फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजबी.एड प्रथम वर्षाचे ऑफलाइन पेपर रद्द करा: राज्यपाल तसेच विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांची गुहार

बी.एड प्रथम वर्षाचे ऑफलाइन पेपर रद्द करा: राज्यपाल तसेच विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांची गुहार

Advertisements

राज्यपालांना पाठवले पाचशेच्या वर पाठवले मेल:परिक्ष्ेवर घालणार बहीष्कार

नागपूर,ता. ३१ ऑक्टोबर: नागपूर विद्यापीठातील बी.एड प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना अचानक १३ दिवसा आधी ,त्यांचे मार्च महिन्यात बाकी राहिलेले तीन पेपर घेण्याचा टाईम टेबल आला. येणाऱ्या ९,१० आणि ११ नोव्हेंबरला ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा,परिक्ष्ा केंद्रावर घेण्याचे परिपत्रक निघाले .परिपत्रक निघताच विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

महत्वाचे म्हणजे कित्येक विद्यार्थी नागपूर शहरात शिक्षण घेत असल्यामुळे शासकीय खाजगी वस्तीगृहात राहत होते
किंवा खाजगी रूम करून राहत होते,मात्र लॉक डाऊन काळामध्ये सर्व विद्यार्थी आपल्या मूळ गावी गेले असून महाराष्ट्र सरकारच्या आदेशान्वये खाजगी तसेच शासकीय वस्तीगृह अजूनही बंद आहेत, त्यामुळे बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला आल्यानंतर राहायचे कुठे असा प्रश्न पडला!

तसेच खाजगी रूम करुन राहणारे विद्यार्थ्यांनी सात महिने आधीच लॉकडाऊन सुरू असताना रूम सोडून दिले असल्यामुळे परत येऊन रूम करणे व स्थायिक होऊन पेपर देणे यात खूप वेळ जाईल परिणामी इतक्या कमी वेळात तीन पेपरचा अभ्यास करायचा की स्वतःच्या राहण्याची व्यवस्था करायची असा यक्ष् प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.

विद्यापीठाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी हे सर्वाधिक भरडले जाणार आहेत. या सोबतच महाराष्ट्र सरकारने अनलॉक पाच द्वारे ३० नोव्हेंबर पर्यंत पुन्हा तारीख वाढून दिल्यामुळे विद्यार्थ्यांना नागपूरला किंवा ऑफलाइन पेपर द्यायला कसे पाठवावे? जर ऑफलाईन परिक्ष्ा झाली आणि कोरोनाचा संसर्ग होऊन या महामारीचा प्रसार झाला तर जबाबदारी कोण घेईल ?असा प्रश्न पालकांना पडलेला आहे त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक महाविद्यालयात सांगण्यात आले की प्रथम सेमिस्टरला प्रमोट करून ट्तिय वर्षात प्रवेश मिळेल चिंता करू नका त्यामुळे विद्यार्थ्यांनी द्वितीय सेमिस्टर कडे लक्ष दिले.

विद्यापीठाला वारंवार विनंती केल्यानंतरही विद्यापीठाने निर्णय घेतलेला नाही त्यामुळे अनेक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्रित येत बी.एड समन्व‘य समिती’ तयार केली व ऑनलाईन मिटिंग घेत निर्णय घेऊन, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू प्र-कुलगुरू महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांना मेल द्वारे आपली व्यथा सांगितली .

बीएड समन्वय समिती द्वारे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ५०० च्या वर मेल पाठवले. त्याद्वारे विद्यार्थ्यांनी अपेक्षा केली आहे की विद्यापीठ यावर किंवा राज्यपाल यावर नक्कीच निर्णय घेतील. लवकरात लवकर विद्यापीठाने योग्य निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताचा घेतला नाही तर बी.एड विद्यार्थी समन्वय समिती अंतर्गत बीएड प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांनातर्फे या लेखी परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा विद्यार्थ्यांनी B.ed विद्यार्थी समन्वय समिती अंतर्गत विद्यापीठाला दिला आहे

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या