फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमबलात्कारित तरुणीचे न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे:नागपूरच्या दोन डॉक्टरांवर बलात्काराचा आरोप

बलात्कारित तरुणीचे न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे:नागपूरच्या दोन डॉक्टरांवर बलात्काराचा आरोप

Advertisements

(बातमीसोब एक तासाची ऑडियो क्लिप वर संलग्नित आहे)

तरुणीविरोधातच बजाज नगर पोलीस ठाण्यात नोंदवला गुन्हा:पुण्याच्या एचएच आय विमान नगर हॉटेलमध्ये घडली घटना

नागपूर,ता. ३० ऑगस्ट: मालिकेत काम देण्याच्या बहाण्याने पुण्याच्या एचएच आय या पंचतारांकित हॉटेलमध्ये एका ३३ वर्षीय तरुणीसोबत नागपूरच्या दोन डॉक्टरांनी आळीपाळीने बलात्कार करुन शरीरसंबधास नकार दिल्याने बीयरच्या बाटलीने तिच्या हातावर गंभीर जखम केली.ही घटना ८ व ९ फेब्रुवारी २०२० दरम्यान घडली असून यात नागपूरच्या दोन डॉक्टर्सवर या तरुणीने बलात्कार केल्याचा गंभीर आरोप लावला आहे.

ही तरुणी मूळ अकोला येथील असून मुंबईत ती कामाच्या शोधात २०१६ पासून पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. छाया नावाच्या महिलेने तिला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्माता असल्याचे तसेच अमृता फडणवीस या निर्मात्री असलेल्या ’मी पुन्हा येईन’ या मालिकेसाठी पुण्यात स्क्रीन टेस्ट सुरु असल्याची माहिती दिली. ८ फेब्रुवारी रोजी छाया नावाच्या या ओळखीच्या महिलेने ओला टॅक्सीमधून विमाननगर पुणे येथे सायंकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास हॉटेल एचएच आय पुणे येथे तरुणीला आणले. सदर हॉटेलमध्ये खोली क्र. ४०२ मध्ये तरुणी व छाया दोघी राहत होत्या.ती खोली कोणी बूक केली होती,हे सांगता येणार नसल्याचे तिने तक्ररीत नमूद केले. याच दिवशी छाया हिने दोन इसमांशी तरुणीची ओळख करुन दिली व ते दोघे तरुणीची मुलाखत घेऊन मालिकेत काम देणार असल्याचे तिने सांगितले. सदर व्यक्तिंनी तरुणीला काही प्रश्‍ने विचारुन ते त्यांच्या खोलीत निघून गेलेत. त्या दिवशी तरुणीसोबत कोणताही गैरप्रकार झाला नाही.

परंतु दि.९ फेब्रुवारी २०२० रोजी तरुणी व छाया आपल्या खोलीत असताना रात्री १२.३० ते १ वा.दरम्यान छाया हिच्या ओळखीचे व तरुणीची मुलाखत घेणारे ते दोन इसम रुममध्ये आले.छाया हि त्यांच्यासोबत खाेलीतच बीयर पित बसली.त्या दोन इसमांनी तरुणीला शरीरसुखाची मागणी केली,तेव्हा तरुणीने त्यांना नकार दिला. त्यामुळे छाया व त्या दोन पुरुषांनी तरुणीच्या हातावर बीयरच्या बाटलीची काच मारुन जखमी केले व तरुणीला बाहूपाशात पकडले,तेव्हा तरुणी मोठ्याने आेरडली,सदर दोन्ही इसमांनी तरुणीचे तोंड दाबून तिच्या इच्छेविरुद्ध खोली क्र. ४०२ मध्ये आळीपाळीने जबरदस्ती शरीरसंबंध केला व घडल्या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास किवा पोलीसात तक्रार दिल्यास जीवाने ठार मारण्याची धमकी दिली.त्या कारणाने तरुणी भयभीत झाल्याने पोलीसात तक्रार देऊ शकली नाही.

मात्र दि. ७ मार्च २०२० रोजी झालेल्या अत्याचाराबाबत विमानतळ पोलीस स्टेशन पुणे येथे तक्रार अर्ज दिला व तब्येत बरी नसल्याने मुंबई या ठिकाणी परतून औषधोपचार घेतले. तब्येत बरी झाल्याने मी ही तक्रार नोंदवली,असे तिने तक्रारीत नमूद केले आहे. मी दिलेल्या तक्रारी अर्जावरुन पोलीसांनी हॉटेल एचएच.आय मधील ८ फेब्रुवारी २०२० ते ९ फेब्रुवारी २०२० मध्ये हॉटेलमध्ये उतरलेल्या लोकांचे ओळखपत्र व आधारकार्ड प्राप्त केले.ती मला दाखविली. सदर ओळखपत्र व आधारकार्ड पाहून व त्यावरील फोटो माझ्यावर जबरदस्तीने शरीर संबंध करणारे इसमांचे फोटो पाहून त्यांना ओळखले .त्या पैकी एकाचे नाव डॉ.भालचंद्र प्रमोद कोलवाडकर,रा.वर्धा रोड,नागपूर,लोकमत बिल्डींग शेजारी,पटवर्धन मैदान नागपूर तर दुसरा इसम डॉ.समीर विजय चौधरी रा. सरस्वती विहार,त्रिमूर्ती नगर,नागपूर अशी आहे. तसेच छाया हीचे पूर्ण नाव मला माहिती नसल्याने वयाने ती ४० ते ४५ दरम्यान,रंगाने काळी-सावळी,अंगाने जाडजूड,चेहरा गोल, डोक्याचे केस काळे व कुरुळे,अंगावर पंजाबी ड्रेस,बोलताना अडखळत(तोतली) व हिंदी भाषेत बोलते,असे वर्णन मी सांगितले.

मात्र पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अमृता फडणवीस यांच्या निर्मितीखालील मालिका ’मी पुन्हा येईन’चा उल्लेख गाळण्यात आला.‘औकातीत राहून’तक्रार करण्यास मला सांगण्यात अाले. एफआयआर क्र. ११५/२०२० कलम ३७६,३२४,५०६,३४ भा.द.व प्रमाणे एफआयर दाखल केली.या एफआयआरमध्ये अनेक महत्वाच्या बाबी पोलीसांनी मुद्दामून गाळल्या,अशी तक्रार पीडीतेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच गृहमंत्री अनिल देशमुख तसेच पुणे व नागपूरच्या पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.

याशिवाय अट्रासिटीचे कलम न लावता आरोपींना विमानतळ पोलीसांनी विविध प्रकारे सहकार्य केले व प्रकरण कमकुवत केले. पुणे पोलीस आयुक्त पदी नागपूरहून बदली होऊन गेलेले आयुक्त असल्याने त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे देखील तक्रारीत नमूद करण्यात आले. पीडीताने वारंवार विनंती करुन तपास अधिकारी बदलण्याची विनंती केली मात्र आयुक्तांनी तपास अधिकारी बदलला नाही.

याचा फायदा घेऊन पुणे येथील गुन्हा खोटा आहे असा अंतिम अहवाल पोलीसांकडून दाखल करण्यास सोपे जावे म्हणून आरोपींनी षडयंत्र रचून पीडीतेच्या एका जवळच्या नातेवाईकासोबत तडजोडीबाबत संवाद साधले.पीडीताला याची कोणतीही माहिती नसताना त्या संपूर्ण संभाषणाची रेकॉर्डींग करुन त्या अाधारावर नागपूरातील बजाज नगर येथील पोलीस ठाण्यात पीडीतेवरच खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा अप क्र.९७/२०२० दि. ५ मे २०२० रोजी कलम ३८६,३४ भा.द.वी चा गुन्हा दाखल करुन पोलीसांनी अकोला येथील सिविल लाईन्स पोलीस स्टेशनच्या पोलीसांसोबत पीडीतेच्या घरी जाऊन तिची वृद्ध आई वय वर्षे ७० तसेच दहा वर्षाचा मुलाला जबर मारहाण केली. त्यांच्यावर दंडे तोडले तसेच लहान मुलाच्या पार्श्वभागात दंडा कोंबू अशी धमकी दिली.

पीडीतेला अकोला येथन नागपूरात खाजगी गाडीत आणण्यात आले. तिला दोन्ही आरोपींशी तडजोड करुन पुणे येथील दाखल गुन्हात माघार घेण्याची सूचना केली. या दोन्ही आरोपींचा मध्यस्थी जो माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निकटचा सहकारी आहे, यांच्याशी बोलण्यास सांगितले मात्र पीडीतेने नकार दिला. तिला न्याय हवा होता. मला जर हेच करायचे होते तर मुंबईत राहूनच शरीर विकले असते मात्र माझ्या परवानगीशिवाय माझ्यासोबत जबरदस्तीने पद,पैसा व प्रतिष्ठेच्या जोरावर शरीर संबंध ठेवणा-यांसोबत मी कोणतीही तडजोड स्वीकारणार नसल्याचे ठामपणे पीडीतेने पोलीसांना सांगितले.यावर बजाज नगर पोलीसांनी पीडीतेचा हात पिरगाळल्याची तक्रार तिने नोंदवली आहे.

कसलेही पुरावे नसताना तिला न्यायालयात हजर करण्यात आले.वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या सांगण्यावरुन तिचा पोलीस कोठडी रिमांड मागण्यात आला.न्यायालयाने एमीसीआर केल्यावर जामिन अर्जावर उत्तर न देता तपास अधिकारी तेथून निघून गेलेत.त्यामुळे पीडीतेला एक आठवडा कारागृहात राहावे लागले.कारागृहातून बाहेर येताच तिने प्रसार व प्रचार माध्यमांशी बोलू नये म्हणून तिला मनपाच्या सहकार्याने १४ दिवसांसाठी विलगीकरण केंद्रात डांबण्यात आले.या दरम्यान तिला जीवाने वारंवार मारण्याची धमकी देण्यात आली.तिला जामीन मिळू नये म्हणून खाजगी वकील लावून न्यायालयात जामिनाला विरोध दर्शवला. मात्र न्यायालयाने सर्व परिस्थिती नमूद करुन पीडीतेला जामीन दिला.

विशेष म्हणजे बजाज नगर पोलीसांनी नोंदवलेल्या पीडीतेच्या विरोधातील एफआयआरच्या आधारावर पुणे येथील न्यायालयात ‘ब’फायनल म्हणजे खोटी तक्रार असल्याचा अहवाल सादर केला.मोठ्या इसमांची नावे तक्रारीत असल्यानेच पीडीतेला या संपूर्ण भयक्रांत घटनाक्रमांना सामाेरे जावे लागले. परिणामी पुणे,नागपूर तसेच अकोला पोलीसांच्या भूमिकेची चौकशीची मागणी पीडीतेने तक्रारीत नमूद केली आहे. सत्य शोधून जवाबदार पोलीस अधिकारी यांच्यावरही कायेदशीर कारवाई करण्याची पीडीतेने केली आहे.

सामाजिक कार्यकर्ता उत्तम शेवडे तसेच ॲड.सतीश उके यांनी पीडीतेच्या तक्रारींच्या संपूर्ण तपशीलासह मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांच्याकडे तक्रारीचे निवेदन पाठवले आहे. पीडीतेने दिलेल्या जबानीत मी फक्त बाई असती तर कदाचित बलातका-यांना माफ ही केले असते मात्र ती एका १२ वर्षीय निष्पाप मुलाची आई देखील आहे,ज्याला पोलीसांनी अटक करुन बेदम मारहाण केली,परिणामी तिला आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडूनच न्यायाची अपेक्ष्ा आहे. तिच्यावरील बजाज नगर पोलीस ठाण्यातील खंडणीचा खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा,आणि दोन्ही बलातका-यांना कायद्याने शिक्ष्ा द्यावी,अशी मागणी पीडीतेने केली आहे.

याशिवाय पीडीतेच्या जबानीत पुणे पोलीस ठाण्यातील ठाणेदार हा बोलताना त्याने नुकतेच एका १६ वर्षीय पीडीतेला हाकलून लावले,अश्‍या केसेस तर दरराेजच येतात,असे अतिशय धक्कादायक विधान केल्याचे ऐकू येतं. परिणामी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा महाराष्ट्र हा आता बिहार आणि उत्तरप्रदेश झाला आहे का?असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. या राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रात महिला,मुली यांच्यासोबत राजरोसपणे समाजातील धनदांडगे बलात्कार करत असतील आणि पैश्‍यांच्या जोरावर सूटत असतील तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने समाजाच्या तसेच दलित,शोषित,पीडीतांच्या हितासाठी जी राजकीय व्यवस्था, पोलीस प्रशासन,न्याय व्यवस्था निर्माण केली आहे, या व्यवस्थाच जर महाराष्ट्रातील असहाय बलात्कारित स्त्रियांच्या मूळावर अश्‍याप्रकारे उठत असतील तर महाराष्ट्राने ‘पुरोगामी’ हे बिरुद मिरवणे बंद केले पाहिजे,असेही पीडीतेचे म्हणने आहे.

(अस्वीकरण:- पीडीतेने ‘सत्ताधीश’ला सोपविलेल्या तक्रारीची निवेदने तसेच पोलीस ठाण्यातील दाखल एफआयरच्या या अनुषंगाने वरील बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तक्रारीत नमूद नावे याबात खरे-खोटे सिद्ध करण्याची जवाबदारी ‘सत्ताधीश’ची नाही. तक्रारीत जी नावे नमूद करण्यात आली आहे त्यांना त्यांचा कोणताही खुलासा मांडायचा झाल्यास त्यांचा खुलासा देखील ‘सत्ताधीश’मध्ये प्रसिद्ध केला जाईल तसेच बातमीच्या अनुषंगाने ‘सत्ताधीश’ त्यांच्याद्वारे कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेस जवाबदार राहणार नाही)

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या