फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारणबूथ कॅप्चरिंगमध्ये प्रशासनाचा एकशे दोन टक्के सहभाग!

बूथ कॅप्चरिंगमध्ये प्रशासनाचा एकशे दोन टक्के सहभाग!

Advertisements

माजी आमदार विजय घोडमारे यांचा खळबळजनक आरोप
हिंगणा मतदारसंघात १९ हजार ६९१ मतदार बोगस
७ ऑक्टोबरपर्यंत मतदार यादीतील बोगस नावे वगळण्याचा न्यायालयाने दिला आदेश
नागपूर,ता.१ ऑक्टोबर २०२४: हिंगणा मतदारसंघाच्या यादीचे निरीक्षण केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की १९ हजार ६९१ मतदारांची नावे दोन वेळा आलेली आहेत.ज्या मतदाराचे नाव वानाडोंगरीच्या बूथमध्ये आहेत त्याच मतदाराचे नाव सावळीदेवळीमध्ये सुद्धा आहे.वानाडोंगरीमध्ये मतदान करणा-याला सावळीदेवळीमध्ये ही त्याचे नाव मतदार यादीत आहे,हे माहितीच नसते,अश्‍या वेळी सावळीदेवळीमध्ये त्या मतदाराच्या नावावर दूसराच कोणी तरी मतदान करताे आणि हे सगळं प्रशासनाच्या पाठींब्यातून होतं.बूथ कॅप्चरिंगचा हा प्रकार एकशे दोन टक्के प्रशासनाच्या सहभागातून होतो,असा खळबळजनक आरोप हिंगणा मतदारसंघाचे माजी आमदार विजय घोडमारे(पाटील)यांनी आज प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत केला.
प्रशासनाच्या या धोकाधडीच्या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागितली व न्यायालयाने २७ सप्टेंबर २०२४ रोजी आदेश पारित करीत,ज्या अधिका-यांवर आचरणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे,जिल्हाधिका-यांच्या अधिपत्याखाली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे,त्यांनी आपली कर्तव्ये योग्यरितीने पार पाडावी,असे खडे बोल सुनावले असल्याची माहिती याप्रसंगी माजी आमदार घोडमारे यांनी दिली.हा आदेश न्यायमूर्तीद्वय भारती डांगरे व न्या.अभय मंत्री यांनी दिला असून, निवडणूक विभाग तहसील कार्यालय हिंगणा यांना दिनांक ७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ५० विधानसभा हिंगणा क्षेत्रामध्ये असलेल्या बोगस मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
त्यामुळे आम्ही ७ तारखेपर्यंत न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी होत आहे की नाही ते पाहू,अन्यथा वेगळा मार्ग पत्करावा लागेल,असा इशारा घोडमारे यांनी दिला.१९ हजार ६९१ बोगस मतदारांमधुन साढे नऊ हजार मतदारांची नावे दोन मतदारसंघात आहेत.या साढे नऊ मतदारांची नावे एकाच बूथवर मतदान करण्यासाठी कायम ठेवीत दूस-या बूथवरुन ती डिलीट करावी,अशी मागणी त्यांनी केली.
सर्वात महत्वाचे म्हणजे हिंगणा मतदारसंघात ४ लाख ६२ हजार मतदारांची नावे आहे.कामठी मतदारसंघानंतर हिंगणा मतदारसंघ असा झाला आहे, जिथे एवढे मतदार आहेत.एवढे मतदार वाढूच शकत नाही,असा दावा करीत, भाजपचा आमदार बोगस मतदानातून पुन्हा निवडून येण्यासाठी बोगस मतदारांची मदत घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.मतदान करताना ओळखपत्र,आधार कार्डवर मतदाराचा चेहरा दिसतो,तरी देखील प्रशासनाचे निवडणूक कर्मचारी बोगस मतदारांना मतदान करण्याची मुभा देतात,हे या वेळी खपवून घेतले जाणार नाही,असा दम त्यांनी दिला.
आम्ही २०१९ च्या निवडणूकीत देखील बोगस मतदारांचा प्रश्‍न उचलला होता मात्र,प्रशासनाने आमचे आवेदन क्रमांक ७ मध्ये नसल्याचे सांगून फेटाळले होते.याशिवाय आम्ही शेवटच्या दिवशी अर्ज केला होता,त्यामुळे त्या अनुभवातून शहाणे होऊन यावेळी १९ हजार ६९१ मतदारांच्या नावाविषयीचा आमचा आक्षेप आम्ही योग्य अर्जामध्ये नमूद केला,याशिवाय वेळेत नमूद केला असल्याचे घोडमारे यांचे वकील यांनी सांगितले.७ तारखेपर्यंत न्यायालयाने प्रशासनाला अवधी दिला आहे,प्रशासनाने त्याची योग्य अंमलबजापणी केली नाही तर,पुढील न्यायालयीन कारवाई केली जाईल,असे ते म्हणाले.
मेघे आडनावाचे शंभर मतदार!
याप्रसंगी बोलताना,घोडमारे यांनी सांगितले की,हिंगणाच्या राजीव नगर भागात सर्वाधिक भटके विमुक्त आदिवासी,पारधी आदी यांची घरे आहेत.या भागात सर्वाधिक गायी,म्हशी पाळणारे आहेत मात्र,राजीव नगर भागात किमान मेघे आडनावाचे शंभर मतदार आहेत!मेघे हे कधीपासून गाई,म्हशी पाळून दूध विक्रीचा धंदा करतात?असा सवाल घोडमारे यांनी केला.महत्वाचे म्हणजे मेघे यांच्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता,त्यांच्या पत्नी,महाविद्यालयाचे कर्मचारी,त्यांचे कुटूंबिय,विद्यार्थी,वसतीगृहातील विद्यार्थी या सगळ्यांची नावे हिंगणा मतदारसंघात आहे,महाविद्यालयाचा अधिष्ठाता,प्राचार्य हे नागपूरात राहत असून हिंगणा मतदारसंघात त्यांची नावे कशी?असा सवाल त्यांनी केला.
मेघे यांच्या शाळेतच मतदान केंद्र!
वानाडोंगरीतील मेघे यांच्या महात्मा गांधी विद्यालयातच प्रशासन हे सात बूथांवर मतदान घेतात.आमदारांची शाळा असल्यामुळे मतदारांसोबतच ,निवडणूक अधिकारी व पोलिंग एजेंट यांच्यावर दडपण येतं.निवडणूका या पारदर्शक व भयरहित वातावरणात झाल्या पाहिजे.असे असताना प्रशासनाने २०१४,२०१९ व नुकतेच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणूकीत देखील मेघे यांच्या या शाळेत सात मतदा नकेंद्र ठेवली.या विरोधात उद्या न्यायालयात दूसरी यचिका दाखल करणार असल्याचे घोडमारे यांनी सांगितले.
प्रशासनाने बोगस मतदार गाळले नाही तर परिणामासाठी प्रशासनच जबाबदार:कुंदा राऊत(जिल्हा परिषद उपाध्यक्ष) 
न्यायालयाने दिलेल्या वेळेत प्रशासनाने बोगस मतदार यादीतून गाळण्याची कारवाई केली नाही आणि बोगस मतदार कायम ठेवले तर याच्या परिणामासाठी जबाबदार प्रशासनच राहील.यावेळी महाविकासआघाडी बोगस मतदान हिंगण्यामध्ये होऊ देणार नाही.आमचे शेवटपर्यंत यावर लक्ष राहील.बूथवर आघाडीचे कार्यकर्ते व हिंगण्याची जनता काय करेल,हे निवडणूकीच्या दिवशी प्रशासन अाणि विरोधकांना  कळेल.कोणतीही घटना घडू शकते,याला जबाबदार प्रशासन राहील.

………………………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या