फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजबाबा ताजुद्दीन यांचा शंभरावा वार्षिक उर्स २१ ऑगस्ट पासून

बाबा ताजुद्दीन यांचा शंभरावा वार्षिक उर्स २१ ऑगस्ट पासून

Advertisements

ट्रस्टतर्फे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

नागपुर,१८ ऑगस्ट २०२२: सर्वधर्म समभावाचे प्रतीक सूफी संत बाबा ताजुद्दीन (र.अ) यांचा शंभरावा वार्षिक उर्स रविवार दिनांक २१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर पर्यंत ताजबाग शरीफ येेथे श्रद्धापूर्वक व उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या प्रसंगी ताजबागमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आज गुरुवारी हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट कार्यालय येथे आयोजित पत्र परिषदेत ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिली.

या प्रसंगी ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. सुरेंद्र जिचकार, सचिव ताज अहमद राजा, ट्रस्टी फारूख बावला, बुर्जिन रंडेलिया, मुस्तफा टोपीवाला, इमरान खान, गजेंद्रपाल सिंह लोहिया प्रामुख्याने उपस्थित होते.

विशेष बाब म्हणजे कोविड संक्रमणाच्या कारणामुळे गेल्या दोन वर्षांनंतर बाबा ताजुद्दीन यांच्या वार्षिक उर्सचा कार्यक्रम पुन्हा एकदा आयोजित केला जात आहे.

महत्वाचे म्हणजे हा बाबा ताजुद्दीन यांचा शंभरावा उर्स असल्यामुळे, भाविकांमध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळतोय. श्रद्धालूंचा उत्साह बघून ताजबाग ट्रस्टने या पार्श्वभूमीवर विशेष अायोजन करीत भरगच्च कार्यक्रमांची आखणी केली आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाकडूनही संपूर्ण सहयोग मिळत असल्याचे प्यारे खान यांनी सांगितले.

बाबा ताजुद्दीन यांच्यावर श्रद्धा व विश्‍वास असणारे अनुयायी जगभरात आहेत. बाबा ताजुद्दीन यांच्या शंभराव्या वार्षिक उर्सनिमित्त त्यामुळेच, मोठ्या संख्येने भाविकांचे ताजबाग येथे येण्याची शक्यता गृहीत धरुन ,स्थानिक प्रशासनाने ताजबाग तसेच आजूबाजूच्या परिसरात शिस्तबद्ध वाहतूक, सुरक्षा व्यवस्था याससह इतर ही अत्यावश्‍यक सुविधांचा भाविकांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्नरत असल्याचे प्यारे खान यांनी सांगितले.

ट्रस्टच्या कार्यालयात सातत्याने या विषयावर पदाधिका-यांच्या बैठका पार पडत आहे. उर्स मध्ये आपली सेवा देणारे सेवेकरी तसेच वॉलेंटियर्स देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत जे या एवढ्या भव्यदिव्य सोहळ्यात आपले सहकार्य देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

वार्षिक उर्सचे असे आहे आयोजन-

२१ अॉगस्ट सकळाी ९ वाजता दरगाहचे सज्जादानशीन सैयद यूसुफ इकबाल ताजी यांच्या मार्गदर्शनात मदरसा जामिया अरबिया इस्लामियाचे संचालक मुफ्ती अब्दुल कदीर खान यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमंत पाचवे राजे रघुजी भोसले यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीनुसार परचम कुशाईची रस्म अदा केली जाईल व उर्सची सुरवात होईल.

परचम कुशाई नंतर ताजाबगच्या शाही मस्जिदीचे इमाम मौलाना खुर्शीद आलम खान यांच्याद्वारे कुराने पाकची तिलावत होईल. याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून मुस्लिम धर्मगुरु मौलाना सैयद मोहम्मद हाशमी मियां (उ.प्र.) उपस्थित राहतील.

२६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता छोटा कुल शरीफची फातेहा होईल व और रात्री १० वाजता आॅल इंडिया नातिया मुशायरा होईल.

२८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता बड़ा कुल शरीफचे आयोजन करण्यात आले आहे.

३० अॉगस्ट रोजी रात्री १० वाजता दरगाह परिसरात ऑल इंडिया नात ख्वानीचा कार्यक्रम होईल.

१ सप्टेंबर रात्री १० वाजता आॅल इंडिया सूफियाना कव्वाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

३ सप्टेंबर दूपारी २ वाजता ताजबाग दरगाह परिसरात अंतरराष्ट्रीय सूफी कॉन्फ्रेन्स मध्ये प्रसार-प्रचार माध्यमांशी संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जगभरातील अनेक देशांमधून आलेले वेगवेगळ्या धर्माच्या धर्मगुरुंसोबत यावेळी संवाद साधला जाईल.यानंतर याच दिवशी रात्री १० वाजता आंतरराष्ट्रीय सूफी कॉन्फ्रेंसचे आयोजन करण्यात आले आहे.

मात्र वार्षिक उर्सचा भव्य मेळा ३० सप्टेंबरपर्यंत ताजबाग येथे सुरु असणार आहे.

दोन वर्षांनंतर भाविक घेणार दरबारी शाही संदलचा आनंद-

२५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट कार्यालयापासून दरबारी शाही संदलची मिरवणूक निघेल. शहरतील विविध स्थळांवरुन सायंकाळी ६ वाजता हे संदल ताजबाग येथे परत येईल. तब्बल दोन वर्षांनंतर दरबारी शाही संदलचे आयोजन होणार आहे. ताजबागच्या दरबारी शाही संदलमध्ये मोठ्या संख्येने श्रद्धालु सहभागी होत असतात. यंदा वार्षिक उर्सच्या उत्साहवर्धक सोहळ्यात, हेलीकॉप्टरमधून हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टमधील सर्व विशवस्त दरगाह वर फूलांचा वर्षांव करतील.

सुरक्षेच्या कारणास्तव ड्रोन आणि सीसीटीवी कैमरे यांनी संपूर्ण उर्स सोहळ्यात देखरेख ठेवली जाणार असल्याचे पत्र परिषदेत प्यारे खान यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या