व्यसन असणा-या,प्रसंगी स्टाफलाच शिविगाळ करणा-या त्या चपराश्याच्या नोकरीला मात्र पतीराजाच्या कृपेमुळे ‘धक्का’ही लागला नाही.
ऑडियाे क्लिीप मधील कंत्राटदारासाेबत करण्यात आलेल्या संभाषणातील पतीराजाची भाषा यावरुनच सत्ताधारी पक्ष्ात त्यांचे ’वजन’ अधोरेखित करते!भाजपच्या सत्ताकाळात नगरसेवकच नव्हे तर त्यांचे आप्त,स्वकीय यांचा देखील ‘अनेक किंबहूना प्रत्येक व्यवहारात’किती सखोल हात असतो,याचे ही ऑडियो क्लिप साक्ष् च देते.
‘पार्टी विथ द डिफरेन्स’ हे बिरुद मिरविणा-या पक्ष्ातील नगरसेवकांची, त्यांच्या जवळच्या स्वकीयांची अशी कृत्ये म्हणजे ‘आपण सगळे भाऊ…सगळे मिळून खाऊ’अशी जनधारणा निर्माण करते,परिणामी पार्टी विथ द डिफरेन्सचे हे जनसेवक,जनसेवक आहेत की भ्रष्टसेवक असाच प्रश्न आता नागपूरकर नागरिकांना पडला आहे!




आमचे चॅनल subscribe करा
