फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमबहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडाला चार वर्ष पुर्ण: न्याय कधी मिळणार ?

बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडाला चार वर्ष पुर्ण: न्याय कधी मिळणार ?

Advertisements

नागपुर,१६ फेब्रुवारी २०२२: बहुचर्चित उषा कांबळे आणि राशी कांबळे दुहेरी हत्याकांड या घटनेने केवळ नागपूरच नव्हे तर राज्यभरात थरार निर्माण केला आहे. आरोपींनी ५४ वर्षीय उषा कांबळे यांच्यासोबतच दीढ़ वर्षीय चिमुकली राशि कांबळे हिची देखील गळा कापुन निर्घुण हत्या केली आणि या दोघांचेही मृतदेह नाल्यात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांमधून पुढे आली आहे ,

या प्रकरणात सरकारी वकील म्हणून सरकारने ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे, आरोपींचा जामिन अर्ज ही सत्र न्यायालय,उच्च न्यायालयापासून तर सर्वोच्च न्यायालयातसुद्धा खारिज झाला आहे , आरोपी तर्फे सर्वोच्च न्यायालयात एक याचिका टाकली होती ज्यात कांबळे दुहेरी हत्याकांडाची केस ही पर राज्यात सुरु करावी, परंतु सुप्रीम कोर्टाने आरोपींची याचिका फेटाळून लावली ,

सध्या कांबळे दुहेरी हत्याकांड मध्ये महत्वाचे २० साक्षदार तपासून झालेले आहे , अरोपिच्या वतीने वारंवार केस मध्ये तारखा घेण्यात येत आहेत. माननीय जिल्हा सत्र न्यायाधीश Dj- 11 सुनील पाटिल यांनी माननिय सुप्रीम कोर्ट येथे केस संपविन्याकरिता पुढील सहा महिन्याची मुदत मागितली होती त्यावर माननीय सुप्रीम कोर्टाने जिल्हा सत्र न्यायालयाला कांबळे दुहेरी हत्याकांडाचा खटला ३१ जुलै २०२२ च्या आत संपविन्याचे आदेश दिलेले आहे , सत्र न्यायालयात सरकार पक्षा कडून ॲड उज्वल निकम , फिर्यादी रविकांत कांबळे यांच्या वतीने ॲड. समीर सोनवणे व आरोपी तर्फे ॲड. आर. भागवत खटला चालवत आहे .

हे आहेत आरोपी-
१)गणेश शाहू
२)गुड़िया शाहू ( आरोपिची पत्नी)
३) अंकित शाहू( आरोपिचा लहान भाऊ)
४) विधि संघर्ष बालक

आरोपिंनी संगनमत करुन कांबळे दुहेरी हत्याकांड केले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या