फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमबोगस पंतसंस्थेद्वारे गुंतवणूकदारांची फसवणूक

बोगस पंतसंस्थेद्वारे गुंतवणूकदारांची फसवणूक

Advertisements

सचिन मेश्राम, पत्नी अश्विनी मेश्राम यांच्यासह विजय देऊळकर विरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश

नागपूर,ता. २३ जून २०२२: कनिष्ठ न्यायालय पारशिवनीचे न्यायाधीश ओ.जे.कुलकर्णी यांनी काल बुधवार दि.२२ जून रोजी आरोपी सचिन सुखदेव मेश्राम व त्याची पत्नी अश्विनी सचिन मेश्राम यांच्यासह विजय देऊळकर विरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश पारशिवनी पोलीस स्टेशनला दिले.

आरोपी सचिन मेश्राम व अन्य आरोपी हे अनधिकृत व बोगस सोसायटीच्या माध्यमाने फिर्यादी कडून मर्यादित ठेव रक्कम उकळायचे व जास्त व्याजदराचा व दुप्पट पैसे करुन देण्याचे आमिष देत असत मात्र ठेवीची मुद्दत संपल्यानंतरही आरोपींनी फिर्यादीची रक्कम परत केली नाही उलट फिर्यादीला दमदाटी देत, तिची बोगस संस्थेच्या कागदपत्रांच्या आधारे फसवणूक केली अशी तक्रार फिर्यादी आशाबाई राजेंद्र उंबरकर यांनी पोलीस स्टेशन पारशिवनी येथे दिली.

परंतु, पारशिवनी पोलिसांनी गुन्ह्याची कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे फिर्यादीने सदर तक्रार वरिष्ठ पोलीस उप अधीक्षक व पोलीस अधीक्षक यांना दिली. वरिष्ठांनी देखील सदर गुन्ह्यात कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही म्हणून फिर्यादीने ॲड. अभियान बाराहाते यांच्यामार्फत भादंविच्या कलम १५६(3) अंतर्गत न्यायालयाकडे धाव घेतली.

सहायक निबंधक, को-ऑपेराटीव्ह सोसायटी यांच्यातर्फे माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीत असे आढळले, की सदर संस्था नामे ‘संबोधी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. पारशिवनी’ ची नोंद त्यांचाकडे कुठेही नाही व सदर संस्था अनधिकृत व बोगस आहे. न्यायालयात हे कागदपत्र फिर्यादींच्या वकिलाकडून सादर करण्यात आले यामुळे,फिर्यादीची फसवणूक झाली, सोबतच त्यांच्याशी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले.

न्यायालयाने पारशिवनी पोलीस स्टेशन ला सदर प्रकरणात आरोपींवर कलम १४६(e -1),१४७(e -1), महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा,१९६०, भा. दं. वि. च्या कलम ४०६, ४०९, ४१८, ४२०, ४६५, ४६८, ४७१, १२०ब, ५०६ व महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम,१९९९ च्या कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन पुढील चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

सदर गुन्ह्यात अन्य व्यक्तींचा सहभाग चौकशीत आढळ्यास त्यांनाही आरोपी करण्यात यावे असे ही आदेश न्यायलयाने दिले. पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने फिर्यादीला न्यायालयाकडे धाव घ्यावी लागली व न्यायालयाकडून दिलासा मिळाला.

फिर्यादी तर्फे ॲड. अभियान बाराहाते यांनी बाजू मांडली. सदर संस्था नामे ‘संबोधी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. पारशिवनी’ ही बोगस असून फिर्यादीसह अन्य अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक आरोपींनी केल्याची बाब उघडकीस येत आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या