

नागपूर, २२ जून: प्रतिभा नृत्य मंदिर, नुपूर फाउंडेशन, गुरू साधना फाउंडेशन आणि निर्झर कला संस्थान यांच्या संयुक्तवतीने प्रसिद्ध भरतनाट्यम् गुरू प्रेमचंद होम्बल तसेच, त्यांच्या शिष्या व कन्या शेख मेदिनी होम्बळ यांचे व्याख्यान व प्रात्यक्षिक शुक्रवार, २४ जून रोजी आयोजित करण्यात आले आहे.
गुरू प्रेमचंद होम्बल हे बनारस हिंदू विद्यापीठात परफॉर्मिंग आर्ट विभागाचे माजी विभागप्रमुख आहेत तर मेदिनी होम्बळ या इंदिरा कला संगीत विश्वविद्यालय, खैरागढ येथे भरतनाट्यम विभागाच्या सहायक प्राध्यापक आहेत.
नृत्य, नाट्य व इतर सर्व शास्त्रीय कलांशी संबंधित हस्तमुद्रांवर आधारित ‘हस्तेनार्थंप्रदर्शयेत्’ या विषयावर हे व्याख्यान होणार असून गुरू प्रेमचंद व मेदिनी होम्बळ यावेळी प्रात्यक्षिकही सादर करणार आहेत. प्रतिभा नृत्य मंदिर, साऊथ इंडिया असोसिएशन हॉल, रामनगर येथे सायंकाळी ६.३० वाजता होणारी ही कार्यशाळा नि:शुल्क आहे.

सर्व प्रकारच्या नृत्य, नाट्य कलांशी संबंधित विद्यार्थी, शिक्षक, गुरू व रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9766589451 या क्रमांकावर संपर्क साधावा.




आमचे चॅनल subscribe करा
