

(छायाचित्र-शहरातील प्रतिष्ठित कलावंत,कीर्तनकार मंडळी बजाज नगर पोलिस ठाण्यात तक्रार देताना)
विश्व हिंदू परिषद-बजरंग दल व भारतीय जनता पक्ष युवा मोर्च्याच्या तक्रारी दाखल
संस्कार भारतीचे विदर्भ प्रांत प्रमुख व शहरातील अनेक कलावंतांनी नोंदवली तक्रार
भाजप अशी मनोविकृती निश्चितच सहन करणार नाही :प्रवीण दटके यांचा इशारा
नागपूर,ता.१८ मे २०२२: हिंदू धर्म हा तसा ही सहिष्णु धर्म मानला जातो,सर्व धर्मांचा आदर राखत कधीही हिंदू धर्मियांकडून फेसबुक किवा ट्टीटरसारख्या सोशल मिडीयावर कोणत्याही धर्माचा अनादर केला जात नाही मात्र भारत देशात काही असे लोक आहेत जे सातत्याने हिंदू धर्म,हिंदू देव-देवता तसेच हिंदू धर्मियांविषयी विखार पेटवत राहतात,अतिशय हीन दर्जाच्या शब्दांचा प्रयोग करतात,हिंदू देव-देवतांविषयी अतिशय अश्लील शब्दात पोस्ट व्हायरल करतात,हिंदू धर्मियांच्या सणासुदीचा उपहास उडवतात आणि असे करताना ते याला संविधानाने दिलेल्या ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे’गोंडस नाव देतात.मूळात संविधानाला अभिप्रेत असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कोणत्याही व्याख्येत असा उद्दामपणा बसत नाही.विशेष म्हणजे अश्या काही मनोविकृतांना हिंदू धर्म सोडून इतर धर्मांविषयी ’ब्र’अक्षर देखील काढण्याची हिंमत होत नाही,त्यांच्यातील पराकोटीचा द्वेष,मत्सर आणि किडलेल्या विचारात फक्त आणि फक्त हिंदू धर्माविषयीचाच तिटकारा भरलेला दिसून पडतो.नागपूरातील अश्याच एका हिंदू धर्मद्वेषी महापुरुषाला त्याच्या एका अतिशय वाहियात फेसबुक पोस्टमुळे चांगलेच आज अडचणीत यावे लागले.भगवान शिव व माता पार्वतीविषयी अतिशय वाईट व अश्लील टिपण्णी करणा-या या पोस्ट विरोधात नागपूरात गणेशपेठ व बजाज नगर पोलिस ठाण्यात चारुदत्त जिचकार याच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या इमारतीत जिचकार याचा ‘मधुरिका रेकॉर्डींग स्टूडियो’ आहे.गेल्या अनेक दशकांपासून नागपूरातील कलावंतांनी त्याच्यासोबत जिव्हाळ्याचे संबंध जपले होते.कलेला भाषा,प्रांत,धर्म,पंथं,जातीच्या सीमा नसतात.एेन करोनाच्या काळात महाराष्ट्रातील कला जगतातही उपासमारीची गंभीर परिस्थती उद् भवली,यातून मार्ग काढावा व मोजक्या श्रोत्यांच्या तसेच प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी देऊन नाट्यगृहे व सभागृहे सुरु करण्यात यावीत यासाठी नागपूरकर कलावंतांनी एक भव्य मोर्चा संविधान चौकात आयोजित केला होता.चारुदत्त जिचकार याची ज्येष्ठता बघता त्यांना या मोर्च्याचे सारथ्य त्यांना देण्यात आले होते मात्र त्यांनी ज्या शब्दांमध्ये आज आपल्या फेसबुक पोस्टमध्ये भगवान शिव व पार्वतीचा उल्लेख केला ते वाचून शहरातील अनेक कलावंत,कीर्तनकार यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.आतापर्यंत सातत्याने चारुदत्त जिचकार हा भारतीय जनता पक्ष व पंत्रप्रधान मोदींविषयीच्या आक्षेपार्ह्य राजकीय पाेस्ट टाकीत होता,याला कोणीही विरोध केला नाही मात्र आता त्याने चक्क हिंदू धर्मावरच खोलवर आघात करणारी पाेस्ट व्हायरल केली,यानंतर आज नागपूरात दिवसभर त्याच्या विरोधात चांगलेच वातावरण तापले व कलावंत,कीर्तनकार मंडळी एकवटली.विश्व हिंदू परिषद,बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी देखील तडक गणेशपेठ पोलिस स्टेशन गाठले.भारतीय जनता पक्ष युवा मोर्च्याचे कार्यकर्त्यांनी देखील गणेशपेठ पोलिस ठाणे गाठून तीव्र निषेध नोंदवला.त्यांच्या लिखित तक्रारीची दखल घेऊन पोलिस निरीक्षक क्षीरसागर यांनी जिचकार याला पोलिस ठाण्यात आणले.

(ही आहे ती आक्षेपार्ह्य फेसबुक पोस्ट)
याप्रसंगी जिचकार याने घडलेल्या प्रकारा विषयी दिलगिरी व्यक्त केली मात्र त्याच्या विषयीचा संताप काहीही करुन कमी झाला नाही.अशात संस्कार भारतीचे विदर्भ प्रांत सह-महामंत्री अमर कुळकर्णी, रणशिंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रफुल्ल माटेगावकर, ज्येष्ठ रंगकर्मी विनय मोडक, विदर्भ विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चांद्रायण व इतर सदस्यानी पोलिस निरीक्षक शुभांगी देशमुख व पोलिस सहाकय प्रविण पांडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व धार्मिक भावना भडकावणा-या दोषींवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली. हिंदु धर्मियांना कोणीही कसे ही संबोधावे आणि ते सहिष्णुतेच्या नावाखाली आम्ही सहन करावे असे आता घडणार नाही,असा इशारा अमर कुळकर्णी यांनी दिला. त्यामुळेच विविध क्षेत्रातील नागरिक स्वयंस्फूर्तपणे याचा निषेध करण्यासाठी एकत्र आले असल्याचे माध्यमांना प्रतिक्रिया देताना अमर कुळकर्णी यांनी सांगितले.या शिष्टमंडळात नागपूरातील सुप्रसिद्ध बासरीवादक अरविंद उपाध्ये,की-बोर्ड वादक महेंन्द्र ढोले,परिमल जोशी,गौरव टांकसाळे, मोहन पांडे, ज्येष्ठ कीर्तनकार मृण्मयी कुळकर्णी, ज्येष्ठ गायिका अपूर्वा माटेगांवकर, विक्रम जोशी, डॅा. आशिष अटलोये, अनिकेत दहेकर व अनेक शिवभक्त नागरिक उपस्थित होते.

(छायाचित्र-बजरंग दल नागपूर महानगर सहसंयोजक लखन कुरील यांच्या नेतृत्वात तहसील पोलीस स्थानकात तक्रार दाखल करतांना बजरंग दल चे कार्यकर्ते)
तर गणेशपेठ पाेलिस ठाण्यात पोहोचून हिंदू देवी देवतां बाबत आक्षेपार्ह्य आणि अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या चारुदत्त जिचकारला अटक करा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनी केली. ज्ञानवापी येथील सर्व्हेच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यम वर नागपुरातील चारुदत्त जिचकार नावाच्या व्यक्तीने भगवान महादेव व माता पार्वती यांच्या बद्दल अश्लील आणि आक्षेपार्ह्य मजकूर लिहून हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचे काम केले आहे, याचा विश्व हिंदू परीषद तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत आहे.हिंदू समाज देवी- देवतांचा अपमान कदापी सहन करणार नाही, चारुदत्त जिचकार हा समाजात द्वेष पसरवत आपल्या देवी – देवतांवर असभ्य भाषेत व्यक्त होत असतांना विकृत मानसिकतेचा परिचय देत आहे. असल्या लोकांना सामाज माध्यामवर प्रतिबंधित करण्यात यावे आणि त्याच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी विहिंप – बजरंग दलने केली,असल्या विकृत व्यक्तीच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करीत असून उचित कारवाई न केल्यास विहिंप व बजरंगदल तर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विहिंपचे प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी दिला.

(छायाचित्र-भारतीय जनता पक्ष युवा मोर्चातर्फे तक्रार सोपवताना)
यावेळी भारतीय जनता पक्ष युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी देखील गणेशपेठ पोलिस ठाणे गाठून जिचकार याला तात्काल अटक करण्याची मागणी केली.भारतीय दंड संहितेच्या कलम २९५,२९५(अ)२९८१२०(ब)तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा ६६(अ)अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी युवा मोर्च्याच्या पदाधिका-यांनी केली.भारतीय जनता युवा मोर्च्याचे अध्यक्ष परेंद्र पटले यांनी चिजकार यांच्या विरोधात ही तक्रार नोंदवली.जिचकार यांच्या हिंदू धर्मातील देवी-देवतांची विटंबना करणारी पोस्ट वाचून मोठ्या प्रमाणात हिंदू धर्मियांच्या भावना आहत झाल्या असल्याचे त्यांनी तक्रारीत नोंदवले. फेसबुकवरील पोस्ट मोठ्या प्रमाणात वाचल्या जात असतात.जिचकार यांच्या या अतिशय निंदनीय अश्या पोस्टवर अनेक कमेंट्स देखील आले आहे.त्यामुळेच पोलिसांनी तातडीने जिचकार याला अटक करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पटले यांनी केली.याप्रसंगी भाजयुमोचे मुख्य सचिव दिपांशु लिंगायत,सचिन करारे, अमोल तिडके व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना भाजप युवा मोर्चाने तातडीने गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असल्याचे सांगितले.जिचकार यांच्या तातडीने अटकेची मागणी आम्ही केली आहे.हिंदू देव देवतांवर इतक्या खालच्या पातळीवर जाऊन शेरेबाजी करणारी ही माणसे अतिशय घाणेरड्या मनोवृत्तीची असून अश्या मनोवृत्तींना निश्चितच ठेचण्याचे सामर्थ्य भाजपच्या अंगी आहे.अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हल्ली हिंदू धर्माचा व देव-देवतांचा सोशल मिडीयावर अपमान केल्या जात आहे,आता मात्र हे सहन केल्या जाणार नाही,असा इशारा त्यांनी दिला.फक्त भाजप पक्ष म्हणून नाही तर एक सजग नागरिक म्हणून देखील आम्ही हा असला उन्मतपणा सहन करणार नाही.आमच्या देवतांचा अपमान या पुढे सहन केल्या जाणार नाही.अश्या विकृतींना कायदेशीर मार्गाने ठेचायलाच हवे असं माझं ठाम मत आहे,असा संताप त्यांनी व्यक्त केला.




आमचे चॅनल subscribe करा
