

खासगी रुग्णालयांची लृट सुरुच: गर्भवती निगेटीव्ह महिलेलाही केले पॉझिटीव्ह!
नागपूर,ता. १५ ऑक्टोबर: कोव्हिडच्या नावाखाली सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक लृट करने अद्यापही नागपूरातील अेनक खासगी रुग्णालयांनी थांबिवले नसल्याचे पुढे आले आहे.त्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्यावतीने अश्या रुग्णालयांवर करण्यात येणारा कडक कारवाईचा इशारा हा ‘बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात’उक्तीसारखा ठरत आहे.
प्रकाश भोयर यांनी सांगितल्याप्रमाणे ते ३० ऑगस्ट रोजी पारडी येथील भवानी रुग्णालयात भर्ती झाले होते.त्यांना एका दिवसासाठी ऑक्सीजन लावण्यात आले,मात्र या रुग्णालयाने बिलामध्ये पाच दिवसांच्या ऑक्सीजनचा खर्च जोडला!पीपीई किटची किंमत ही ६०० रुपये असताना पीपीई किट ३ हजार रुपये दर दिवसाचा खर्च!औषधांचा खर्च पंधरा हजार रुपये! बिलामध्ये या रुग्णालयाने फक्त ९५३ रुपये कमी केले.या रुग्णालयाने प्रकाश भोयर यांच्याकडून एक लाख पंचेचाळीस रुपये आठ दिवसांचे बिल काढले. ३० तारखेला ३० हजार रुपये भोयर यांनी डिपॉझिट केले होते. कोविड चाचणी देखील केलीच नाही,सर्वात चमत्कारिक बाब म्हणजे ज्या दिवशी सुटी दिली त्या दिवशी भोयर यांचे सिटीस्कॅन करण्यात आले! भाेयर यांनी औषधी तसेच पीपीई किटचे पैसे परत करण्याची मागणी केली आहे.
रमेश साहू यांच्या पत्नी रिमा साहू यांच्या बाळंपणाची वेळ आल्याने रमेश साहू हे त्यांना डागा रुग्णालयात घेऊन गेले,त्या ठिकाणी रिमा यांची आरटी-पीसीआर कोविडची चाचणी करण्यात आली,त्या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला.मात्र ह्दयाची गती जास्त असल्याने रमेश यांना डागा रुग्णालयातून मेयो किवा मेडीकलमध्ये रिमा यांना रेफर करण्यास सांगण्यात आले.मात्र मेयो-मेडीकलमध्ये कोविडचे रुग्ण जास्त असल्याने रमेश हे पत्नीला पुगलिया रुग्णालय,वर्धमान नगर येथे घेऊन गेले.त्या ठिकाणी देखील रिमा यांची कोविडची चाचणी करण्यात आली,त्या आरटी-पीसीआर चाचणीचा निकाल देखील निगेटीव्ह आला. मात्र बाळंतपण झाल्यानंतर दुस-या दिवशी तेथील डॉक्टरांनी सांगितले की पत्नीला खूप जास्त ताप आला आहे,सीटीस्कॅन करा,रक्ताची चाचणी करा,एक्सरे करा,आरटी-पीसीआर परत करावे लागेल,मी त्यांना सर्व काही करुन घ्या अशी अनुमती दिली,मात्र आरटी-पीसीआर चाचणी होण्यापूर्वीच फक्त सीटी-स्कॅन झाल्याबरोबर त्यांनी पत्नी या करोनाबधित असल्याचे जाहीर केले!
पत्नीला काेविड रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगण्यात आले,मी पत्नीला कोविड रुग्णालयात दाखल करताना १ लाख ३५ हजार रुपये आधीच डिपॉझिट घेण्यात आले,दुस-या दिवशी पुन्हा आरटी-पीसीआरच्या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह सांगण्यात आला,पत्नीला घरी घेऊन जातो,असे सांगितल्यास शनिवार,रविवार आणखी दोन दिवस रुग्णालयाच राहू द्या,असे सांगण्यात आले व औषधोपचारचा खर्च किती आहे? असे विचारले तेव्हा ८ हजार रुपये सांगण्यात आले,मात्र सोमवारी ४२ हजार ३९० रुपयांचा औषधांचा काढला.१५ हजार रुपये फक्त एक दिवसाच्या रुग्ण भर्तीचे बिल काढले एकूण ५७ हजार ३९० रुपये!

नागपूर सिटीझन्स फोरमचे मनपा आयुक्तांकडे कारवाईचे निवेदन-
खासगी रुग्णालयांकडून कोव्हिड रुग्णांची आर्थिक लूट सुरुच आहे. याविरोधात नागपूर सिटीझन्स फोरमने आज गुरुवारी दि.१५ ऑक्टोबर रोजी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांची भेट घेतली. यावेळी फोरमच्या पदाधिका-यांनी पिडीत रुग्णांच्या नातेवाईकांना सोबत घेऊन आयुक्तांना निवेदन दिले. या चर्चेत फोरमच्या पदाधिका-यांनी खासगी रुग्णालयांच्या लुटीची उदाहरणे पुराव्यासकट आयुक्तांपुढे ठेवली. यात उपलब्ध खाटांचा ८०/२० फाॅर्मुला, पीपीई किटचे अवाजवी शुल्क, हाॅस्पिटलच्याच फार्मसीतून औषध खरेदीची सक्ती व मनपाने नेमलेल्या आॅडिटरचा मुद्दा मांडण्यात आला. आयुक्तांनी जवळपास एक तास फोरमच्या पदाधिका-यांचे म्हणणे ऐकून घेतले.. नोडल अधिकारी म्हणून मनपा आयुक्त राधाकृष्णन यांनी गैरप्रकार करणा-या हाॅस्पिटल्सवर कठोर कारवाई करावी. याबद्दल कुठलाही राजकीय व हाॅस्पिटल लाॅबिचा दबाव न जुमानता पिडीत रुग्णांना न्याय द्यावा असे आवाहन नागपूर सिटीझन्स फोरमतर्फे करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सार्वजनिकरित्या जाहीर केल्यावरही खासगी रुग्णालये हे रुग्णांकडून १ ते ५ लाखापर्यंतची अॅडवांस रक्कम मागतात. तातडीने हे पैसे जमा करु शकत नसणा-या रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. आरोग्य मंत्री व शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवणार्या हाॅस्पिटल्सविरोधात महानगरपालिका आयुक्त कुठलीही कारवाई करीत नाही.
राज्य सरकारच्या परिपत्रकाप्रमाणे ८०/२० च्या रेश्योनुसार प्रायव्हेट हाॅस्पिटल्समध्ये बेड्स उपलब्ध होत नाही. या आदेशाची अंमलबजावणी करण्यात मनपा प्रशासन कमी पडत आहे. वारंवार सूचना देऊनही सरकारी दरपत्रकाचे फलक हाॅस्पिटल्समध्ये लावण्यात आले नाहीत त्यामुळे रुग्णांची प्रचंड आर्थिक लूट होत आहे.
मार्केट रेट प्रमाणे पीपीई किटची किंमत जास्तीत जास्त ५०० रुपये आहे. मात्र हाॅस्पिटल्स रुग्णांकडून १३०० ते ३३६० रुपये वसूल करीत आहेत.कोव्हिडवर कुठलाही निश्चित उपचार नसतांना औषधांच्या नावावर रुग्णांकडून लाखो रुपये उकळल्याचे प्रकार समोर आले आहेत. हाॅस्पिटलमध्ये असलेल्या मेडिकल स्टोर्समधूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती रुग्णांना केली जात आहे. शिवाय अंतिम बिल देतांना कोणत्या दिवशी काय औषधोपचार झाला याची माहिती दिली जात नसल्याचेही निदर्शनास आले आहे.
खाजगी रुग्णालयांमध्ये मनपाने नियुक्त केलेले ऑडिटर्स हे एक थोतांड आहे. यांच्या उपलब्धतेची वेळ, नाव व मोबाईल नंबर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना भटकावे लागते. या कथित ऑडिटर्सकडून मेडिसीन बिलाच्या रकमेची योग्य प्रकारे पडताळणी होत नसल्यामुळे रुग्णांची लूट थांबवणे कठीण झाले आहे.
रुग्णांना अवाजवी बिल देणार्या दोषी हाॅस्पिटल्सविरोधात गुन्हे दाखल करुन तात्काळ त्यांचे लायसन्स रद्द करावे अशी मागणी सिटीझन्स फोरमने केली आहे. सरकारी दरपत्रकानुसार ८०/२० बेडच्या उपलब्धतेचे फलक हाॅस्पिटल्समध्ये तात्काळ लावण्यात यावे शिवाय यासंदर्भात डॅशबोर्ड उपलब्ध करुन द्यावा.उपचारासाठी अॅडवांस रक्कम वसूल करण्यात येऊ नये, अॅडवांस जमा करण्यासाठी बाध्य करणार्या हाॅस्पिटल्सवर कारवाई करावी.
यावेळी नागपूर सिटीझन्सचे प्रा. विकास चेडगे, अभिजित झा, वैभव शिंदे-पाटील, अमित बांदूरकर, अभिजित चंदेल, गजेंद्रसिंग लोहिया, प्रतिक बैरागी, संकेत महल्ले व काही पिडीत रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.
आयुक्तांनी दिलेली आश्वासने –
१)कोव्हिड रुग्णांची आर्थिक लुबाडणूक करणार्या प्रायव्हेट हाॅस्पिटल्सकडून व्याजासकट पैसे परत मिळवून देणार, व दोषी हाॅस्पिटल्सवर कठोर कायदेशीर कारवाई करणार
२)हाॅस्पिटल्सला पीपीई किटसाठी ६००/- (नाॅन आयसीयू) व १२०० (आयसीयू) च्यावर पैसे घेता येणार नाही.
३) कोव्हिड रुग्णांना भर्ती करतांना अॅडवांस रक्कम घेणे बेकायदेशीर असेल.
४) औषधे हाॅस्पिटलमधील मेडिकल स्टोर्समधून घेणे बंधनकारक नाही. बाहेरुन औषध खरेदीची मुभा असेल.
५) प्रत्येक हाॅस्पिटल्समध्ये ८०/२० रेश्योनुसार उपलब्ध खाटांची माहिती दर्शविणारा फलक लावला नसल्यास कारवाई करणार
६) ऑडीटरने बिल तपासल्याशिवाय व त्या बिलावर सही असल्याशिवाय रुग्णांना अंतिम बिल दिले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी संपर्क
– 7020387188
पिडीतांच्या मदतीसाठी नागपूर सिटीझन्स फोरमची हेल्पलाईन
8668604623, 7020387188
7720076560
7798987505




आमचे चॅनल subscribe करा
