फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजबहुपात्री नाटकाचा अनुभव देणारा 'नली' एकल नाट्यप्रयोग

बहुपात्री नाटकाचा अनुभव देणारा ‘नली’ एकल नाट्यप्रयोग

Advertisements

राष्ट्रभाषा परिवाराची प्रस्तुती :’ लकीर के इस तरफ ‘ महितीपटाचे स्क्रिनिंग

नागपूर,ता.१० ऑक्टोबर २०२२: राष्ट्रभाषा परिवार सामाजिक सांस्कृतिक संस्था नागपूरतर्फे नुकतेच ८ ऑक्टोंबर २०२२ रोजी , परिवर्तन जळगाव निर्मित ‘ नली ‘ या एकल नाट्याचा प्रयोग सादर करण्यात आला. रंगमंचावर एका कलावंताने सादर केलेला हा प्रयोग असला तरी प्रयोगकर्त्यांनी त्याला एकपात्री ऐवजी एकल नाट्यप्रयोग असा सार्थ शब्द वापरला आहे. कारण बहुपात्री नाटकाचा अनुभव देण्याची क्षमता या प्रयोगात प्रेक्षकांनी अनुभवली.

साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित कवी आणि लेखक श्रीकांत देशमुख यांच्या ‘ पडझड वाऱ्याच्या भिंती ‘ या व्यक्तिचित्रातील नलिनी देवराव यावर आधारीत नली हे व्यक्तिचित्र होतं. नाट्यरूपांतरण शंभु पाटील यांचं तर दिग्दर्शन योगेश पाटील यांचं होतं. या नाट्य प्रयोगाची निर्मिती परिवर्तन जळगाव संस्थेची तर एकल नाट्याचे सादरीकरण हर्षल पाटील यांनी केले. मंगेश कुलकर्णी याचं पार्श्वसंगीतहोरीलसिंग राजपूत यांची प्रकाशयोजना होती.

साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित कवी आणि लेखक श्रीकांत देशमुख यांच्या ‘ पडझड वाऱ्याच्या भिंती ‘ या व्यक्तिचित्रातील नलिनी देवराव यावर आधारित नली हे व्यक्तिचित्र होतं. नाट्यरूपांतरण शंभु पाटील यांचं तर दिग्दर्शिन योगेश पाटील यांचं होतं. या नाट्य प्रयोगाची निर्मिती परिवर्तन जळगाव संस्थेची तर एकल नाट्याचे सादरीकरण हर्षल पाटील यांनी केले. मंगेश कुलकर्णी यांच पार्श्वसंगीत व होरीलसिंग राजपूत यांची प्रकाशयोजना होती.

म्हंटली तर ही छोटी गोष्ट आहे. एका मुलीची एका तरुणाने सांगितलेली ही अबोध मनातल्या प्रेमाची गोष्ट तशी वेगवेगळ्या रूपात समोर आलेली आपण पहिली आहे. तिच्यातला हळवा रोमॅन्टिसिझमही आपण कधी ना कधी अनुभवलेला आहे. तरीही ‘नली’ची रंगमंचावरून पेश केली जाणारी गोष्ट आपल्याला व्याकुळ करून जाते, कारण या परिचित रोमॅन्टिसिझमच्या पलीकडे आपल्याला काहीतरी स्पशून जातं. सांगून जातं. टोचून जातं. ते लेखनात आहे आणि प्रयोगातही आहे. रंगमंचावर एका कलावंताने सादर केलेला हा प्रयोग असला तरी प्रयोगकर्त्यांनी त्याला एकपात्री ऐवजी एकल नाट्यप्रयोग असा सार्थ शब्द वापरला आहे. कारण बहुपात्री नाटकाचा अनुभव देण्याची क्षमता त्यात आहे.

दुसऱ्या दिवशी दिनांक ९ ऑक्टोबर २०२२ रोजी शिल्पा बल्लाळ दिग्दर्शितलकीर के इस तरफ’ डॉक्युमेंटरी फिल्मचं स्क्रिनिंग राष्ट्रभाषा भवन, उत्तर अंबाझरी मार्ग, रामदासपेठ, नागपूर येथे संध्याकाळी ५.३० वाजता पार पडले.

कार्यक्रमाचे मॉडरेशन विनोद कुमार यांनी केले. ‘लकीर के इस तरफ‘ या डॉक्युमेंटरी मध्ये नर्मदा नदीच्या खोऱ्यातून लाखो लोकांची संस्कृती नष्ट करणाऱ्या आणि पर्यावरणाचर अपरिवर्तनीय हानि करणाऱ्या विकासाच्या सध्याच्या मॉडेलला आव्हान देणार-या अहिंसक जनआंदोलनाच्या ३५ वर्षांच्या संघर्षाची आणि यशाची कहानी सांगितली आहे.

डॉक्युमेंटरी स्क्रिनिंग नंतर प्रश्न उत्तरांसाठी शिल्पा बल्लाळ यांच्या सोबत प्रत्यक्ष चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते . माहितीपटाचा विषय समकालीन असल्यामुळे अर्थपूर्ण आणि गहन चर्चा करण्यात आली .

. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पुष्पक भट यांनी केले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या