भारतीय विद्या भवनाला दिली ९० वर्षांसाठी केवळ साडेतीन कोटींच्या भाडेतत्वावर!
कामठी पोलीस ठाण्यात केली लेखी तक्रार: सरकारने चौकशी करण्याची केली मागणी
नागपूर,ता. २८ नोव्हेंबर: मौजा- कोराडी , ख. क्र. २३८ क्षेत्र १.९४ हेक्टर, ता. कामठी , जिल्हा नागपूर या जमिनीबाबत दुय्यम निबंधक कामठी या कार्यालयात श्रीमती वंदना सौरंगपते यांनी केशवराव माधवराव फुलझेले आणि सचिव महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी ता. कामठी यांनी दि. १८.१२.२०१८ रोजी एक्सचेंज डीड चा दस्त नोंदवून दिला , या दस्तात बेकायदेशीरपणे भारतीय विद्या भवन यांना शासकीय जमीन महसूल भरण्याचे अधिकार लिहिले, याप्रमाणे खोटा किंमतीचा दस्त तयार करून सरकारी दफ्तरी वापरला , याप्रमाणे ४६५ ,४६६,४६७,४६८,४७१,१६६,१६७,१२०-ब भा. द. वी. प्रमाणे कृत्य केले. यानंतर दि. १०.११.२०१८ रोजीच्या जुन्या तारखेत दि.२५.१.२०१९ रोजी संस्थानचे सर्व स्वाक्षरीकर्ता पदाधिकारी यांनी माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात विश्वस्त सभेत ठराव तयार करून त्याआधारे ही जमीन एक वेगळी संस्था ‘भारतीय विद्या भवन’ यांना ९० वर्षाचे भाडेतत्वावर चिल्लर रकमेत ३.५ कोटी रुपयात देण्याचा MEMORANDUM OF UNDERSANDING चा किंमतीचा दस्त तयार करून यात खोटी माहिती लिहून दुय्यम निबंधक कामठी यांच्या समक्ष दि. १५.०२.२०१९ रोजी नोंदवून दिला आणि भारतीय विद्या भवनच्या लोकांनी नोंदवून घेतला, याप्रमाणे भा.द.वी.चे कलम ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१, ४२०, १२०-ब, ३४ याप्रमाणे हा गुन्हा केला असल्याचा धक्कादायक आरोप ॲड.सतीश उके यांनी आज शनिवार दि. २८ नोव्हेंबर रोजी प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्र परिषदेत केला.या संपूर्ण गैरकृत्य कारभाराविराेधात कामठी पोलीस ठाण्यात रिसतर तक्रार नोंदवण्यात आली असून या गैरव्यवहाराचे संपूर्ण दस्तावेज उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी वरील लोकांच्यासोबत अपराधिक षड्यंत्र करून ७/१२ उताऱ्यावर महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडीचे नाव चढविले आणि तेव्हाच ते नाव कसलेही सक्षम दस्तावेजाशिवाय बेकायदेशीरपने ताबडतोब कापून मालकी‘ भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्र कोराडी ’यांच्या नावाने चढविली हे एकच फेरफार क्र. ५१०७ दि. १६.०८.२०१९ रोजी याप्रमाणे केले , हे भा.दं.वी.चे कलम १६६,१६७,१२०-ब प्रमाणे बेकायदेशीर कृत्य ठरतं असे ते म्हणाले
.
यानंतर नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकारी , जिल्हाधिकारी कार्यालय नागपूरचे अधिकारी आणि तहसीलदार कामठी यांनी ‘भारतीय विद्या भवन’ यांच्या मालकी अर्जावरून त्यांच्यासोबत संगनमत करून त्यांना मालक संबोधून त्यांचे नावे अकृषक आदेशाकरिता प्रकिया पार पडून ,इतर कार्यालयाचे अधिकारी यांच्या संगनमताने अहवाल दिला किंबहूना आदेश पारित केले आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने सनद जारी केली त्यावर भारतीय विद्या भवनचे पदाधिकारी यांनी मालक म्हणून स्वाक्षरी करून सनद स्वीकारली.
याप्रमाणे त्यातील लोकांनी भा.द.वी.चे कलम १६६, १६७, १९९, २००, १९३, २१९, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१, १२०-ब याप्रमाणे गुन्हा केल्याचा आरोप ॲड.उके यांनी याप्रसंगी केला.
या दस्तात जिल्हाधिकारी नागपूर यांच्या आदेशात नमूद नसलेली अट आणि शर्त बेकायदेशीरपणे अटी व शर्ती यात क्र. १२ वर लिहून आणि दाखल करून भारतीय विद्या भवन यांना शासकीय जमीन महसूल भरण्याचे अधिकार दिले , याप्रमाणे खोटा किंमतीचा दस्त तयार करून दुय्यम निबंधक कामठी या कार्यालयात सरकारी दफ्तरी संगनमताने अपराधिक षड्यंत्र करून वापरला,असा अारोप त्यांनी केला. .
पुढे बोलताना ते म्हणाले की दि. १०.११.२०१८ रोजीच्या जुन्या तारखेत दि.२५.१.२०१९ रोजी महलक्ष्मी संस्थान यांचे त्यातील सर्व स्वाक्षरीकर्ता पदाधिकारी यांनी माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात विश्वस्त सभेत खोटा ठराव तयार करून तसेच त्याआधारे ही जमीन अन्य वेगळी संस्था भारतीय विद्या भवन यांना ९० वर्षांच्या भाडेतत्वावर चिल्लर रकमेत ३.५ कोटी रुपयात देण्याचा MEMORANDUM OF UNDERSANDING चा किंमतीचा दस्त यात खोटी माहिती लिहून दुय्यम निबंधक कामठी यांचे समक्ष दस्त अनुक्रमांक ९१५ / २०१९ दि. १५.०२.२०१९ रोजी नोंदवून दिला आणि भारतीय विद्या भवनच्या लोकांनी नोंदवून घेतला. हे कृत्य अपराधिक षड्यंत्र रचून केले. ही सार्वजनिक विश्वस्त संस्थेची आणि महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडीचे भक्तगण यांची सार्वजनिक फसवणूक असल्याचे ते म्हणाले.
संस्थानाच्या या अतिशय मोक्याच्या ठिकाणी भारतीय विद्या भवनसारख्या एखाद्या खासगी संस्थेचे सांस्कृतिक संकूल बनल्यास आई जगदंबेच्या दर्शनासाठी प्रत्येक भाविकास किमान एक किलोमीटर पायी चालून दर्शन घेणे क्रमप्राप्त ठरणार असल्याचा दावा त्यांनी केला.कारण मोक्याच्या या जागेवर भारतीय विद्या भवनची खासगी मालमत्ता मध्ये आल्याने त्या ठिकाणी कायमच उच्च वर्गीयांची वर्दळ,सुरक्ष्ा रक्ष् क असणार यात वाद नाही .
आपला तांत्रिक मुद्दा पटवून देताना ॲड.उके म्हणाले की, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी वरील लोकांच्या सोबत अपराधिक षड्यंत्र करून ७/१२ उताऱ्यावर महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडीचे नाव ज्यादिवशी चढविले तेव्हाच ताबडतोब ते नाव ताबडतोब कापून बेकायदेशीरपने म्हणजे कसलेही सक्षम विक्रीपत्र याशिवाय या जमिनीची मालकी अन्य संस्था भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्र कोराडी यांच्या नावाने ७/१२ उताऱ्यावर चढविली . हे एकच फेरफार क्र. ५१०७ दि. १६.०८.२०१९ रोजी याप्रमाणे केले आहे . आणि आजही त्याप्रमाणे तो बेकायदेशीर ७/१२ उतारा हा सरकारी अभिलेखर आहे आणि त्याचा उपयोग सरकारी कार्यालये हे अन्य संस्था भारतीय विद्या भवनचे पदाधिकारी करीत आहेत.
वरील बेकायदेशीर व सर्वस्वी खोट्या कागदपत्रांच्या आधारे ही अन्य संस्था भारतीय विद्या भवनचे पदाधिकारी यांनी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण याचे अधिकारी यांच्या समक्ष दिनांक १२.१०.२०२० रोजी व त्यानंतर अर्ज करून, खोटे प्रतिज्ञापत्र देवून अकृषक परवानगीची मागणी त्यांना मालक किवा अर्जदार दाखवून केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय नागपूरचे अधिकारी आणि तहसीलदार कामठी यांनी भारतीय विद्या भवनच्या अर्जावरून त्यांच्यासोबत संगनमत करून त्यांना मालक संबोधून त्याचे नावे अकृषक आदेशाकरिता प्रकिया पार पाडून इतर कार्यालयाचे अधिकारी यांच्या संगनमताने खोटे आदेश पारित केले आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने सनद जारी केली त्यावर भारतीय विद्या भवनचे पदाधिकारी यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
याप्रसंगी माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांचे परम मित्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय बनवारीलाल पुरोहित यांच्या विषयी ‘फायद्याचे प्रेम’ यास अधीन झाले आहेत असा जळजळीत आरोप त्यांनी केला.हा एकच व्यवहार नाही तर असे अनेक व्यव्हार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या भारतीय विद्या भवन या संस्थेला फायदा पोहोचवण्यासाठी केला असल्याचा आरोप त्यांनी केला.
बनवारीलाल पुरोहित यांचे संबधित भारतीय विद्या भवन , रामदेवबाबा स्मारक समिती या संस्थांना नागपूर पोलिसांची झिंगाबाई टाकळी येथील ५-६ एकर जमीन आणि मौजा खापरखेडा ता. कामठी कोराडी औष्णिक वीज केंद्र यांच्या तलावातील १० एकर जागा तलाव असताना देखील ‘जमीन’ दाखवून दिली . मौजा खापरखेडा ता. कामठी कोराडी औष्णिक वीज केंद्र यांच्या तलावातील १० एकर तलाव,जमीन दाखवून देण्यात चंद्रशेखर बावनकुळे यांचा सहभाग होता , बावनकुळे याचे कार्यालयाचे पत्र दि. १.१०.२०१५ हे स्पष्ट दर्शविते.असा अरोप त्यांनी केला.
एवढेच पुरे नव्हते तर आता त्या तलावा शेजारील भागातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान, महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडीची जमीन वरीलप्रमाणे गैरकृत्य करून ७/१२ उताऱ्यावर मालकी हक्कासह पुरोहीत यांना देण्यात आली.
कामठी येथील पोलीस ठाण्यात
दिलेल्या तक्रारीत बावनकुळे यांच्या कार्यालयाचे पत्र दि. १.१०.२०१५ , आज दि. २८.११.२०२० रोजी बनवारीलाल पुरोहित यांची इंटरनेट , विकिपीडियावर असलेली माहिती ज्यात ते “ He is also the vice-chairman of Bharatiya Vidya Bhavan schools founded by late Kanaiyalal Maneklal Munshi in 1938.” असे नमूद आहे. ही देखील कागदपत्रे सलग्न केली असल्याचे त्यांनी सांगितले.
याचसोबत जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथील अकृषक प्रकार याचे संपूर्ण फाईलची छायांकीत पत्र सलग्न केली आहे तसेच दुय्यम निबंधक कामठी येथील दस्त क्र. ९१५/२०१९ आणि त्यात दस्त क्र. ५७०६ /२०१८ याची प्रत सलग्न केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
सराकरने या संपूर्ण गैरव्यवहरांची तातडीने चौकशी करुन महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या हक्काची पाच एकर जमीन ही भारतीय विद्या भवन यासारख्या खासगी संस्थेच्या घश्यात जाण्यापासून थांबवावे,अशी मागणी त्यांनी ठाकरे सरकारला केली.
पत्र परिषदेत जगदंब मंदिराशी संबधित विनोद पटोले,वासुदेव बेलेकर आदी यांनी देखील बावणकुळे यांनी २०१३ साली जगदंबा कोराडी मंदिराचे विश्वस्त झाल्यावर मंदिरात झालेल्या अपहार याविषयी मनोगत व्यक्त केले.

आमचे चॅनल subscribe करा