

पोलिसांनी उतरवला माज: महादूला टी.पॉईंटवरील पोलिसांची मुत्सद्देगिरी
नागपूर: देशात अभूतपूर्व संकट कोसळले असताना,प्रशासन व शासन नागरिकांना वारंवार विनंती,सूचना करीत असताना देखील काही नागरिकांच्या ‘भटकंती‘ची हौस मात्र काहीही करता फिटत नाही आहे.अश्याच काही हौशी बेजवाबदारांचा माज आज मंगळवार दि. ३१ मार्च रोजी नागपूर पोलिसांनी कोराडी महामार्गावारील महादूला टी.पॉईंटवर उतरवला.
विनाकारण चार चाकी व दूचाकी घेऊन घराबाहेर पडणारे नागरिक यांना पोलिसांनी रणरणत्या उन्हात भर रस्त्यावरच ‘डिटेंशन कॅम्प’ रेखाटून बसवून ठेवले.वझीर शेख या वरिष्ठ पोलिस निरीक्ष् कांनी महादूला मार्गावरील टी-पॉईंटवर अनेक दूचाकी व चारचाकी वाहनांना बेरिकेट्स लावून अडवले व त्यांना घराबाहेर निघण्याचे कारण विचारले.मात्र कोणतेही ठोस कारण न सांगणा-यांची वाहने जब्त करुन त्यांना रणरणत्या उन्हात बसवून ठेवण्यात आले व घराबाहेर पडण्याची त्यांची ‘हौस‘पूर्ण करण्यात आली.
महादूला टी.पॉईंट हे मध्यप्रदेश व नागपूरची सीमा असल्यामुळे पोलिसांचे विशेष लक्ष् या महामार्गावर असते. वाहनांची वर्दळ कमी असली तरी बॅरिकेट्स टाकून हा रस्ता अडविण्यात आला आहे. यामुळे अनेक हौशी तरुण पोलिसांच्या हातात अलगद सापडले. रस्त्यावरच एक मिटरचे अंतर सोडून ‘डिटेंशन कॅम्पची’ अभिनव संकल्पना नागपूर पोसिलांनी अाज राबवली. सोशल डिसटंसिंगचं मार्कींक करुन ‘वर्तुळ’ निर्माण करण्यात आली व त्यात या हौसेखातर घराबाहरे निघणारे व फेरफटका मारणारे यांना भर उन्हात बसवून ठेवण्यात आले.
हे सगळे रसत्यावर फिरणारे व किरकोळ कारणासाठी दूचाकी व चारचाकी घेऊन घराबाहरे पडले होते. त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे तसेच संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोप निश्चित करुन सोडून देण्यात आले.यानंतर देखील जो काेणी बेजवाबदारपणे रस्त्यावर येईल,स्वत:च्या आणि इतरांच्याही जिविताला धोका निर्माण करेल,त्यांच्यावर देखील यापेक्ष्ाही कठोर कारवाई केली जाईल,असा इशारा वझीर शेख यांनी व्हिडीयोच्या माध्यमातून दिला आहे.
जनतेच्या आरोग्यासाठी व सुरक्ष्ेसाठी पोसिस यंत्रणा रात्र-दिवस रसत्यावर उभे राहून,आपल्या कुटुंबाची काळजी न करता,रसत्यावर कर्तव्य करीत असताना,नागरिक विनाकारण रस्त्यावर येऊन पोलिस,प्रशासनावरचा ताण आखणी वाढवत आहेत आणि जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण करीत आहेत त्यामुळे अश्या बेजवाबदारा नागरिकांवर आता कठोर कारवाई होणार असून यापेक्ष्ाही कठोर पावले उचलली जाणार आहेत.त्यामुळे विनाकारण नागरिकांनी रस्तयावर येऊ नये इतर लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण करु नये असे आवाहन देखील वझीर शेख यांनी नागरिकांना केले.




आमचे चॅनल subscribe करा
