
माेदी सरकार मायावी:मोदींच्या धक्कातंत्राने देशाचे अपरिमित नुकसान
नागपूर,ता. १४ जुलै: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार हे ‘मायावी’आहे,आम जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर भावनात्मक पांघरुन घालून जनतेचे लक्ष् भटकवतात,एवढंच नव्हे तर ज्या राज्यात भारतीय जनता पक्ष्ाची सत्ता नाही त्या राज्यात सीबीआय,ईडी यासारख्या केंद्रिय तपास संस्थांचा ससेमारा विरोधी पक्ष्ांच्या नेत्यांच्या मागे लावतात,सध्या देशात जे चित्र आहे ते हेच सांगणारे आहे की देश फक्त मोदी नव्हे तर सीबीआय,ईडी सारख्या संस्था चालवतात आहेत,असा खळबळजनक आरोप छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केला.ते आज बुधवार दि. १४ जुलै रोजी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार-परिषदेत बोलत होते.
पाकिस्तानच्या सामन्यामध्ये ज्याप्रकारे अंपायर धरुन १३ खेळाडू खेळत होते तीच खेळी सध्या भारतीय जनता पक्ष् देशातील जनतेसोबत खेळत आहे. देशभरात महागाईविरुद्ध आम जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयावर बोला,असे ‘वरुन’आदेश आल्याचे बघेल यांनी सुरवातीलाच सांगितले,त्यामुळेच संघभूमी असणा-या नागपूरमध्ये येऊन बोलत असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील जी सर्वसामान्य जनता महागाईमुळे पिचली आहे,संघ भूमीत बोलल्याने निदान भाजपच्या कानावर तरी माझी आणि जनतेची ही आर्त हाक पडेल,असा उद्देश्य बघेल यांनी स्पष्ट केला.
मोदी हे महागाईवर काहीच बाेलत नाही.काँग्रेसच्या काळात जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलचे दर प्रति बॅरल ९३ डॉलर्स होते तेव्हा देशातील जनतेला ते ७० रुपये प्रति लिटर मिळत असे,आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल ६३ डॉलर प्रति बॅरल असतानाही देशात पेट्रोलच्या दाराने अनेक शहरात शंभरी पार पाडली असल्याची बोचरी टिका त्यांनी केली.
अर्थकारण असो किवा करोना, काँग्रेसचे शीर्षस्थ नेते राहूल गांधी यांनी वेळोवेळी मोदी यांना योग्य सल्ला दिला मात्र त्यांच्या सल्ल्याला मोदी आणि चमूने नेहमीच थट्टा मस्करीत घेतले मात्र नंतर राहूल गांधी हेच कसे बरोबर होते,हे सिद्ध ही झाले.मोदी यांच्या चुकीच्या अर्थकारणाने आम जनता महागांईमध्ये भरडल्या गेली आहे.देशातील तज्ज्ञच सांगतात स्वातंत्र्यानंतर कधी नव्हे ती देशाची अर्थव्यवस्था एवढी रसातळात गेली आहे, मोदी यांच्या कार्यकाळाचे तीन वर्ष आणखी भयंकर असणार आहे,असे भाकीत बघेल यांनी वर्तवले.
काँग्रेसच्या काळात पेट्रोल ७० रुपये दराने मिळायचं तेव्हा अभिनेत्री हेमा मालिनी,विद्यमान मंत्री स्मृती इराणी हे रस्त्यावर आंदोलन करायचे,आता तर अनेक शहरात पेट्रोलने शंभरी ओलांडली आहेत,कुठे आहेत या नटी?गावस्कर शतक ठोकायचा मात्र वेंगसरकर ९९ वर अटकायचा,आता कोणताही भाजप नेता महागाई विराेधात रस्त्यावर आंदोलन करताना दिसत नसल्याचा टोला त्यांनी हाणला.
४० वर्षात पहील्यांदा असे घडले जेव्हा देशाची अर्थव्यवस्था ही समोर जायची सोडून उलट्या दिशेने चालत आहे!देशात बेरोजगारीची स्थिती ही तर आणखी भयंकर आहे.उत्पादन ठप्प,बाजारात ग्राहक नाहीत,अन्न धान्य महाग,हाताला काम नाही.भाजप आणि काँग्रेसमध्ये हाच फरक आहे भाजप सत्तेसाठी काहीपण करायला तयार असते!अशी खरमरीत टिका बघेल यांनी केली.
२०२४ मध्ये देशात काँग्रेसची सत्ता आली तर पेट्रोल,डिजेल जीएसटीमध्ये आणनार का?या प्रश्नावर बोलताना जीएसटी ही काँग्रेसचीच योजना होती मात्र मोदी यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या वेळी अगदी मध्यरात्री संसदेत हे विधेयक पारित केले ,जनतेवर लादले आणि देशासोबत धोका केला.‘वन नेशन वन टॅक्स‘ऐवजी ‘वन नेशन ५ टॅक्स‘व्यापारी वर्गाला भरावे लागत आहे.शेतक-यांच्या ट्रॅक्टर,फर्टिलायझर,बि-बियाणांवर देखील मोदी सरकारने जीएसटी लावला आहे.आधी एक्साईज ड्यूटी लागायची त्या राज्यांनाही समसमान वाटा मिळायचा.आता मोदी सरकारने ४ टक्के सेझ लावला त्यातून राज्यांना काहीच दिले जात नाही,पक्षाच्या उपाध्यक्षा सोनिया गांधी यांनी याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र ही लिहले होते मात्र अर्थमंत्र्यांनी सोनिया गांधी यांना पत्राचे उत्तर ही दिले नाही.
करोना काळात आधी आम्ही जनतेला माेफत धान्य दिले, ती योजना नंतर केंद्राने अमलात आणली.अचानक मध्यरात्रीपासून मोदींनी लॉकडाऊनची घोषणा करुन देशात ‘आर्थिक सुनामी’आणली,मध्यरात्रीच त्यांनी ‘नोटबंदी’लागू करुन चलनातून ५०० अाणि १००० च्या नोटा बाद केल्या.लॉकडाऊनचा निर्णय घेतला तेव्हा ना देशातील मजुरांचा विचार केला ना व्यापारी संघटना ना सामाजिक संघटनांसोबत विचारविमर्श केला.‘माेदींच्या याच धक्कातत्रांने देशाची अपरिमित हानि केली‘अशी जळजळीत टिका याप्रसंगी बघेल यांनी केली.वरुन राज्यांना कर्ज घ्या असा आदेश मोदी सरकार देते,आता राज्यांना आपला कारभार चालवण्यासाठी कर्ज उचलावे लागत असल्याचे बघेल यांनी सांगितले.
आम जनतेचे जे प्रश्न आहे त्यावरुन लीलया मोदी सरकार हे लोकांचे लक्ष् विचलित करते.कधी देशाची सुरक्ष्ा,कधी हिंदू-मुस्लीमच्या मुद्दात देशातील लोकांची दिशाभूल करते.पं.बंगालमध्ये निवडणूकीनंतर जो दंगा झाला त्याला देखील भाजपच कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला.देशात लोकांना आपापसात भांडणतंटे करण्याचे काम भाजप करत असते.
मोदी सरकार तर संपूर्ण देश विकत आहे,विमानतळे,रेल्वे,स्टील प्लांट,पॉवर प्लांट,‘सब कूछ बेच डालूंगा’असे धोरण मोदींचे आहे,असा टोला त्यांनी हाणला.
उत्तरप्रदेश सरकारने नुकतेच दोन अपत्यांचा नारा देत तीन अपत्ये असणा-यांना शासकीय नोकरी व सवलती मिळणार नाही,याकडे बघेल यांचे लक्ष् वेधले असता योगी सरकारने आधी दोन अपत्ये असणा-यांना तरी नोकरी द्यावी,असा चिमटा त्यांनी काढला.योगी सरकारने घोषणा करावी,ज्यांना दोन अपत्ये आहेत त्यांना आम्ही सरकारी नोकरी देतो,मग असा तीन अपत्यांचा अध्यादेश काढावा.प्रत्येक गोष्ट कायदे करुन सुटत नसतात आधी सामाजिक जनजागृती करावी लागत असते,असे ते म्हणाले.
गोधन असो पशुधन असो किवा देशातील युवा,देशाची ताकदच मोदींनी कमजोरीत परावर्तित केली असल्याची टिका बघेल यांनी केली.




आमचे चॅनल subscribe करा
