

टेकडी गणपतीच्या दर्शनाला जमली शेकडोंची गर्दी: पोलिसांचे पाचारण
नागपूर,ता. १० सप्टेंबर: मायबाप सरकारने आदेश काढले मंडळात गणपती विजरामान होतील मात्र भाविकांना ’मुखदर्शन’घेता येणार नाही!तसेच आदेश मंदिरांच्या बाबतीत ही सरकारचे कायम आहेत.मंदिर नित्य पूजे साठी उघडल्या जातील पण भाविकांना दर्शन घेता येणार नाही,अश्या या सर्व ‘शासकीय’ गोंधळातच विघ्नहर्ता बुद्धिची देवता श्रीगणरायाचे आगमन झाले.करोना संकटामुळे पुरता हवालदिल झालेला भाविक शेवटी आज त्याच्या आगमनाचा शुभ मुर्हूत साधून ,त्याच्या दर्शनासाठी धावलाच.नागपूरचे आराध्य दैवत टेकडी गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी असाच अगदी पहाटे ७ वा.चा मुर्हूत साधला आणि मंदिर प्रशासनाचा एकच गोंधळ उडाला.
नित्यनियमाप्रमाणे काकड आरतीसाठी ब्रम्ह मुर्हूतावर आज ही पहाटे ५ वा. सेवकांनी व पुजा-यांनी मंदिर उघडले.काकड आरती व नित्य धार्मिक विधी होत असतानाच सकाळी ७ ते ७.३० वाजता भाविकांची तूफान गर्दी मंदिरा बाहेर झाली.एवढी गर्दी बघून मंदिर प्रशासनाचे धाबे दणाणले.त्यांनी लगेच पोलिसांना पाचारण केले.
पोलिसांनी अखेर भाविकांना बाहेर हूसकावून लावले.यात सर्वाधिक गर्दी ही नव्या दूचाकी व चारचाकी पूजनासाठी झाली होती.श्री गणेश चतुर्थीचा शुभ मुर्हूत साधून अनेकांना आज आपापल्या वाहनांची विधीवत पूजा करवून घ्यायची होती.विघ्नहर्त्याकडून नवीन वाहन चालवताना कोणतेही ‘विघ्न’ओढवणार नसल्याची ‘गॅरंटी’हवी होती.मात्र नंतरचे विघ्न टाळण्यासाठी करोना नावाचे विद्यमान जीवघेणे विघ्न आधीच अखिल मानवजातीच्या मानगुटीवर गेल्या दीड वर्षांपासनू बसले आहे,त्याचा पुरता विसर या नागपूरकर भाविकांना झाला होता.
पूजेसाठी गर्दी करणारे अनेक वाहनचालक हे तर आपल्या बच्चे कंपनीसोबत ही आलेले दिसून पडले.मंदिराच्या परिसरात करोनाचा संसर्ग होणार नाही,बुद्धिच्या देवतेसमाेर असा ‘निर्बुद्धपणाचा‘विचार या भाविकांनी केला असावा. पोलिसांनी कठोर भूमिका घेऊन सर्वांची वाहने ही परिसरा बाहेर काढायला लावली व मंदिरा समोरील उड्डाण पूल रस्त्यावर पूजेची परवागनी दिली.
सकाळी साढे नऊ,दहा वाजेपर्यंत भाविकांचा हा ‘सावळा गोंधळ’आपल्या लाडक्या गणरायासमोर सुरु होता.शेकडो भाविकांच्या गर्दीत एक जरी डेल्टा प्लसचा वाहक असेल तर……..?हा सुखकर्ता,दू:खहर्ता ही मग आपल्या भाविकांवर ओढवणारी संकटे बघू शकणार आहे का……!




आमचे चॅनल subscribe करा
