

२०२० मध्ये लाऊन दिला प्रेम विवाह नंतर फ्लॅट मधून हकलले!
वडीलांच्या मृत्यूनंतर पूजा तडसला हवा मोदींकडून न्याय
नागपूर,ता.११ एप्रिल २०२४ : एक कवियित्री कवितेत विचारते ‘स्त्री असणं हाच काय आमचा गुन्हा,चितेवरच्या सरणानंही आमचा तिरस्कार करावा…!हे काव्य आज पुरोगामी महाराष्ट्राच्या व संतांच्या भूमीवर पुन्हा एकदा सत्यात उतरले जेव्हा एका स्त्रीचे सून म्हणून,पत्नी म्हणून आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एका बाळाची आई म्हणून दूखं जगा समोर आले.भारतीय जनता पक्षाचे दोन टर्मचे वर्धेचे खासदार व ज्यांना त्यांच्या ‘कर्तृत्वावर’ पुन्हा यंदाही लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे असे खासदार रामदास तडस यांच्या स्नूषा पूजा तडस यांना घेऊन शिवसेना ‘उबाठा’च्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेतली.अवघ्या १७ महिन्यांच्या गोंडस बाळासाठी पूजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘न्याय’मागितला.सुषमा अंधारे यांनी देखील राजकारणाचा विषय बाजूला सारुन, एका स्त्रीला तिचा परिवार,तिचा हक्क देण्यासाठी या संवेदनशील विषयावर पत्रकार परिषद घेत असल्याचे आधीच स्पष्ट केले.
२०२० मध्येच पूजा तडस यांनी दिलेला न्यायासाठीचा लढा हा अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला होता.रामदास तडस यांच्या मुलासोबतचे प्रेमसंबंध,गर्भपात व यानंतर लग्नासाठी दिलेला नकार या विरुद्ध पूजाने मोठा संघर्ष उभारला होता.माध्यमे देखील करोनाचा जीवघेणा काळ असतात या ‘एका खासदाराची गोष्ट’ ठलकपणे प्रसिद्ध करीत होती,शेवटी प्रतिष्ठेची पुंगळी गुंडाळून खासदार तडस यांनी फार मोठ्या मनाने पूजा यांना सून म्हणून स्वीकारले व माध्यमांसमोर आपल्या मुलाचे लग्नही लाऊन दिले.आता पुढे हे जोडपे गुण्या गोविंदाने सुखाचा संसार करेल अशी महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षा असतानाच आज पुन्हा एकदा नवीनच व तितकाच दुखद एपिसोड समोर आला.
लग्नानंतर फ्लॅट घेऊन दिल्यानंतर शरीर व मनावर झालेले बलात्कारसारखे आघात सांगताना पूजा यांचे अश्रू वारंवार बांध तोडून वाहत होते.तडस घराण्याला वारस दिल्यानंतर देखील तिचा झालेला छळ,निरागस बाळाची खासदार महोदयांनी आजोबा म्हणून केलेली हेटाळणी,डीएनए चाचणीची केलेली मागणी,लग्न रद्द करण्यासाठी न्यायालयात घेतलेली धाव,पूजा आणि बाळाचा हक्काचा निवारा असणा-या फ्लॅट मधून हाकलून लावणे,पूजा यांच्या वडीलांचा केलेला वारंवार अपमान,लेकीच्या दुखाची बापाने खाललेली हाय,यातच दोन महिन्यांपूर्वी जग सोडून गेलेला बाप आणि शेवटी ‘मै हूं मोदी का परिवार’मध्ये सहभागी असणारे खासदार तडस यांच्या परिवारात बाळासह सहभागी करण्यासाठी पूजा यांनी पत्रकार परिषदेत मोदींनाच दिलेली साद,कोणत्याही संवेदनशील असणा-या मनाला स्तब्ध करुनच जाणारे होते.कायद्यानुसार १२ महिन्यांचा आत लग्न रद्द करण्यासाठी याचिका दाखल होऊ शकते.माझं बाळ १७ महिन्यांचे आहे.खासदार तडस यांची लग्न रद्द करणारी याचिका न्यायालयाने रद्द केली आहे.लग्न रद्द होऊ शकतं मात्र ‘बाळ’हे मूर्तीमंत असून ते कसं रद्द करणार?कुठल्या न्यायलयात करणार?असा सवाल पूजा यांनी केला.

या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी उन्नाव,हाथरस,कठूआ,मणिपूर,बिल्किस बानो आणि महिला कुश्तीपटूचा उल्लेख केला.हे सर्व पिडीत ‘मोदींचा’ परिवार नव्हते का?असा प्रश्न त्यांचा होता.या घटना देशाल हादरुन सोडणा-या होत्या.या सर्वच घटनांमध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायालाला हस्तक्षेप करावा लागला होता तेव्हा आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल झाले.या सर्व प्रकरणात भाजपचेच खासदार व आमदार आरोपी होते हे देशाला देखील माहिती आहे.मात्र,कश्या प्रकारे त्यांना पाठीशी घालण्याचे काम ५६ इंच छातीच्या सर्वोच्च नेत्याने केले याची ही उजळणी आज पूजा तडस यांच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या शहरात नकळत झाली.सोशल मिडीयावर ‘मै हूं मोदी का परिवार’ट्रेण्ड चालवने वेगळी गोष्ट आहे,तो प्रचाराचा भाग असणे हे देखील मान्य करता येईल मात्र,१७ महिन्यांच्या बाळासह भाजपचा एखाद्या खासदार घरातील सुनेलाच दर दर भटकण्यासाठी हाकलून देत असेल,त्यांचा अधिकार नाकारत असेल,घाणेरडे लांछन लावत असेल,बाळ त्यांच्याच खानदानीचे आहे याचे पुरावे मागत असेल तर पुरोगामी महाराष्ट्र हे सहन करेल का?हा खरा प्रश्न आहे.
अवघा देश हादरवून सोडणा-या उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका १९ वर्षीय दलित तरुणीवरील सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणाची अलाहबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाला गंभीर दखल घ्यावी लागली होती.ऐन करोना काळात ऑक्टोबर २०२० मध्ये या तरुणीच्या न्यायासाठी विविध संघटनांनी दिल्लीतील जंतरमंतरवर मोठे आंदोलन पुकारले होते.योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात दहा दिवस पीडितेच्या कुटूंबियांचा एफआयआर देखील दाखल करुन घेतला नव्हता.पोलिस महानिरीक्षक प्रशांत कुमार यांच्यानुसार फॉरेनिस्क अहवालात तरुणीचा मृत्यू मानेवरील जखम आणि आघातामुळे झाला…!जिल्हाधिकारी प्रवीणकुमार यांनी जबाब बदलण्यासाठी दबाव आणला असा आरोप .पीडीतेच्या कुटूंबियांनी केला.’उद्या मीडियावाले निघून जातील पण प्रशासन येथेच असेल’अशी धमकी देणारा जिल्हाधिकारी यांचा व्हिडीयो प्रचंड व्हायरल झाला होता.
१४ सप्टेंबर २०२० रोजी या दलित तरुणीवर चौघांनी बलात्कार केला होता.त्यानंतर तिला अलिगड येथील जवाहरलाल नेहरु रुग्णालयात दाखल करण्यात आला होता मात्र,तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तिला दिल्लीत एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.आरोपींना प्रतिकार करीत असताना तिचा गळा दाबण्यात आला होता,तिची जीभ कापण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.तिचे दोन्ही पाय पूर्णत:व हात अंशत: लुळे पडले होते.
राज्यात तीव्र आंदोलन पेटल्यामुळे मृत तरुणीवर मध्यरात्री कुटूंबियांच्या परवानगी शिवाय जबरीने अंत्यसंस्कार करण्यात आल्यामुळे हे प्रकरण आणखी जास्त चिघळले.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा त्यांच्या बदनामीसाठी आंतरराष्ट्रीय कट असल्याचा दावा केला.आंदोलकांना एका वेबसाईटच्या माध्यमातून मुस्लिम देशांकडून आर्थिक मदत मिळत असून राज्यात दंगल घडविण्याचे आवाहन केले जात असल्याचा आरोप योगी यांनी केला.या संपूर्ण प्रकरणात पंतप्रधान माेदी यांनी ‘मौन’धारण केले.हाथरस बलात्कार आणि खून प्रकरण धक्कादायक व असामान्य असल्याची
प्रतिक्रिया तत्कालीन सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी दिली.या प्रकरणात साक्षीदारांच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश सरकारने उचललेल्या पावलांविषयी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश त्यांनी या प्रकरणाविषयीच्या जनहित याचिकेच्या संदर्भात दिले होते.विशेष म्हणजे भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय,काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी पिडीतेचे नाव व छायाचित्र ट्टीटरवर प्रसिद्ध केले.यावर महिला आयोगाने तिघांनाही नोटीस पाठवल्या होत्या!
सुषमा अंधारे यांनी उल्लेख केलेला हाथरस,हिच ती घटना!‘मै हूं मोदी का परिवार’या श्रृंखलेत हाथरसची ती अवघी १९ वर्षीय दलित तरुणी हिला सहभागी होण्याचा अधिकार नव्हता का?
सुषमा अंधारे यांनी उन्नावच्या पीडितेचाही उल्लेख केला.उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील भाजपचे आमदार कुलदीपसिंह सेंगर याला २०१७ मध्ये एका पीडितेवर केलेल्या बलात्काराच्या प्रकरणात दिल्लीच्या जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे!.ज्यावेळी या तरुणीवर बलात्कार झाला त्यावेळी ही तरुणी अल्पवयीन होती.सेंगर हा लोकसेवक होता आणि त्याने लोकांचा विश्वासघात केला,अश्या शब्दात न्यायमूर्ती धर्मेश शर्मा यांनी सेंगरने शिक्षेबाबत सहानुभूतीने केलेेला अर्ज फेटाळताना सुनावले.विशेष म्हणजे पोक्सो कायद्यात केलेल्या सुधारणे नंतर आरोपी सेंगरला फाशीची शिक्षा होऊ शकली असती मात्र,ही घटना कायद्या लागू होण्या पूर्वीची असल्याने जन्मठेपेची शिक्षा आरोपीला मिळाली. आपल्या दंबगाईतून सेंगर याने पिडीतेला तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला.तिच्या वडीलांविरोधात बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.याच प्रकरणात न्यायालयीयन कोठडीत असताना पिडितेच्या वडीलांचा मृत्यू झाला!पिडीतेच्या कारला वकीलांसोबत सुनावणीसाठी जात असताना २८ जुलै रोजी ट्रकने जबर धडक दिली.याच पिडीतेवर सेंगर याच्यावर खटला दाखल झाल्यानंतर पुन्हा तिघांनी सामुहिक बलात्कार केला,याचा वेगळा खटला चालला.
प्रतिक्रिया तत्कालीन सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी दिली.या प्रकरणात साक्षीदारांच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश सरकारने उचललेल्या पावलांविषयी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश त्यांनी या प्रकरणाविषयीच्या जनहित याचिकेच्या संदर्भात दिले होते.विशेष म्हणजे भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय,काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी पिडीतेचे नाव व छायाचित्र ट्टीटरवर प्रसिद्ध केले.यावर महिला आयोगाने तिघांनाही नोटीस पाठवल्या होत्या!
सुषमा अंधारे यांनी उल्लेख केलेला हाथरस,हिच ती घटना!‘मै हूं मोदी का परिवार’या श्रृंखलेत हाथरसची ती अवघी १९ वर्षीय दलित तरुणी हिला सहभागी होण्याचा अधिकार नव्हता का?
सुषमा अंधारे यांनी उन्नावच्या पीडितेचाही उल्लेख केला.उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील भाजपचे आमदार कुलदीपसिंह सेंगर याला २०१७ मध्ये एका पीडितेवर केलेल्या बलात्काराच्या प्रकरणात दिल्लीच्या जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे!.ज्यावेळी या तरुणीवर बलात्कार झाला त्यावेळी ही तरुणी अल्पवयीन होती.सेंगर हा लोकसेवक होता आणि त्याने लोकांचा विश्वासघात केला,अश्या शब्दात न्यायमूर्ती धर्मेश शर्मा यांनी सेंगरने शिक्षेबाबत सहानुभूतीने केलेेला अर्ज फेटाळताना सुनावले.विशेष म्हणजे पोक्सो कायद्यात केलेल्या सुधारणे नंतर आरोपी सेंगरला फाशीची शिक्षा होऊ शकली असती मात्र,ही घटना कायद्या लागू होण्या पूर्वीची असल्याने जन्मठेपेची शिक्षा आरोपीला मिळाली.
आपल्या दंबगाईतून सेंगर याने पिडीतेला तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला.तिच्या वडीलांविरोधात बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.याच प्रकरणात न्यायालयीयन कोठडीत असताना पिडितेच्या वडीलांचा मृत्यू झाला!पिडीतेच्या कारला वकीलांसोबत सुनावणीसाठी जात असताना २८ जुलै रोजी ट्रकने जबर धडक दिली.याच पिडीतेवर सेंगर याच्यावर खटला दाखल झाल्यानंतर पुन्हा तिघांनी सामुहिक बलात्कार केला,याचा वेगळा खटला चालला.
देशभर गाजलेल्या बिल्किस बानो सामूहिक बलात्कार आणि त्यांच्या कुटूंबीयांच्या हत्ये प्रकरणी गुजरात सरकारने,देशाचा स्वातंत्र दिवस होता त्या १५ ऑगस्ट २०२२ रोजी या प्रकरणातील ११ गुन्हेगारांच्या मुदतीपूर्वी सुटकेचा आदेश दिला!गोधरा हत्याकांड घडले त्यात बिल्किस बानो या पाच महिन्याच्या गर्भवतीचा काय दोष होता?तिची मुले,नवरा व इतर कुटूंबियांची हत्या तिच्या नजरेसमोर झाली.पाच महिन्याची गर्भवती असताना तिच्यावर नराधमांनी बलात्कार केला!धार्मिक हिंसा आणि सूड यांना जात-धर्म नसतोच आणि हे दोन्ही बाजूने लागू होतं.दशकांच्या संघर्षानंतर तिला न्याय मिळाला होता.११ आरोपी जन्मठेपेची शिक्षा भोगण्यास कारागृहात डांबण्यात आले मात्र,गुजरात सरकारने मुदतीपूर्व सुटकेचा आदेश दिला.हा तिचा स्त्री म्हणून,देशाची एक नागरिक म्हणून प्रतिष्ठेचा अपमान करणारा निर्णय होता.या विरोधात तिला सर्वोच्च न्यायालयात पुन्हा धाव घ्यावी लागली.
न्या.बी.व्ही.नागरत्ना आणि न्या.उज्जवल भूयान यांच्या पीठाने कठोर ताशेरे ओढत गुजरात सरकारचे आदेश रद्दबातल केले.एखाद्या महिलेच्या विरोधात अशा प्रकारचे घृणास्पद गुन्हा करणारे माफीसाठी पात्र कसे?असा सवाल केला.८ जानेवरी २०२४ रोजी येत्या १५ दिवसात ११ ही आरोपींना पुन्हा तुरुंगात डांबण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
सुषमा अंधारे यांनी आज बिल्किस बानो यांचा केलेला उल्लेख हे फक्त नाव नसून देशाला दिशा देणारी एक घटना होती.
भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात सात महिला कुस्तीगीरांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले.सर्वोच्च न्यायालयाने खासदार .बृजभूषण यांच्या विरोधात एफआयआर न नोंदवल्याने दिल्ली पोलिसांनाच नोटीस बजावली.दिल्लीत जंतर मंतरवर प्रदीर्घ असा लढा देशातील खेळाडू आणि नागरिकांनी उभारला होता.पंतप्रधानांची भेट न मिळालेल्या पद्मश्री सन्मान मिळालेला कुस्तीपटू बजरंग पुनियाने २२ डिसेंबर २०२३ रोजी आपला पद्श्री सन्मान चक्क फूटपाथवर ठेऊन दिल्याच्या दृष्याने संपूर्ण देश गहीवरला.बृजभूषण विरुद्ध अवघ्या तीनच महिन्यात महिला कुस्तीपटूंनी पंतप्रधानांकडे १९ तक्रारी नोंदवल्या होत्या मात्र,कोणतीही कारवाई या भाजप खासदारावर करण्यात आली नाही.केंद्रिय क्रीडा मंत्रालयाने या तक्रारींची चौकशी करण्यासाठी एका समितीची घोषणा केली जी पिडीतांनी नाकारली.सरकार व पोलिस प्रशासनाच्या विरोधात तीव्र लढा देशासाठी सुवर्ण पदक मिळविणा-या महिला कुस्तीपटूंना द्यावा लागला मात्र,मोदींनी या घटनेविषयी देखील मौन बाळगणे पसंद केले.लोकसभेच्या निवडणूकीत भाजपच्या तिस-या ही यादीत सध्या तरी या दबंग खासदाराचे नाव नाही,ते सध्या वेटिंगवर आहेत.त्यांच्या विषयीची नकारात्मकता बघता त्यांचा मूलगा किवा पत्नीला उमेदवारी देण्याचा प्रस्ताव देण्यात आला मात्र,ब्रिजभूषण शरण यांनी तो नाकारला असल्याचे सांगितले जात आहे.देशासाठी सुवर्ण पदके मिळविणा-या कुस्तीपटूंच्या आत्मसन्मानाच्या लढाईत ‘मोदी चा परिवार’कुठेही दिसून पडला नाही.
मणिपूरच्या घटनेचे तर देशच नव्हे तर जगभरात तीव्र पडसाद उमटले.मणिपूरमधील महिलांना मिळालेल्या अमानवीय वागणुकीविरुद्ध देशभर संतापाची लाट उसळली.सर्वोच्च न्यायालयाने त्या लज्जास्पद घटनेची स्वत:हून दखल घेतली.‘मणिपूरमधील घृणास्पद व्हिडीयोमुळे आम्ही कमालीचे व्यथित झालो अाहोत,सरकारने यावर कारवाई करावी.त्यांनी काहीही कारवाई केली नाही आणि काहीच केले नाही तर आम्ही करु’अश्या शब्दात केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले.जातीय तनावग्रस्त भागात हिंसाचार घडवण्यासाठी महिलांचा शस्त्रासारखा वापर करणे अत्यंत दुख:दायक आणि पूर्णपणे अस्वीकार्य आहे,असे सरन्यायाधीश चंद्रदूड यांनी बजावले.
मणिपूरच्या घटनेतील गुन्हेगारांवर त्वरित कारवाई होईल अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली मात्र,जुलै २०२३ मध्ये या संतापजनक घटनेचा व्हिडीयो समोर आल्यानंतर देखील अद्याप ही मणिपूरला भेट देऊन दोन्ही बाजूंच्या पिडीतांसोबत मोदी यांनी भेट घेतली नाही.त्यामुळेच सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपचे वर्धा येथील खासदार रामदास तडस यांच्या सूनेप्रतिच्या भूमिकेचा उल्लेख करताना,मणिपूरच्या पिडीता या ‘मै हूं मोदी का परिवार’मध्ये सहभागी नाहीत का?असा सवाल केला होता.मणिपूरची ही पार्श्वभूमी समजून घेणे देखील गरजेचे आहे.
नव्या संसदेची सुरवातच ‘नारीवंदन’ने झाली.१२८ वी घटनादुरुस्ती करुन ‘नारीशक्ती वंदन विधेयक २०२३ ’पारित करुन महिलांना ३३ टक्के राजकीय आरक्षण देण्यात आले.एकविसाव्या शतकातच भारत ‘विश्वगुरु‘बनणार असल्याचे भाकीत वर्तवल्या जात आहे.मात्र,त्यांच्याच पक्षातील काही खासदार,आमदार,नेते,मुख्यमंत्री हे नारीशक्तीची कशी घोर विटंबना करीत आहेत,त्यांचे अस्तित्वच या भूतलावरुन नामशेष करीत आहेत,वरील काही उदाहरणे ही प्रातिनिधिक आहेत.
त्यामुळे वरील सर्व उदाहरणांपासून बोध घेऊन येत्या २० एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्धा येथील खासदार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी वर्धेत येणार असल्याने पूजा तडस यांच्या दू:ख,कुचंबनेलाही आपल्या ‘परिवाराचा’भाग करणार का?याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष राहणार आहे.
दूसरीकडे सुषमा अंधारे यांनी जरी पूजा यांचा लढा हा राजकारणाचा भाग नाही असा दावा केला असला, तरी महाविकासआघाडी सरकारच्या काळात राज्यातील महिलांची कुचंबना करणा-या दोन घटनांचाही उल्लेख करावा,ही त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.लोकशाही असणा-या देशात विरोधी राजकीय भूमिका असू शकते,त्यासाठी टिका टिपण्णी देखील केली जाऊ शकते,याचा अर्थ सत्तेवर असल्यामुळे ज्याप्रमाणे अभिनेत्री कंगना रनौतचे मुंबईतील तिच्या घरावरच अनाधिकृत बांधकामाच्या नावावर मनपाद्वारे बुलडोजर चालवला होता!त्या घटनेविषयी अंधारे का बोलत नाही?कंगना हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करुन मुंबईत भीती वाटत असल्याचे ट्टीट केले होते.मुंबई उच्च न्यायालयाने कंगना यांच्या याचिकेवर सुनावणी करताना‘याचिकादाराने मुंबई व महाराष्ट्राविषयी जे काही म्हटले त्याच्याशी आम्हीही सहमत नाही.पण,म्हणून आम्ही तिचे घर तोडायला जाणार नाही.आम्हालाही महाराष्ट्रवासी असल्याचा अभिमान आहे.परंतु,याचिकादाराच्या वक्तव्यावर अशा पद्धतीने प्रतिक्रिया देणे योग्य नाही‘असे गंभीर निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवित शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना खडे बोल सुनावले होते.
इतकंच नव्हे तर,राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टिपण्णी करणारी एक फेसबुक पोस्ट ,खूप जास्त समज नसणारी अभिनेत्री केतकी चितळे यांनी शेअर केली.या विरोधात संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले.केतकीला घरातून मुंबई पोलिसांनी अटक केली.पोलिस वाहनात बसवित असताना तिच्या चेह-यावर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी काळी शाई फेकली व तिला पोलिसांच्या ताब्यात असताना मारहाणीचाही प्रयत्न झाला होता.ते दृष्य बघून संपूर्ण महाराष्ट्रातील सुजाण जनता ही उद्वीग्न झाली होती.
सत्तेचा माज हा अंधारे यांच्या पक्षाच्या सत्ताकाळात ही महाराष्ट्राच्या जनतेने बघितला होता.त्यामुळे महिलांच्या बाबतीत झालेल्या अन्यायाविषयीची उदाहरणे देताना अंधारे यांनी ही वरील दोन उदाहरणे देखील त्यात अंर्तभूत करण्याची अपेक्षा महाराष्ट्रातील सुजाण नागरिक करीत आहे.
(संबंधित व्हिडीयो Sattadheesh official you tube वर बघू शकता)
……………………………………..




आमचे चॅनल subscribe करा
