Homeनागपूर न्यूजबावणकुळे यांची भाजप प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती:कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

बावणकुळे यांची भाजप प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती:कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

Advertisements

उद्या देशपांडे सभागृहात होणरा सत्कार

नागपूर,ता.१२ ऑगस्ट २०२२: माजी उर्जामंत्री व भारतीय जनता पक्षाचे विद्यमान विधान परिषदेचे आमदार चंद्रशेखर बावणकुळे यांची आज भाजप प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोराडी येथील त्यांच्या निवासस्थानासमोर फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची वर्णी नुकत्याच पार पडलेल्या मंत्रीमंडळत विस्तारात मंत्री पदी लागल्याने त्यांच्या ठिकाणी बावणकुळे किवा आशिष शेलार यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती.अखेर यावर आज पक्षश्रेष्ठींतर्फे शिक्कामोर्तब झाले.

आशिष शेलार यांची नियुक्ती मुंबई शहर अध्यक्ष पदी झाली असून त्यांनी या नियुक्ती नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन सदिच्छा भेट घेतली.

बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष झाल्याने संघटनेला आता आणखी बळ मिळेल असे मत भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी व्यक्त केले.

मागच्या सत्ताकाळात ते मंत्री पदावर असतानाही आपल्या सुस्वभावातून जमीनी स्तरावरील कार्यकर्त्यांच्या घरी भेट देत राहीले.सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ते नावासह ओळखत असतात. उर्जा क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.त्यांच्या मंत्री पदाच्या कार्यकाळात राज्यातील नागरिकांना लोड शेडींगच्या त्रासापासून मुक्तता मिळाली होती.

याशिवाय शेतक-यांना न्याय देण्यात ते अग्रेसर राहीलेत.ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यात त्यांची भूमिका महत्वपूर्ण राहीली असल्याचे दटके यांनी सांगितले.

उद्या देशपांडे सभागृहात सकाळी साढे अकरा वाजता त्यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Latest बातम्या