फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजभंडारा जळीत कांड: १५ वर्षांनंतर ते बनले होते माय-बाप!

भंडारा जळीत कांड: १५ वर्षांनंतर ते बनले होते माय-बाप!

Advertisements

नागपूर,ता. १० जानेवरी: एका सुप्रसिद्ध मराठी शायरने म्हटले आहे ‘तुमचा जन्म गरीब घरात झाला…हा तुमचा दोष नाही..पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात..तर तो तुमचाच दोष आहे…!’भंडारा जळीत भीषण दूर्घटना ही जणू या शायरीतील शब्दांमध्ये तंतोतंत बसली,शनिवारी मध्यरात्री दहा निष्पाप गरीब बालके ही गरीब म्हणून जन्माला आली मात्र हा जणू त्यांचाच दोष होता ती गरीब म्हणूनच जग सोडून गेली अगदी…काहीही न बोलता..काहीही न करता…जगाला काहीही न मागता..काहीही न सांगता.!

भंडारा जिल्हा रुग्णालयात आगीत होरपळून मृत्यूमुखी पडलेल्या दहा निष्पाप बालकांमध्ये एक बालिका ही अशी होती जी जन्मदात्रीच्या गर्भात तब्बल १५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्ष्े नंतर उमलली होती!वनमजूर असलेले हिरालाल आणि त्यांची पत्नी रुखमा उर्फ हिरकन्या यांचा लग्नानंतर सुखी संसाराला सुरवात तर झाली मात्र अपत्यप्राप्तीसाठी त्यांना तब्बल १५ वर्षे प्रतिक्ष्ा करावी लागली.
देव,नवस,वैद्य,गंडेदोरे,उपचार,दवाखाने सर्व करुन झाले.तब्बल १५ वर्ष आशे-निराशेच्या हिंदोळ्यात जीवन कंठत असतानाच या कळीने मातेच्या उदरात ती येण्याची चाहूल दिली. तीन दिवसांपूर्वीच ती या जगात आली होती….!माय-बाप झालो म्हणून या दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता.मात्र अशक्त असल्यामुळे ती नवजात बालिका आयसीयूमध्ये होती.

शनिवारी दूपारी मात्र सुटी होणार असल्याने हे दोघे ही पती-पत्नी आनंदात होते.पतीने कुटुंबियांना उद्या मुलीला घेऊन येतो म्हणून वार्ता ही कळवली.मात्र नियतीला काही औरच मंजूर होते!शनिवारी मध्य रात्रीच घात झाला.

रात्री दोनच्या सुमारास त्याच नवजात बालकांच्या दक्ष् ता कक्ष्ात नेमकी आग लागली.यात….या चिमुकलीचा देखील होरपळून करुण अंत झाला….!प्रशासनासाठी फक्त ही एक दूघर्टना असेल मात्र….त्या आईची वेदना आता मूक झाली आहे…कायमची!

रुखमा उर्फ हिरकन्या आणि हिरालाल भनारकर(रा.परसोडी,ता.चांदोरी)यांची एका लग्नात भेट झाली,नातेवाईक असल्यामुळे लगेच लग्नाची बोलणी ही झाली,थाटात लग्न ही पार पडले.वनमजूर असलेला हिरालाल हा बाहेरगावी कामाला जात होता.

लग्नाला इतकी वर्षे झाली तरी त्यांना मूल नव्हते मात्र इतकी वर्षे त्यांनी एकमेकांना सांभाळून संसार केला.अचानक लग्नाच्या १५ वर्षांनंतर रुखमाला दिवस गेले आणि….ती आई झाली….!फक्त ३ दिवसांच्या मूलीची आई होण्याचे जीवघेणे दूखं नियतीने तिच्या नशीबी आणले…!
ज्या बाबांनी ती जगात आल्यानंतर मिठाई वाटून आनंद साजरा केला तोच बाप तिचा काळा ठिक्कर पडलेला चिमूकला देह गावी घेऊन जाताना धाय मोकळून रडत होता…..!वनमजुरी करणारा या बापाने ठरवले होते आता बाहेरगावी कामाला जाणार नाही,तिच्यासोबतच वेळ घालवणार,गावीच कामधंदा शोधणार….!दोघेही मुलीचे सुंदर भविष्य रंगविण्यात दंग असतानाच….!श्‍मशानाची मरण यातना त्यांच्या नशीबी आली…!भनारकर कुटुंबियांवर दू:खाचा डोंगर कोसळला….त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला….!

नव्हे… झाला नाही…केला….बेमुरव्वत प्रशासनाने…!अतिदक्ष् ता कक्ष् असतानाही त्या कक्ष्ात परिचारीका,वॉर्ड अटेडेन्ट,डॉक्टर..कोणीही कर्तव्यावर नव्हते. एका प्रत्यक्ष् दर्शीचे म्हणने आहे..धूर परिचारीकेने बघितल्यानंतर….दार बाहेरुन उघडल्या गेले!ही परिचारिका कक्ष्ाच्या आत कर्तव्यावर असती तर…….?घटना घडून गेल्यानंतर सगळं जग पोहोचलं…मात्र काळ्याशार धुराने या निष्पाप चिमुरड्यांचा श्‍वास कोंडत असताना…..जग शांतपणे झोपलं होतं……!

नागपूरातून अपडाऊन करणारे अनेक वैद्यकीय अधिकारी भंडारा जिल्हा रुग्णालयात कर्तव्य बजावत असल्याची माहिती समाेर आली आहे.सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री,आयुक्त किवा आरोग्य संचालकांच्या भेटीदरम्यानच आरोग्य उपसंचालक कार्यालयातील अधिका-यांची पावले जिल्हा रुग्णालयाच्या भेटीसाठी वळत असल्याचा सूर ही या ठिकाणी ऐकू आला….!

या आगीत एक जीव असा ही होता जो नुकताच पोलीसांनी कचरा पेटीतून उचलून त्या रुग्णालयात भर्ती केला होता.मात्र नियतीने त्याला येथे ही जगू दिले नाही…!दहा पालकांच्या हातात एक साथ दोन ते तीन महिन्यांच्या चिमुकल्याचे मृतदेह प्रशासनाने सोपवले…ते शव आपापल्या गावी घेऊन जाताना….प्रशासनासाठी तळतळाट आणि दुखांच्या हंबरड्याशिवाय त्या गरीब पालकांच्या हाती काहीच नव्हते.
वेळीच आग प्रतिबंधक यंत्रणा त्या कक्ष्ात बसवली असती तर?लाखो रुपये पगार घेणारे शासकीय अधिकारी,डॉक्टर,परिचारिका,वॉर्ड अटेन्डेंट..कक्ष्ाच्या आत कोणी तरी एक जरी असते तर…..?मृत्यूची झडप घालायला आलेला तो काळाशार धूर त्यांना दिसला असता अन्‌…मृत्यू ऐवजी ते आपल्या पालकांच्या उबदार मिठीत नसते का?हा प्रश्‍न आता प्रत्येक संवेदनशील मनाला….छळत राहणार….!

यांची झाली कूस उधवस्त…..

हिरकन्या हिरालाल भानारकर(मुलगी,रा.उसगाव) प्रियांका जयंत बसेशंकर(मुलगी,रा.जांब)योगिता विवेक धुळसे(मुलगा,रा.श्रीनगर/पहेला)सुषमा पंढरी भंडारी(मुलगी,रा.मोरगाव अर्जुनी,जि.गोंदिया)गीता विश्‍वनाथ बेहरे)मुलगी,रा.भोजापूर)दूर्गा विशाल रहांगडाले(मुलगी,रा.टाकला)सुकेशनी धर्मपाल आगरे(मुलगी,रा.उसरला)कविता बारेलाल कुंभारे(मुलगी,रा.सितेसारा,तुमसर)वंदना मोहन सिडाम(मुलगी,रा.रावणवाडी,भंडारा)व एक बेवारस मुलगा!

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या