Advertisements

माध्यमांमध्ये पुन्हा एकदा बोईंग कंपनीकडे संशयाची सुई
अहमदाबाद विमानतळावर बोईंगच्या एअर इंडियाचे विमान उड्डाण भरताना दुर्घटनाग्रस्त
२४१ प्रवाश्यांचा करुण अंत:आश्चर्यकारकरित्या एक प्रवासी सुखरुप
रहीवाशी क्षेत्रातील वैद्यकीय इमारतीवर विमान धडकले: या ही घटनेत वीस पेक्षा जास्त जीव गेल्याचा संशय
चरकी-दादरीनंतर देशातील आणखी एक भीषण विमान दुघर्टना:देशासाठी काळा दिवस
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन:मुलाला भेटण्यासाठी लंडनला निघाले होते:नातेवाईकांच्या भावना अनावार
५४ प्रवासी ब्रिटेनचे: देशाची व एअर इंडियाची प्रतिष्ठा पणाला:गृहमंत्री अमित शहा घटनास्थळी
नागपूर,ता.१२ जून २०२५: देशातील सर्वाधिक दु:खद अशी विमान दुर्घटना आज दुपारी १.४५ वा.गुजरात राज्यातील अहमदाबाद विमानतळावर घडली असून बोईंग कंपनीच्या एअर इंडियाचे हे विमान २४२ प्रवाश्यांना घेऊन लंडन येथे जात असताना दुर्घटनाग्रस्त झाले.अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरुन उड्डान घेतल्यानंतर अवघ्या काही काही मिनिटात विमानातील पायलटने धोक्याची सूचना पाठवली,त्याला उत्तर मिळण्याचा अवधी देखील मिळाला नाही व अवघ्या ६२५ मीटरच्या उंचीवर असताना हे विमान मेघानी या स्थळावरील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या भोजनकक्षाच्या इमारतीवर कोसळले,या खाली जळून २० च्या वर वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज अहमदाबाद पोलिसांनी व्यक्त केला आहे.
देशासाठी १२ जून हा दिवस काळा दिवस व काळ दिवस ठरला असून या दूर्घटनेत १६९ भारतीय ५३ ब्रिटीश नागरिक १ कॅनेडियन,७ पोर्तुगीज असून यातील २१७ प्रवासी प्रौढ,११ लहान मुलं तर दोन नवजात बालके होती.१० क्रू मेंबर्सचा देखील या दूर्घटनेत दूर्देवी मृत्यू झाला.युद्धपातळीवर अपघातस्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरु असून या दूर्घटनेविषयी आता समाज माध्यमात हळहळ व्यक्त होत असतानाच कारणांची चर्चा सुरु झाली आहे.एअर इंडियाचे हे विमान बोईंग कंपनीचे असून ते जुने झाले असल्याचा आरोप केला जात आहे.
बोईंग ७८७ चा रेकॉर्ड उत्तम असला तरी त्याच्या निर्मिती तंत्रावर वारंवार माध्यमांमध्ये विविध तंत्रज्ञांनी आक्षेप नोंदवले आहे. बोईंगने विमानांची बांधणी करताना शॉट कट्स मेजर्स घेतले आहे ज्यामुळे विमाने कमी कार्यक्षम असून संकटकाळात सक्षमपणे कार्य नाही करु शकणार,असा दावा पूर्वीपासूनच विमान संरचना तज्ज्ञ करीत होते.ज्या तंत्रज्ञांनी बोईंगच्या एसम्बली लाईनवर काम केले आहे त्यातील एक असणारे सॅम सॅमबोरने नावाच्या बाेईंगच्या एका तंत्रज्ञ अभियंताने, जगप्रसिद्ध न्यूयार्क टाईम्सला एका मुलाखतीत सांगितले होते की,बोईंग हा विमानांच्या खरेदीदार देशांसोबत खोटे बोलत आला आहे की, ५० वर्ष त्यांच्या विमानांचे आयुष्यमान असून ४४ हजार उड्डाणे त्यांची विमाने करु शकतात.

बाेईंग कंपनी वेगवेगळ्या ठिकाणाहून विमानाचे वेगवेगळ्या भागांचे एकत्रिकरण करीत असते.असे करीत असताना त्यात ज्या छोट्या छोट्या जागा रिकाम्या राहून जातात,ज्या जागांना जबरदस्ती भरल्या जातात.सॅमबोर यांनी दावा केला आहे की बोईंग कंपनीचे कर्मचारी हे सरळ-सरळ त्या भागांना समतोल करण्यासाठी विमानांच्या त्या -त्या भागांवर उड्या मारतात!
तंत्रज्ञ असेलेले विसिल बोअर सांगतात की बोईंगने विमानाची बांधणी करताना जबरदस्ती नटबोल्ट तर जोडून दिले मात्र,ज्यावेळी ही विमाने जुनी होतील,हजारो उड्डाणे करुन चुकतील,फटिक होईल त्यावेळी याच जबरीने रिकाम्या भागातील समतोल केलेल्या जागा विमानांसाठी धोक्याच्या ठरु शकतात.त्यामुळे २०१४ पासून एअर इंडियाच्या सेवेत असलेला व आज अहमदाबाद विमानतळावर दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानासोबत देखील असेच काही घडले आहे का?असा सवाल आता केला जात आहे.कारण एकसाथ दोन्ही इंजिन निकामे होणे ही घटना अतिशय दूर्मिळ आहे त्यामुळे आता आजच्या दुर्घटनेसाठी बोईंग कंपनीवर बोट उचलले जात आहे.
याशिवाय टाटा समूहावर देखील आरोप निश्चिती होऊ शकते कारण ज्यावेळी टाटा समुहाने एअर इंडियाची खरेदी केली त्यावेळी देशात एअर इंडिया पार मोडीत निघालेली विमानसेवा होती. टाटा समुहाच्या एअर इंडियाच्या अनेक उड्डानाच्या नंतर अनेक प्रवाश्यांनी एअर इंडियाच्या सेवेवर सोशल मिडीयावर तिखट प्रतिक्रिया दिल्या की कश्यारितीने या विमानांच्या सीट्स फाटल्या आहेत,वातानुकुलीत यंत्रे बंद आहेत,मनोरंजनाचे यंत्र बंद आहेत,विमानातील शौचालयांची दशा योग्य नाही इत्यादी मात्र,टाटा समुहाने विमानसेवेसोबतच प्रवाश्यांच्या सुरक्षेशी देखील काही तडजोड केली गेली होती का?असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
या दूर्घटने मागचे कारण विमानाच्या मेंटनेंसमध्ये आहे की विमानामध्ये आहे की पायलट एररमुळे ही भीषण दुर्घटन घडली,याकडे आता समस्त जगाचे लक्ष लागले आहे कारण या दूघर्टनमुळे देशाची प्रतिष्ठा जुळली आहे.
२८ वर्षांपूर्वी घडलेल्या विमान दुर्घटनेत देखील ३०० च्या वर विमान प्रवाश्यांचा एकसाथ मृत्यू झाला होता.आजच्या दूर्घटनेत देखील ३०० च्या वर विमान प्रवासी व नागरिक मृत्यूमुखी पडले असल्याचा अंदाज आहे.ही दूर्घटना देशातील दुसरी अशी सर्वाधिक भीषण दुर्घटना ठरली आहे.२८ वर्षांपूर्वी १२ नोव्हेंबर १९९६ रोजी हरियाणाच्या चरखी दादरी येथे सऊदी अरब व कजाकिस्तानची विमानांची हवेतच एकमेकांसोबत टक्कर झाली.मालवाहक विमान सऊदी अरबचे होते तर प्रवासी विमान कजाकिस्तानाचे होते.या दुर्घटनेत दहा किलोमीटरपर्यंत विमानांचे अवशेष पडले होते!या दूर्घटनेत २३१ भारतीय प्रवासी सऊदी अरबचे १८,नेपालचे ९,पाकिस्तानचे ३,अमेरिकेचे २ आणि एका ब्रिटीश प्रवाश्यांचा मृत्यू झाला होता.यातील फक्त ८४ मृतदेहाची ओळख पटवता आली होती.चरखी दादरीच्या ज्या गावातील शेतात ही विमाने दूर्घटनाग्रस्त होऊन पडली,ते शेत आज देखील बंजर झाले असून त्यात कोणती उत्पादन होत नाही.
कजाकिस्तानच्या विमानाने दिल्ली विमानतळावरुन उड्डाण घेतले.सऊदी अरबच्या विमानाला दिल्ली विमानतळावर उतरायचे होते.सऊदी अरबचे विमान १४ हजार फूट उंचीवर होते तर कजाकिस्तानचे १५ हजार फूट उंचीवरुन खाली उतरत होते.नवीन दिल्लीच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलने दोन्ही विमानांना वेगवेगळ्या उंचीवर ठेवले होते मात्र,कजाकिस्तानच्या विमान निर्धारित उंचीवरुन खाली उतरले आणि सऊदी अरबच्या विमानाला धडकले,हा अपघात भारताच्या विमान सुरक्षा नियमांमध्ये समूळ परिवर्तन घडवून आणणारा ठरला होता.या दूर्घटनेनंतर सर्व व्यवसायिक विमानांमध्ये ट्रॅफिक कोलिजन अवाइडेंस सिस्टिम बंधनकारक करण्यात आले.
असे असताना आज अहमदाबादमध्ये दूर्घटनाग्रस्त झालेल्या विमान पुन्हा एकदा विमान प्रवाश्यांची सुरक्षीततेचा प्रश्न गंभीर करुन जाणारा ठरला.या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील मृत्यू झाला असून ते लंदनमध्ये आपल्या मुलाला भेटण्यासाठी जात होते.देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने दूर्घटनास्थळ गाठले.ही घटना अतिशय दूर्देवी असल्याचे ते म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उद्या दुर्घटनास्थळाला भेट देणार असल्याची बाब समोर आली आहे.केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री मोहन नायडू यांनी दूर्घटनेबाबत तीव्र शोक संवेदना व्यक्त करीत या दूर्घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यात येईल,असे आश्वासन दिले.
राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते व खासदार सुनील तटकरे यांच्या भाच्याची पत्नी ज्या याच विमानात एअर हॉस्टेस होत्या,त्यांचा देखील मृत्यू दूर्घटनेत झाला.

(छायाचित्र: भीषण दुर्घटनेत आश्चर्यकारकरित्या एकमेव जिवित असलेला प्रवासी रमेश विश्वास)
एअर इंडियाचे A1-171 विमानात लांब पल्ल्याचा प्रवास असल्याने हजारो लिटर ईंधन होते.एका एहसान खालिद नावाच्या माजी वैमानिकाने सांगिल्याप्रमाणे एअर इंडियाच्या या विमानाने विमानतळावरुन व्यवस्थित उड्डाण घेतले होते,व्हिडीयो व सर्व दृष्य सांगतात की विमान खाली कोसळले त्यात कोणताही स्फोट झाला नाही.विमानाच्या फ्लाईट डेटा रेकाॅर्डर,कॉकपिट वॉयस रिकॉर्डर आणि ACARS डेटातून दूर्घटनेच्या कारणाची अचूक माहिती मिळू शकेल.विमानात पॉवरची कमतरता आली असावी,असे इंजिच्या खराबीमुळे घडू शकतं मात्र,याची शक्यताच फार कमी आहे की विमानाचाच्या दोन्ही इंजिनमध्ये एकसाथ बिघाड येईल.एखाद्या मोठ्या पक्ष्याने धडक दिल्यावरही दोन्ही इंजिनमध्ये एकसाथ बिघाड उदभवू शकत नाही.या विमानाच्या वैमानिकाने कंट्रोल रुमला मेडे कॉल केला होता,याचा अर्थ खराबी कॉकपिटमध्ये त्यांना दिसली होती.ते या खराबीचा सामना करीत हवेत उड्डाण घेते झाले,मात्र,हे आकलना पलीकडे आहे की लैंडिंग गियर खालीच होते!याचा सरळ अर्थ इंजिनमधील तांत्रिक दोष वैमानिकांना आधीच कळला असावा त्यासाठी त्यांनी लैंडिंग गियर खालीच ठेवले असावे.६१५ फूट उंचापर्यंत उडाल्यानंतर वैमानिकांना नेमके काय झाले?हे सांगणे अशक्य असल्याचे एहसान सांगतात.
भारतातील विमान दुर्घटनेचा इतिहास-
ऑगस्ट २०२०- मुसळधार पाऊसात कोझीकोडमध्ये एअर इंडिय एक्सप्रेस बोईंग ७३७ विमान रनवे व फिसलले व समोरच्या झाडीत पडून २१ प्रवाश्यांचा मृत्यू.
मे २०१०- दुबईवरुन येणारे एअर इंडिया बोईंग ७३७ विमान मंगलुरुच्या विमानतळवर रनवेवर फिसलले व घाटात जाऊन पडले ज्यात १५८ प्रवाश्यांचा मृत्यू
जुलै २०००-कोलकत्ता ते नवी दिल्ली दरम्यान शासकीय एअर फ्लाईट पटनाच्या एका रहीवाशी भागात कोसळले ज्यामध्ये ५० प्रवाश्यांचा मृत्यू झाला.
नोव्हेंबर १९९६-उत्तरी हरियणाच्या चरखी दादरी शहराच्या अवकाशात सऊदी अरब व कजाकिस्तान एअरलाईन्सच्या विमानांची आकाशात टक्कर झाली ज्यामध्ये ३५० प्रवासी मृत्यू पावले.
एप्रिल १९९३- छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)विमानतळावरुन इंडियन एअरलाईन्सचे बोईंग ७३७ विमान दुर्घटनाग्रस्त झाले ज्यामध्ये ५५ प्रवाश्यांचा मृत्यू झाला.
ऑगस्ट १९९१- कोलकलत्तावरुन उड्डाण घेऊन मणिपुरची राजधानी इंफाल जवळ उतरत असताना इंडियन एअरलाईन्सचे ७३७ विमान दुर्घटनाग्रस्त झाले ज्यात ६९ प्रवासी मृत्यू पावले
ऑक्टोबर १९८८- मुंबईवरुन अहमदाबादला जात असताना इंडियन एअरलाईन्सचे बोईंग ७३७ विमान उतरत असताना दुर्घटनाग्रस्त झाले ज्यामध्ये १३० प्रवाश्यांचा मृत्यू झाला.
जानेवारी १९७८- एअर इंडियाच्या विमानातील सर्व २१३ प्रवाश्यांचा मृत्यू झाला जेव्हा वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमान अरबी समुद्रात बुडाले.
………………………………….
Advertisements

Advertisements

Advertisements
