फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजबावीस वर्षांपूर्वीच्या महापालिका क्रीडा घोटाळ्यातील सर्व १०३ नगरसेवक निर्दोष मुक्त

बावीस वर्षांपूर्वीच्या महापालिका क्रीडा घोटाळ्यातील सर्व १०३ नगरसेवक निर्दोष मुक्त

Advertisements

नागपूर : १० मे मे २०२२: बावीस वर्षांपूर्वी गाजलेल्या नागपूर महापालिकेतील क्रीडा घोटाळाप्रकरणी सर्व १०४ आरोपींची अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एन. जी. देशपांडे यांनी मंगळवारी निर्दोष मुक्तता केली. निर्दोष मुक्तता झालेल्यांमध्ये भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांच्यासह ९९ आजी-माजी नगरसेवक, ६ साहित्य दुकानदार, आणि ४ मनपा अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना २००० साली भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेत क्रीडा साहित्य घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नगरविकास खात्याचे तत्कालीन सचिव नंदलाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. नगरसेवकांनी क्रीडा मंडळांना साहित्य देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा ठपका नंदलाल यांनी अहवालात ठेवला होता.

याप्रकरणी सुरुवातीला सदर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात भाजपसह काँग्रेस, रिपाई आणि काही अपक्ष नगरसेवकांचाही समावेश होता. दरम्यान, क्रीडा साहित्य घोटाळ्याची व्याप्ती अधिक असल्याने राज्य सरकारने क्रीडा साहित्य घोटाळ्याची चौकशी गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केली होती. याप्रकरणी आरोपींच्या विरोधात भांदविच्या कलम ४२०, ४०४ आणि ४६८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या