
डॅा.नीलम गोऱ्हे यांची सूचना
मुंबई : चिखली तालुक्यात एका मंदिराच्या प्रांगणातून ६ वर्षीय बालिकेला भरदिवसा पळवून नेऊन लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणा-या नराधम श्री सदानंद भगवान रोडगे यास अंढेरा पोलिसांनी बुधवारी (दि. १७) गजाआड केले आहे. आरोपी हा त्याच मंदिरासमोर पूजा प्रसाद साहित्याची विक्री करत होता. मंदिरामागे काही अंतरावर अमानुष व घृणास्पद कृत्य केल्याचा गुन्हा उघडकीस आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती.*
विधानपरिषद सदस्य आ.अमोल मिटकरी यांनी या धटनेबाबत लक्ष घालण्याची विनंती ना.डॅा.नीलम गोर्हे ,ऊपसभापती,विधानपरिषद यांना केली होती. नुकतेच आरोपीला पोलीसांनी गजाआड केले आहे. या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, पीडित ६ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह रोहडा येथील मंदिरात नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यासाठी आली होती. दरम्यान मंदिराच्या प्रांगणात खेळत असताना सकाळी ११ वाजताच्या सुमारास ती अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. तिचा आसपास शोध घेऊनही ठावठिकाणा न लागल्याने तीच्या आईने अंढेरा पोलीसांत तक्रार दिली होती. पोलीस व नागरिक बेपत्ता पिडित मुलीचा शोध घेत असतांना दुसऱ्या दिवशी मंदिरामागे ५०० मीटर अंतरावरील नाल्यात दगडाच्या ढिगा-खाली तिचा मृतदेह आढळून आला. तिचा चेहरा दगडाने ठेचलेला होता. गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पोलिसांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात मृत मुलीचे शवविच्छेदन करून घेतले. बुधवारी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. यामध्ये पिडीत मुलीवर लैंगिक अत्याचार करुन गळा आवळून खून केल्याचे समोर आले.
दरम्यान पोलिसांच्या तपास पथकाने रोहडा येथील संबंधित मंदिरासमोरील पूजा प्रसाद साहित्य विक्रेत्यांची चौकशी केली. त्यातील एक विक्रेता सदानंद भगवान रोडगे याच्या हातावर, गालावर नखाने खरचटल्याचे निशाण दिसून आले. पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पिडीत बालिकेवर मिठाईचे आमिष दाखवून अत्याचार करून खून केल्याची माहिती दिली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून नराधम आरोपीला गजाआड केले आहे. गुरुवारी त्याला कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरोपीस ६ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकारचे गांभीर्य लक्षात घेवून डॉ नीलम गोऱ्हे उपसभापती विधान परिषद यांनी पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री सुनील कडासने यांना खालील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
१) आरोपींवर आवश्यक कलमे लावून त्वरीत पुढील कारवाई करावी.
२) लवकरात लवकर चार्जशीट दाखल करावे.
३) सदरील घटनेतील आरोपीस मदत करणारे त्याचे साथीदार यांचा शोध घेऊन त्यांनाही अटक करावे व त्यांचेवर ही कडक कलमे लावण्यात यावीत.
४) सर्व आरोपींना जामीन मिळणार नाही यासाठी चांगले विधीज्ञ देण्यात यावे.
५) पीडितील कुटुंबाचे मानसिक समुपदेशन करण्यात यावे
६) पिडीत कुटुंबाला मनोधेर्य योजनेतून तात्काळ मदत करण्यात यावी.
वरील प्रमाणे पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना डॅा.नीलम गोऱ्हे यांनी निर्देश दिले आहेत




आमचे चॅनल subscribe करा
