

प्रवेश प्रक्रियेवर होणार परिणाम: श्रीमंतांनाच संधी
निवडणूकीत गर्दी चालते,परिक्षा सुरळीत घेता येत नाही?
पालकांची तीव्र प्रतिक्रिया
नागपूर,ता. ३ जून: करोना प्रार्दभावाच्या दूस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय माध्यमिक शिक्ष् ण मंडळाची(सीबीएसई) बारावीची परिक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मंगळवारी घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्ष् तेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.त्यानंतर पालकांची तीव्र प्रतिक्रिया समाज माध्यमात उमटली.
बारावी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या जिवनात महत्वाचा टप्पा असतो.या परिक्षेनंतरच तो शाखा निवड करतो किंबहूना त्याला आपल्या आवडत्या शाखेत प्रवेशाचा मार्ग मोकळा होत असतो.मोदी यांनी एवढ्या महत्वाची परिक्षा ही संपूर्ण प्रशासनाला कामाला लाऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्ष्ि तेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून,परिक्षा केंद्रावर प्रत्येक खोलीत दूर-दूर अंतरावर फक्त ५ ते १० विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था केली असती तर ते जास्त न्यायसंगत राहीले असते,असे अनेक पालकांचे मत आहे.
बारावीच्या परिक्षेसाठी गेल्या वर्षभर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला,विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरही परिक्षा न घेण्याचा राजकारण्यांचा निर्णय चुकीचा परिणाम करणार असल्याचे बोलले जात आहे. राज्यकर्त्यांचा हा शैक्ष् णिक खेळखंडोबा पुढील काळात विद्यार्थ्यांना न परवडणारा ठरणार असल्याची शंका अनेक पालक व्यक्त करीत आहेत.
मोदी सरकाराचा हा कोणता ‘नवा फंडा’आहे?असा संताप व्यक्त केला जात आहे.आज गुरुवार दि.३ जून रोजी देखील मोदी यांनी विद्यार्थी व संबधित अधिकारी यांच्या बैठकीत अचानक सहभागी होऊन विद्यार्थ्यांना आश्चर्यचकीत केले.देशातील नागरिकांना असे मानसिक,भावनिक व आर्थिक ‘धक्के’देने हे माेदी पर्वाच्या पहील्या टर्मपासूनच देशवासी चांगल्याने अनुभवत आहेत.
१२ वी परिक्ष्ेत सरसकट सर्वांनाच उत्तीर्ण करण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांसाठी सोयीचा नसून घातक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.याचा प्रवेश प्रक्रियेवर खूप मोठा परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे.परिक्षा रद्द झाल्याने हूशार व बुद्धिवान विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असून श्रीमंतांनाच हव्या त्या शाखेत प्रवेश मिळेल अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.
केंद्र सरकारने केलेल्या परिक्षेच्या या घोळामुळे पुढे शिक्ष् ण घेऊन डॉक्टर बनणारा डॉक्टरच, कंपाऊंडराला विचारेल इंजेक्शनची ही whil कशी उघडते?असा प्रकारचे मिम्स ही चांगलेच व्हायरल झालेत.
केंद्र सरकारने स्वस्त लोकप्रियेतेसाठी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळखंडोबा केल्याची टिका समाज माध्यमात उमटली आहे.आम्हालाही आमच्या पाल्यांच्या जीवाची भीती आहे मात्र ऐन १२ वी च्या टप्प्यावर प्रत्येक विद्यार्थ्याच्या जिवितेच्या सुरक्ष्ि ततेची काळजी वाहत परिक्षा केंद्रांवर सुरक्ष्ति अंतर राखून परिक्षा घेणे ही केंद्र सरकारचीच जवाबदारी होती,आपली जवाबदारी टाळण्यासाठी केंद्राने सरळ परिक्षाच रद्द केली हे संपूर्ण अपयश सरकार व प्रशासानाचे असल्याची टिका होत आहे.
एकीकडे नियम पाळण्यासाठी पोलिसांना चौकाचौकात उभे केले जाते,त्यांच्याकडून दंडूकांचा मार जनतेला बसतो,दंड वसूल केला जातो मग हीच यंत्रणा राबवून परिक्षा का नाही घेता आली?असा संताप व्यक्त केला जात आहे.सरकारकडे दूरदृष्टी नाही,नियोजन नाही,नेहमीसारख्या संवग लोकप्रियतेसाठी देशातील विद्यार्थ्यांचे भविष्यच केंद्र सरकारने पणाला लावले असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.
एकीकडे सरकार निवडणूकांमध्ये व कुंभ मेळ्यात लाखा-लाखांची गर्दी जमवून करोनाचा प्रार्दुभाव वाढवते दूसरीकडे ऐन महत्वाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांची परिक्षाच रद्द करते.विद्यार्थ्यांना परिक्षा हवी आहे.गेल्या दीड वर्षांपासून सरकार व प्रशासन याचे नियोजन नाही करु शकली नाहीत यात विद्यार्थ्यांचा दोष नाही.
पालक हे देखील खूप तनावात असून परिक्षा आटोपली असती तर भार उतरला असता,असे त्यांचे मत आहे.रितसर परिक्षा व निकाल लागणे अपेक्ष्ति आहे.परिक्षा न होणे याचे दुष्परिणाम व त्याची संपूर्ण जवाबदारी ही केंद्राची असणार आहे.
अनेक बाबतीत केंद्राने हात झटकून राज्यांवर निर्णय सोपवलेत मग सीबीएसईची परिक्षा घेण्याचा निर्णय व नियोजन हा देखील राज्यांवरच सोपवण्यात यायला हवा होता,असे अनेक पालकांचे मत आहे.आता परिक्षाच रद्द झाली तर पुढचे नियोजन काय?याबाबत पालक तसेच विद्यार्थी वर्ग चांगलाच तनावात आला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीत १२ वी ची परिक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांचे हित लक्ष्ात घेऊनच केला आहे.विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षा सर्वात महत्वाची असून त्याबाबत तडजोड केली जाऊ शकत नाही.१२ वी परिक्षेसंबधी विद्यार्थी,पालक व शिक्ष कांमध्ये असलेला संभ्रम दूर करणे आवश्यक होते.सध्याच्या तनावपूर्ण परिस्थितीत विद्यार्थ्यांवर परीक्षा देण्यासाठी दबाव टाकणे योग्य नाही,असे सांगण्यात आले.
१२ वी च्या निकालासाठी सीबीएसई कालबद्ध व निर्दोष पद्धतीने वस्तुनिष्ठ निकषाद्वारे पावले उचलेल,असेही या बैठकीत निश्चित करण्यात आले तसेच गेल्या वर्षीप्रमाणे काही विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची ईच्छा असेल तर परिस्थिती जेव्हा अनुकूल बनेल तेव्हा सीबीएसईने त्यांना तसा पर्याय उपलब्ध करुन द्यावा,असेही बैठकीत ठरवण्यात आले.
मात्र १२ ची परिक्षा होणे यावर विद्यार्थ्यांचं पुढील भवितव्य निर्भर असतं.विद्यार्थी म्हणजे देशातील भावी पिढी आहेत.‘निवडणूका घेण्यात सक्ष् म मात्र परिक्षा घेण्यात अपयशी’ ठरलेल्या सरकारने विद्यार्थ्यांच्या याच भावी भवितव्याचा चांगलाच खेळखंडोबा केला असल्याच्या नाराजीचा सूर समाज माध्यमात उमटला आहे.
राज्याचे विद्यार्थीही तनावात!
सीबीएसई १२ वी ची परिक्षा न घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातही १२ वीची परीक्षा होणार नाही,असे संकेत शिक्ष् ण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.मुलांच्या शैक्ष् णिक जीवनातील १२ वी ची परीक्षा ही महत्वाची असली तरीही सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा ही आपल्या सर्वांची पहीली प्राथमिकता असल्याचे त्या म्हणाल्या.या पुढे महाराष्ट्र सरकार देखील महारााष्ट्र राज्य शिक्ष् ण मंडळाच्या १२ वीच्या परीक्ष्ांबाबत विद्यार्थ्यांचे हित जोपासून लवकरच निर्णय घेईल,असेही त्या म्हणाल्या.
थोडक्यात करोना या विषाणूने देशातील आर्थिक व आरोग्याच्या क्षेत्रातच पराेकोटीचा विध्वंस केला नाही तर शैक्ष् णिक क्षेत्राचीही पुरती वाट लावली असल्याचे मायबाप सरकार घेत असल्याच्या निर्णयांवरुन दिसून पडत आहे.




आमचे चॅनल subscribe करा
